Family tree of Arkon, Soteria and Shukracharya

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) प्रारंभ Family tree of Arkon, Soteria and Shukracharya

#413521

Thanks for providing Family tree of Arkon, Soteria and Shukracharya

हरि ॐ.
दादा. आपण महामाता सोटेरिया, शुक्राचार्य आणि आरकॉन ह्यांच्या वंशावळी दिल्यामुळे हा वैश्विक इतिहास समजून घेणे खूप सोपे होत आहे, त्याबद्दल शतश: अंबज्ञ !!!

दिनांक ०६-०९-२०१५ चा अग्रलेख तुलसीपत्र ११४६ वाचताना सावधपणा कसा असावा व अतिदक्षता किती खोल पातळीवर जाऊन पाळायची असते ह्याचे सखोल ज्ञान तर मिळतेच पण विस्मयाने डोळे विस्फारण्याची पाळीही येतेच. ब्रम्हर्षी कश्यपांनी ह्या अनुनाकीयांचा किती सूक्ष्म पातळीवर अभ्यास केला होता आणि आदिमातेने श्रध्दावान सावर्णींना किती डोळस अभ्यासू वृत्ती प्रदान केली होती ह्याने अवाक व्हायला होते.
कश्यपांनी दूरदर्शीपणा दाखवून व भविष्यातील घटनांच्या परिणामांचा अभ्यास करून इपेटसला सेमिरामिसकडे पाठवण्याच्या आधीच स्वत:च इपेटसच्या गळ्यावर एका रांगेत सहा तीळ तयार करून घेतले होते, ज्याची सूचना सेमिरामिसची माता केरिडवेन हिने तिच्या लहानपणीच तिला दिली होती. सामान्य माणूस काही काळानंतर भूतकाळात घडलेल्या घटना नीट आठवू शकत नाही आणि येथे तर सेमिरामिसला तिच्या लहानपणातील घटना स्पष्ट आठवत होती ह्यावरून तिची बुध्दी किती तल्लख आणि कुशाग्र होती ह्याचा अंदाज येतो. कश्यपांनी तयार केलेले तीळ पाहून सेमिरामिसला आपल्या माता केरिडवेनची सूचना आठवून इपेटस म्हणाजेच पेटस हा आपला हक्काचा गुलाम बनण्यास योग्यच असल्याचा मनोमन पुरवा मिळून ती निर्धास्त होते जे पुढे इपेटसच्या किती कामी येते हे आपण वाचतोच.
इपेटस हा त्याच्या नावाप्रमाणेच सेमिरामिसच्या मनात त्याचे विचार अस्पष्ट दृश्य बनवून घुसवत होता आणि त्यामुळे ध्यान लावूनही तिला निमरॉड व सॅथाडॉरिना ह्यांचा वारंवार होत असलेला संपर्क ह्याची जरी स्पष्ट जाणीव झाली तरी तिला प्रसंग नीट कळून येत नव्हते. असे आपण मागच्याच तुलसीपत्र ११४५ (दिनांक ०३-०९-२०१५) च्या अग्रलेखात वाचले होते. इपेटसला असे करणे फक्त चार पळांपुरतेच (सेकंद) जमत असले आणि तेही एका घटिकेच्या अंतरानेच तरी देखिल त्याचे कार्य सेमिरामिसवर चांगलाच परिणाम करून गेले होते.
खरे पहाता सेमिरामिसने पुलिकाला अनेक वर्षे मनोनियंत्रित बनवून आपले गुलाम केले होते आणि असे अनेक मनोनियंत्रित गुलाम तिच्या हाताखाली राबत होते. अशा परिस्थितीतही सेमिरामिसच्या मनावर नियंत्रण करणे हे इपेटसला जमू शकते ते केवळ महाद्र्गेच्याच प्रभावामुळे असे ठामपणे वाटते, नाहीतर ते केवळ अशक्यप्रायच होते.
सहसा एकदा शाळा व कॉलेज सुटले की आपण सामान्य माणसे अभ्यासाला कंटाळतो आणि आपल्या वैयक्तिक स्वार्थाशिवाय कोणत्याही गोष्टीची सखोल माहिती काढणे त्याबद्दलचे बारकावे शोधून काढणे व अभ्यासणे , त्याचा भविष्याच्या दृष्टीने काही फायदा होऊ शकतो ह्याचा ठोकताळा बांधणे हे तर खूपच दूरचे असते.
बापू नेहमी सांगतात कल्पनेत रमण्यापेक्षा निरीक्षणशक्ती आणि निर्णयशक्तीचा उचित पाठपुरावा माणसाला बरेच काही मिळवून देण्यासाठी सहाय्यकारी ठरू शकतो. बापूंनी स्वत: येणार्‍या काळात तिसर्‍या महायुध्दात औषधांचा वापर करताना Vital Force ह्या होमिओपथीच्या मूळ तत्वाचा अधिक फायदा होऊ शकतो हे जाणून वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही माणूस शिकू शकतो आणि त्या विषयात प्रभुत्त्वही मिळू शकतो हे आपल्या स्वआचरणातून होमियोपथी शिकून सिध्द केले हे आम्हा सर्वांना ठाऊक आहेच.
महादुर्गेचे भक्त असणारे ही सावर्णि घराण्यातील सारीच माणसे ह्याच नियमांचे नीट आचरण व पालन करताना दिसतात म्हणजेच ते त्रिविक्रमाचा मार्ग चोखाळत आहेत.
तुलसीपत्र ११०४ व ११०५ मध्ये आपण वाचले होते की इपेटस हर्क्युलिसबरोबर लेव्हियाथानच्या अभ्यासासाठी गेला होता आणि त्या दोघांनी लेव्हियाथानच्या प्रत्येक हालचालींची व यंत्रणेची पुरेपूर माहिती मिळवली होती. ह्या माहितीचा व ज्ञानाचा इपेटसला किती मोठा उपयोग होतो हे ध्यानात घेण्यासारखे आहे. तुलसीपत्र ११०४ मध्ये ह्या लेव्हियाथानची संपूर्ण माहिती ऍथेना व धामिरने (सेनापती आरकॉनचा एक पुत्र) देताच सर्व व्रतधारक सावर्णी स्तंभित होत असलेले आपण तुलसीपत्र ११०४ मध्ये वाचले होते आणि ते सर्व तेवध्याच खंबीरतेने युध्दाच्या तयारीसाठी पुढे सरसावले ही होते. त्याच वेळी सम्राट युरॅनसच्या सांगण्यानुसार लेव्हियाथान म्हणजे केवळ एक साधीसुधी पाणबुडी नसून महादुर्गेबरोबर युध्द आरंभ करण्याच्या केलेल्या तयारीचा एक भाग होता हे कळले होते. तेव्हा युध्दाची भीषणता थोड्या प्रमाणावर जाणवू लागली होती.
आणि आता सेमिरामिसने इपेटसला स्वत:चा मनोनियंत्रीत गुलाम पेटस मानून लेव्हियाथानच्या प्रत्येक यंत्राला पिता पेटसचे नाव, त्याचा ध्वनी व त्याची हस्तमुद्रा ह्यांची ओळख करून दिली व त्यामुळे तिच्या मते तिच्या आञेनुसार पिता पेटस एकटासुध्दा संपूर्ण लेव्हियाथान सांभाळू शकणार होता हे वाचले आणि वाटले युध्दाचे पारडे किती झपाट्याने बदलले जात आहे. ज्या लेव्हियाथानच्या जोरावर निमरॉड बनलेला हिराम अबीफ आणि मंडळी युध्दाची तयारी करत होती ते महत्त्वाचे प्यादेच आता त्यांच्या शत्रूंच्या हातात (सावर्णी ) त्यांच्याही नकळत त्यांनी आपणहून स्वत:च (सेमिरामिसने निमरॉडला शह देण्याच्या द्वेषापोटी नकळत केलेल्या चुकीने ) सोपविले आहे. येथे लक्षात आले की महादुर्गेचे सहाय्य काय अगाध transformation घडवून आणू शकते.
तुलसीपत्र ११४५ मध्ये आपण पाहिले की ऍस्लेपियस झिदस हा हेराचा पती अपघातात अंध, बधिर व मूक झालेला आहे आणि महामाता सोटेरियाच्या सहाय्याने स्फटिकमस्तिष्काच्या प्रमुख कार्यस्थानावर बसला. पण त्याआधीचा प्रवास म्हणजे खडतर तपश्चर्याच आहे ऍस्लेपियस झिदसची. महामाता सोटेरियाने मदतीचा हात पुढे केला आणि झिदसने आपल्या प्रयासांची पराकाष्ठा केली आहे ज्यामुळे त्याला कुठलाही लिखीत मजकूर वाचता येऊ लागला होता व कुणाचेही बोलणे अर्थात कुठलाही आवाज त्या विशीष्ट मुद्रिकांद्वारे समजू लागला होता अर्थात ऐकू येऊ लागला होता. किती ही अफाट मेहनत, जीवन पुनश्च नव्याने जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती व तेही कुठेही महादुर्गेला आपल्यावर कोसळलेल्या संकटाला जबाबदार न ठरविता, न डगमगता वाट पुढे चालत राहण्याचा अट्टाहास !
तुलसीपत्र ११४६ च्या शेवटी त्याच ऍस्लेपियस झिदसच्या प्रयासांना आदिमाता महादुर्गा स्फटिकमस्तिष्कातून त्याच्या अंध, मूक, बधिर ह्या समस्यांवरचा उपाय शोधून देते तेव्हा उपनिषदातले बापूं-त्रिविक्रमाचे बोल आठवतात.
त्रिविक्रमाच्या मुखातून आपले बापू मातृवात्सल्य उपनिषदामध्ये सातत्याने अध्याय २४ पासून अध्याय २८ पर्यंत प्रत्येक अध्यायाच्या शेवटी एकच ग्वाही देत राहतात –
त्रिविक्रम उवाच –
“प्रिय मित्रांनो ! आदिमातेवर व तिच्या श्रीकुलावर पूर्ण विश्वास ठेवून जे श्रध्दावान परिश्रम करतात आणि आलेल्या संकटांना न घाबरता प्रयास व भक्ती चालूच ठेवतात, ते श्रध्दावान यशस्वी, संपन्न आणि सुखी होणारच. कारण आदिमाता व तिचे संपूर्ण श्रीचण्डिकाकुल त्यांच्या सहाय्यासाठी तत्पर आहे. गरज आहे फक्त तुमच्या प्रयासांची आणि भक्तीची.
ही वत्सल आदिमाता केवळ तुमच्यासाठीच उभी आहे.”
विशेष म्हणजे श्रीहरिगुरुग्रामामध्येच असणार्‍या अमोघ नामक जलाशयाच्या काठावर निवांत बसले असता व आदिमातेचा नवरात्री उत्सव साजरा करताना हे त्रिविक्रमाचे बोल आढळत नाही. म्हणजेच कदाचित बापू त्रिविक्रम सातत्याने आपल्याला आपणच आपली स्वत: तोडलेली नाळ जोडण्यासाठी आदिमाता चण्डिका व तिचा पुत्र त्रिविक्रम ह्यांना शरण जाण्याचे स्मरण देत राहतात.
एरव्ही उपनिषद रोज वाचताना ह्या बापूंच्या ग्वाहीची सखोलता जाणवत नव्हती पण आता तुलसीपत्र ११४५ , ११४६ वाचताना बापू त्रिविक्रमाच्या त्या बोलाचा अवाढव्य आवाका , त्याची अगणित अशी व्याप्ती मनोमनी पूर्ण जाणवू लागली आहे.
येथे जाणवते की संकट कितीही मोठे असले तरी न डगमगता महादुर्गेवर व तिच्या पुत्र त्रिविक्रमावर संपूर्ण विश्वास व भरवसा ठेवून कसे मार्गक्रमणा करीत राहायचे. ह्याचेच मार्गदर्शन हे सावर्णी घराण्याच्या प्रत्येकाचेच आचरण करत राहते आणि त्रिविक्रमाच्या बोलाची महती पटवित राहते . सावर्णी घराण्याच्या ह्या ज्येष्ठ-श्रेष्ठ व्यक्तींच्या आचरणातून ! हा खूप मोठा सप्रंमाण धडा आहे असे मला तरी वाटते.
आदिमाता महादुर्गेचा विजय असो.

हरि ॐ. श्रीराम. अंबज्ञ
सुनीतावीरा करंडे