Efforts of Iris

#337960

Sailee Paralkar
Keymaster

अनिरुद्ध बापूंनी (Aniruddha Bapu) लिहिलेल्या तुलसीपत्र (Editorial) क्रमांक ११३२ व ११३३ मध्ये सम्राज्ञी आयरिसच्या (Iris) कार्याचा उलगडा होतो. डेमेटरची (Demeter) दासी म्हणून वावरणार्‍या आयरिसने यापूर्वीही अनेक धाडसी कार्ये केली आहेत. सुरुवातीच्या अग्रलेखांमध्ये डेमेटरच्या दोन दासींचा उल्लेख अनेकदा येतो. सॅथाडॉरिनावर (Sathadorina / Circe) पाळत ठेवण्याची कामगिरी आयरिस खूप आधीपासून चोखपणे करीत असल्याचे दिसून आले आहे. टॉलोपसची (Tolopus) पत्नी बनून सर्कीला चकविण्याचा plan तर अतिशय जबरदस्त होता. आपले सम्राज्ञीपद व त्याबरोबर येणार्‍या सर्व सुखसोयींना बाजूला ठेवून आयरिस आपले कर्तव्य कठोरपणे करताना दिसते.

दुसरीकडे सॅथाडॉरिना सारखी स्त्री केवळ स्वत:कडे सर्वोच्च सत्ता येण्यासाठी कोणत्याही थराला जाते आणि कोणाचाही जीव सहजपणे घेऊ शकते. प्रचंड सामर्थ्य व प्रखर बुद्धिमत्ता असूनही सॅथाडॉरिना (Sathadorina / Circe) भक्तीमार्ग नाकारून अपवित्रतेच्या संरक्षणासाठी सज्ज असलेल्या लोकांच्या समूहाचे जणू प्रतिनिधीत्व करते.

डेमेटरच्या ’त्या’ दोन दासींचाही अग्रलेख क्रमांक ११३३ मध्ये उलगडा झाला आहे. डेमेटरची ’ती’ अत्यंत कुरूप असणारी दुसरी दासी अन्य कोणी नसून बिजॉयमलानाच (Bijoymalana) आहे. आता क्रोनॉसच्या घरीदेखील त्या दोघी एकत्रच राहणार आहेत. कद्रूला (Longmu) आलेला त्या दोघींचा संशय, त्यामुळे पुढे काय होणार याची उत्सुकता आहे.