Dracos worship Kadru

#78585

आजचा अग्रलेख खरंच अचंबित करणारा होता. ज्या कद्रूचे(Kadru) भीषण रुप पाहून स्वत: सॅथोडॉरीना(Circe) किंचाळली होती व ती इतकी घाबरली की तिला भयाने पळून जावेसे वाटले. आणि त्याच कद्रूच्या बिळात सम्राज्ञी बिजॉयमलाना (Bijoymalana)आत्मविश्वासाने जाऊन त्या श्रद्धाहीनांना त्यांची जागा दाखवून दिली. ह्यातून हे सिद्ध होते की श्रद्धाहीन कितीही ताकतवान असले तरीही श्रद्धावानांवर कधीच मात करू शकत नाही.
ज्या कद्रूला ड्रॅको समाज (Dracos) महामाता म्हणून आदराने शरण जातो, त्याच कद्रूवर सम्राज्ञी बिजॉयमलाना सहजतेने मात करते. ह्यावरुन कळते की श्रद्धाहीन ज्यांना पुजतात ते किती बनावटी व पोकळ आहेत. सम्राज्ञी बिजॉयमलानाने एकच वार केल्याने कद्रू आंधळी होते.
आजच्या अग्रलेखातून बिजॉयमलाना किती निर्भय व धाडसी होती हे परत एकदा स्पष्ट झालंय, खर्‍या अर्थाने तिने पावित्र्याच्या संरक्षणासाठी कद्रूच्या बिळात जाऊन, त्या सगळ्यांना धारेवर धरून खुला चॅलेंज करुन अत्यंत दमदारपणे निघते. म्हणजे ती महादुर्गेची निस्सीम भक्त आहे हे माहीतच होते. पण आज तिच्या भक्तीतला कडवेपणाही जाणवला. ती ज्या आत्मविश्वासाने कद्रूच्या नजरेस नजर देत उभी राहते म्हणजेच तिचा महादुर्गेवर ही असीम विश्वास आहेच. आणि जेवढा आपला देवावर विश्वास तेवढा आपला आत्मविश्वास व त्यातून येणारी निर्भयता.
अजून एक गोष्ट, शेवटी असं दिलंय की सम्राज्ञी बिजॉयमलाना क्रॉनसच्या उजव्या खांद्यावर हात ठेऊन वायुवेगाने निघते मला वाटते की बिजॉयमलानाने कदाचित क्रॉनसच्या खांद्यावर एखादी microchip किंवा कोणतं यंत्र तर बसवलं नाही ना… हा एक विचार मनात येऊन गेला.