Dr. Nikola Tesla discovery – machines creating Ozone layer and Electric fertilizer

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) Aporojatus – अपोरोजाटस (अपराजित) Dr. Nikola Tesla discovery – machines creating Ozone layer and Electric fertilizer

#98394

shantanu natu
Participant

हरि ओम
एकदम बरोबर डॉ. योगिंद्रसिंह, इथे अजुन एक गोष्ट आठवते, ती म्हणजे, हा अटलांटीस(Atlantis) नगरी मधे घडलेला भुकंप ज्याने हे महामस्तीष्क पूर्णपणे निष्क्रिय झाले, हि भामीर व थामीर ह्या दोघा श्रध्दावानांनी झियस च्या संमतीने आखलेली छुपी योजना होती. म्हणजेच ह्या चांगल्या लोकांकडे असे एखादे मशिन असणार जे वापरुन हे लोक असा भुकंप देखील घडवु शकत होते.

डॉ. निकोल टेसला (Dr. Nikola Tesla)ह्यांच्या लेखांमध्ये देखील आपण अशा एका मशिन चा उल्लेख वाचु शकतो जे टेसला ह्यांनी स्वत: निर्माण केले होते. हे एकच मशिन वापरुन टेसला हे कुठेही भुकंप घडवुन आणु शकत होते. तसेच ह्याच मशिनमध्ये थोडेफ़ार बदल करुन डॉ. निकोल टेसला ह्यांनी वातावरणातील ’ओझोन वायु’ (Ozone Layer)ची निर्मिती करणारे मशिन व तसेच नापीक जमीन देखील सुपीक बनवणारे ’इलेक्ट्रीक फ़र्टीलायझर मशिन’ (Electric fertilizer)देखील विकसीत केले होते.

ह्यावरुन श्रध्दावानांनी मनात ठाम निश्चय केला कि ते काय काय करु शकतात ह्याची प्रचिती येते. वेळेला श्रध्दाहिनांच्या तोडीस तोडच नाही, तर त्यांच्यापेक्षा देखील श्रद्धावान वरचढ ठरु शकतात आणि तेही कोणत्याही वाईट मार्गाचा अवलंब न करता, फ़क्त आपले प्रयास चालु ठेवुन व परमेश्वरावरील श्रद्धा अधिक बळकट करुन.


ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञll