discussion on Hemadpant

#10698

Anuja Padsalgikar
Participant

हरि ओम् दादा…..

ह्या फोरम मध्ये असणऱ्या सर्व श्रद्धावान यांना हरि ओम्… मी आज प्रथमच ह्या फोरम (Forum) मध्ये सहभागी होत आहे……लहान तोंडी मोठा घास| तैसे होईल माझे साहस| तरीही आपण सर्वानी समजून घ्यावे माझा हा प्रयास……अंबज्ञ.

श्री हेमाडपंताचे शिर्डीस (Hemadpant) जाणे ही बाबांची योजना होती. त्यांच्या योजनेनुसार बाबा त्यांची वाट पाहत होते. एकदा आलेली संधी फलद्रूप झाली नाही म्हणून बाबांनी दुसरी संधी दिली, संधी पाठवली पण त्याच बरोबर त्यांना बरोबर घेऊन येण्यासाठी चांदोरकर यांना पाठवले. हा सद्गुरूंच्या योजनेचा पहिला भाग होता. आत्ता श्री हेमाडपंताना (Hemadpant) कुठलीही सबब मिळेल असे ठेवले नाही. खर पाहता तर त्यांची मनस्थिती नव्हती तरीही त्यांचे जाणे झाले. इथेच सद्गुरूंची योजना ही पूर्णपणे सफल सद्गुरुनीच करून घेतली. जसे लहान बाळाला आपल्या हिताचे काय आहे ते कळत नसते तेंव्हा आई ही बाळासाठी योजना आखते आणि त्या पूर्ण होण्यासाठी तशी तजवीज करते.

एका तळ्यात होती बदके पिल्ले सुरेख… ह्या सुंदर गाण्याची आठवण ह्या ठिकाणी होते. कुरूप असलेले बाळ आई नाकारत नाही कारण तिला माहिती असते कि त्या कुरुपतेतून राजहंस लपला आहे. ते छोटे हंस बाळ आपल्या नाराज मनस्थितीत असते तरीही त्याची आई त्याला सगळीकडे बरोबर नेतेच. साई (Sai) माऊलीने पण हेच केले. नाराज असलेल्या हेमाडपंताना बरोबर घेऊन गेले.

तसेच मला नेहमी विगताच्या नशीबवान असण्याचे भाग्य आवडते. विगत हा सुद्धा श्रद्धावान आहेच त्याच बरोबर उत्तम भक्तांचा सहवास आणि प्रत्यक्ष सद्गुरुंकडून मार्गदर्शन त्याला प्राप्त होते. विगताचा उत्तम भक्त होणे हे सद्गुरूंच्या योजनेचा भाग आहे. अनेक विकल्पानी आच्छादित असलेला हा विगत जेंव्हा त्या त्या विकल्पातून बाहेर पडतो तेंव्हा त्याचे उत्तम होणे हे आधीच ठरलेले असते फक्त ह्या गोष्टीची त्याला माहिती नसते.

प्रथम शिर्डीस (Shirdi) जाण्यास टंगळ मंगळ करणारे हेमाडपंत जेंव्हा नानासाहेब कहाणी शिर्डीची सुरु करतात आणि उशीर का करता, मन निश्चित्त करा असे खूप आतुरतेने सांगतात आणि हेच साईंचे पहिले गुण संकीर्तन होते. आतुरतेने तुम्हांला ही सद्गुरू भेटावे म्हणून केलेले हे प्रांजळ निवेदन, प्रेमळ शब्द ऐकून हेमाडपंत खुशीने तत्काळ निघतो असे वचन देतात. गाडीच्या गोंधळात सुद्धा एक यवन येऊन मार्गदर्शन करतो.. आणि हेमाडपंताना साई शिर्डीत जणू काही बोटाला धरून घेऊन येतात.

इथे परमात्म्याच्या योजनेचा दुसरा भाग सुरु होतो आणि हेमाडपंतांची बाबांबरोबर भेट होते..

अंबज्ञ.
अनुजा पडसलगीकर.