Dinosaur created by Nyx and Shukracharya

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) प्रारंभ Dinosaur created by Nyx and Shukracharya

#181429

Yogini Prabhu
Participant

Dinosaur created by Nyx and Shukracharya

हरि ॐ ॥

इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते कि डायनोसोर (Dinosaur) हे कुठल्या प्रलयात नष्ट झाले नसावेत. कारण मातृवात्सल्यविन्दांमध्ये असे वाचण्यात आले कि, “प्रलयानंतरची” सृष्टी निर्माण व्हायची होती… व पुढे असा उल्लेख आहे कि अशी अनेक कल्पे आली आणि गेली , येतात नी जातात… ”
यातून मला असे वाटते कि प्रत्येक प्रलयानंतर जी सृष्टी निर्माण होते तिला “कल्प” असे म्हणतात व प्रत्येक कल्पात माणसांच्या आचार, विचार ,आहार यानुसार त्या त्या युगांची निर्मिती होते व शेवटी प्रत्येक कल्पाचा अंत हा प्रलायानेच होतो.

त्यामुळेच जसा डायनोसोर (Dinosaur) ची निर्मिती हा “Nyx” व शुक्राचार्यांच्या (Shukracharya) कारस्थानांचा भाग होता, अगदी त्याचप्रमाणे डायनोसोर सारख्या भीषण व भयानक प्राण्यांचा नाश हा “त्रिविक्रम” व “Aphrodite” यांच्या योजनेचा भाग असावा.

मलाही हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे कि या प्राण्यांनी नेमका कसा उत्पाद मांडला असेल, व्रतींचा कधी सामना झाला असेल का या प्राण्यांशी, जर झाला असेल तर त्यातून व्रतींचे संरक्षण कसे गेले असावे आणि नंतर या भयानक व भीषण प्राण्यांचा नाश कसा केला गेला.

।। अंबज्ञ ।।