Devidohana to give birth to Jahbulon

#203527

Sangita Vartak
Participant

Devidohana to give birth to Jahbulon

हरि ॐ

गेले काही दिवसांपासून लिहायचे म्हणत होते पण जमलेच नाही. आज मात्र ठरवूनच बसले.

मंगळवार दि ७ एप्रिल २०१५ चा १०९९व्या तुलसीपत्रातील अग्रलेखात आणखी एका भयानक प्रसंगाची ओळख परमपूज्य अनिरुद्ध बापूंनी करून दिली. हा प्रसंग वाचता वाचता अक्षरश: प्राण कंठाशी आले होते असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. पुढे काय होते हे कळून घेण्यासाठी मन आतुर झाले होते. वाचताना असे वाटत होते की हे काय घडतेय? पण अगदी शेवटच्या सेकंदाला पुर्ण चित्र पालटून जाते आणि का नाही जाणार… आसुरी शक्तीने कितीही प्रयत्न केले तरी ते व्रती, चंण्डिकाकुल आणि मुख्य म्हणजे महादुर्गा कधीही चुकीच्या हेतूंना साध्य होऊन देणारच नाही.

त्या जॉहबुलॉनचा (devil i.e. Jahbulon) गर्भ जो डेव्हिडोहानाच्या (Devidohana) गर्भाशयात स्थापन करण्याचे जे वाईट इस्पित होते ते कधीही पूर्ण होण्यासारखे नव्हते. कारण ती, महादुर्गा कधीच पूर्ण होऊ देणारच नाही. शेवटी एकच पळ (सेकंद) असताना एक सोनेरी तिक्ष्ण टोकाचा दंड डेव्हिडोहानाच्या गर्भाशयात जोराने शिरला आणि जॉहबुलॉनचा गर्भ शिरण्याआधीच गर्भाशय फोडले गेले. म्हणजे अगदी उचित वेळी येऊन त्या जॉहबुलॉनचा मानवी जन्म होण्याचे टाळले होते.

महामाता सेटोरिया ने त्या नीच डेव्हिडोहाना आणि हॉरस (Horus) चे वाईट इस्पित अक्षरश: धुळीला मिळविल… वाह रे महामाता सेटोरिया!! विजयी हास्याने जेव्हा महामाता सेटोरिया गुहेत शिरते हे वाक्य वाचताना पण कीती आनंद होतो ना… कहर म्हणजे त्या नीच आणि आसुरी लोकांना पवित्र असा व्रती हर्क्युलिसचा (Hercules) बळी देतानाचा आवाज ऐकायचा होता. यावर महामाता स्टोरिया त्यांना बजावते ‘माझ्या वंशाचे रक्षण करण्यास मी स्वत: समर्थ आहे आणि आमची रक्षणकर्ती महादुर्गाही.’

आसुरी मार्गाने श्रद्धाहिनांनी कितीही प्रयत्न केले तरी, आपले चंण्डिकाकुल, मोठी आई आणि तिच्या पुत्राने त्या प्रयत्नांना कधी यश येऊन दिले नाही, देत नाही आणि देणारही नाही.

अंबज्ञ… हरि ॐ