Demeter in disguise of Thada

#115963

आजचा अग्रलेख वाचून हादरले. मागचे दोन अग्रलेखंवर पुरेसे विचारमंथन करावयास मिळाले नाही. परंतु आजचा लेख समजण्यासाठी साथोडोरीनाची वृत्ती आणि आसुरी महत्त्वकांक्षा जाणणे पुरेसे होते. सथोडोरिनाने असा काय घडवून आणले ज्यामुळे आजची ही घटना घडली. अतिशय विदारक आणि अस्वस्थ करणारी ही घटना आहे. पण तरिही का जाणो मनातून असे वाटते किंबुहना विश्वास वाटतो की श्रद्धावान असणाऱ्यांची अशी दयनीय अवस्था कधीच होणार नाही.

आणि शेवटी थाडाच्या(Thada) रुपात वावरणाऱ्या डेमेटरचे (Demeter)अस्तित्व वाचून जशी हर्मिस(Hermis), अपोलो(Apollo) आणि सोरथसची(Saurethus) अवस्था झाली तीच माझी पण झाली. कारण आजचा अग्रलेख बापूंनी जगायला लावाला. जे काही वर्णन बापूंनी केले ते वाचून अंगावर काटा आला.

माता ऱ्हीयाची अवस्था वाचत असताना माझ्या डोळ्यासमोर The Chronicles of Narnia: The Lion, the Witch and the Wardrobe या चित्रपटातील एक प्रसंग आला. एका प्रसंगात या चित्रपटातील सिंह त्या चेटकिणीच्या स्वाधीन होतो आणि चेटकिण त्या सिंहाला हालहाल करून मारते. बळी देते. हा सीन पाहताना मला जसा काही वाटत होते त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने आज व्यथित झाले. पण जसा त्या चित्रपटात तो सिंह पुनः जीवंत होतो. ती काळी जादू त्याचे काहीही बिघडवू शकत नाही. तसेच हे सारे व्रती आणि सार्वणी सुखरुप असतील अशी आशा मनाला आहे. हा सत्य इतिहास असल्याने यात येणारे ट्विस्ट कल्पनेपेक्षा भयंकर आहेत.

इथे एक लक्षात येते ते म्हणजे बहुतेक इथे श्रद्धाहीनांचा विजय झाल्याच्या आनंदात हे सगळं सुरु आहे. पण झियस आणि त्यांच्या इतर नातेवाईकांनी योग्य ती दुसरी पर्यायी योजना केलीच असावी. समोरासमोर युद्ध टाळून कदाचित गनिमी कावा झियस गट वापरणार असेल.

हा हल्ला सत्यच आहे. पण यातही कुण्या श्रद्धावानाला काहीही झालेले नसणार. कारण त्रिविक्रम, अफ्रोडाईट, हर्क्युलस यांचा आधार आहे. बापू आता पुढे काय झाले आहे हे वाचण्यासाठी रविवार पर्यंत धीर नाही उरला.

आतल्या पानावरील हा भीषण प्रकार वाचण्या आधी पहिल्या पानावरील हार्मिसच्या मनातील भाव जाणून घेऊन खूप सुखावह वाटले. हार्मिस, अपोलो, लेटो, अथेना हे चौघही किती कर्तव्य कठोर आहेत हे कळले आहे. त्यांच्यासमोरील त्यांचे ध्येय स्पष्ट आहे. धर्माच्या रक्षणासाठी या कुटुंबांने वाहून घेतले आहे.

धर्म कर्तव्यापुढे लौकीक संसाराला दिलेले महत्व नगण्य असले तरी पतीपत्नी, पिता पुत्र त्यांचे हे नाते अनन्य आहे. येणारा काळ भीषण आहे हे आपण जाणतोच आणि या काळात आपली ही आपत नाती मजबूत व्हावी यासाठी बापू काही मागील प्रवचनात कळकळीने सांगत आहेत. कदाचित आपण ही ज्या गोष्टींना सामोरे जाणार आहोत त्यासाठी ही अवघाची सुखाचा संसार आपली ताकद असेल. आपली श्र्द्धावानांची कुटुंबे देखील आशिच असायला हवी.

मी गेल्या दोन दिवसात दोन लागोपाठ नवीन “बेबी” आणि “हॉलिडे” हे चित्रपट पाहीले. लागोपाठ पाहिले असल्याने असेल कदाचित परंतु हे दोन्ही चित्रपट पाहताना चित्रपटाच्या नायकाचे देशप्रेम, कर्तव्य कठोरता डोक्यात चांगली भिनली. कुठेतरी हे चित्रपट पाहताना हे अग्रलेख डोक्यात फिरत होते. आणि आजच्या अग्रलेखात हार्मिस, अपोलो, लेटो हे सगळेच मला या नायकाप्रमाणे भासू लागले. किंवा तो नायक यांच्या सारखा वाटू लागला. नायक म्हणणयापेक्षा सैनिक.

हे सारे सैनिकच आहेत. आणि ते कसे आहेत हे बापू आपल्याला या अग्रलेखांच्या मार्फत दाखवत तर नसतील ना!!!! आपण सारे वानारासैनिक आहोत. मग आपण कसे असायला पाहीजे हे तर बापू दाखवत नसतील ना!!! असा विचार माझ्या मनात आला.

आपल्याच डोळ्यासमोर आपल्याच माणसांची दुर्दशा पाहून, अत्यंत खचून जाऊनही संयमी राहण्याचा प्रयास करणार्या व अशा परिस्थितही आपले “व्रती” व “सावर्णी” पंथाचा विचार करणार्या हार्मिसला माझा सेल्युट.

हार्मिस आपल्याला वानरसैनिकाचे धडे देतोय असा मला वाटले. जसी हानी होऊ नये म्हणून आपण काळजी घेतो तसेच रडत बसण्यापेक्षा झालेली हानी उलटून टाकण्याची धमक आपण ठेवायला हवी. मग ही हानी कोणत्याही पातळीवरची असो.

– रेश्मा नारखेडे