Demeter and Bijoymalana

#72876

Yogindra Joshi
Participant

गुरुवार दिनांक २५ डिसेंबर २०१४ रोजी दैनिक प्रत्यक्ष मध्ये प्रकाशित झालेल्या बापुंच्या अग्रलेखात ‘पहाटेच्या सौम्य प्रकाशाची जपणूक’ सम्राज्ञी बिजॉयमलानाने(Bijoymalana) कशी केली या रहस्याची उकल झाली. बापुंच्या द्वारे लिहिली जात असलेली ही अग्रलेखमालिका प्रत्येक लेखाबरोबर अधिकाधिक उत्कंठावर्धक होत आहे आणि त्याचबरोबर आजपर्यंत आम्हाला अज्ञात असणार्या माहितीच्या खजिन्याची नवनवीन दालने उघडून देत आहे. इनाकाच्या माहितीयंत्रावर ग्रीसमधील राजवाड्यात असलेली सम्राज्ञी अल्केमिनी दिसू लागते आणि तिच्या शेजारी उभी असते सॉरेथसची पत्नी अर्थात् बिजॉयमलाना आणि झियसची सून ‘आर्यश्री’(Aryashri)!
‘इऑस’ व तिचा पती ‘इथर’ हे आर्यश्रीचे मातापिता येथे ज्ञात होतात.
सम्राज्ञी बिजॉयमलानाने ‘पहाटेच्या सौम्य प्रकाशाची’ म्हणजेच ‘इऑस’ व ‘इथर’(Ether)ची काळजी घेतली आणि तीही कुणालाही थोडीसुद्धा शंका न येऊ देता, हेदेखील आम्हाला येथे कळते.
हे कळताच डेमेटर(Demeter) बिजॉयमलानाचा हात हातात घेऊन म्हणते, ‘‘हे बिजॉयमलाना, हैय्यवॉनस व वसुंधरेवर ह्या ‘पहाटेच्या सौम्य प्रकाशाची’ तू जी काळजी घेतलीस तिला तोड नाही. कुणालादेखील ह्या तुझ्या शब्दांचा अर्थ ‘इऑस’ व ‘इथर’शी जोडणे शक्य नव्हते.
लेटोसुद्धा म्हणते, “ हे सम्राज्ञी बिजॉयमलाना, माझ्यापेक्षाही गुप्त कारस्थान करण्यात तू अधिक प्रवीण आहेस.”
डेमेटर आणि लेटो या दोघींचे हे बोल बिजॉयमलानाचे अतुलनीय युक्तिसंपन्न असे व्यक्तिमत्व आपल्यासमोर उभे करतात. खरोखरच सम्राज्ञी असावी तर अशी हा विचार वाचकांच्या मनात येतो.
बिजॉयमलानाबद्द्लचा आदर आणखी वाढतो तो बिजॉयमलानाने आचरण वाचून. अग्रलेखात म्हटले आहे की हे सर्व ऐकताच बिजॉयमलाना फक्त आदरपूर्वक माता सोटेरियाचे व महादुर्गेचे स्मरण करून एवढेच म्हटले, ‘‘मी काहीच केले नाही. त्या महादुर्गेनेच अर्थात ‘मॅग्ना थेमिस’नेच सर्वकाही करून घेतले व महामाता सोटेरियाने आणि थियाने मला हात धरून सर्व शिकवले.’’
बिजॉयमलानासारखी श्रद्धावान सम्राज्ञी मिळणे हे झियसचे आणि निंबुरावासीयांचे भाग्यच म्हटले पाहिजे कारण तिच्यामुळेच महादुर्गेच्या कृपेचा स्रोत त्यांच्यासाठी उपलब्ध राहिला.
तसेच एक महान व्यक्तिमत्व आहे हर्क्युलिसचे! आर्यश्रीला ग्रीस देशात पोहोचलेले पाहून झियस म्हणतो की हे आर्यश्री, तू सुखरूपपणे तेथे जाऊन पोहोचलीस ह्याचा खूप आनंद होत आहे. तुला ग्रीस प्रदेशात सुखरूपपणे पोहोचविण्याचे कार्य केवळ हर्क्युलिसच करू शकतो.
हर्क्युलिसबद्दलचे हे झियसचे बोलच हर्क्युलिसचे सामर्थ्यवान व्यक्तिमत्व स्पष्ट करते. हर्क्युलिसच्या जबरदस्त कर्तृत्वाचा आलेख अग्रलेखांमध्ये आजपर्यंत उंचावतच जात आहे.
आता हर्क्युलिस पुढे काय पुरुषार्थ करतो याकडे लक्ष लागले आहे.

ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञll