Demeter, an ardent devotee

#117720

Sailee Paralkar
Participant

अग्रलेख १७४ वर आधारित सचिनसिंह, मौशमीवीरा, निनादसिंह, रेश्मावीरा, मिहीरसिंह तुम्ही जे विचार मांडले आहेत ते मला अगदी बरोबर वाटतात, हजारो नेफिलीम बघून मला तर “मातृवात्सल्यविंदानम ” मधील रक्तबीजाचीच आठवण येते. एकंदरीत सगळे भयानक घडणाऱ्या घटना बघता हे लक्षात येते की कितीही सच्चा श्रद्धावान असला तरी त्यांच्या आयुष्यात कोणतेही चमत्कार मोठी आई घडवत नाही अथक प्रयासानंतरच त्यांना विजय प्राप्त होतो.

सच्चा श्रद्धावान किती शूर असतो ह्याचे अतिशय उत्कृष्ट उदाहरण म्हणजे डेमेटर (Demeter). डेमेटर थाडा बनून डुकराचे मुंडके हातात घेऊन फिरत होती. आणि विशेष म्हणजे ती सर्वांना खरोखर थाडाच वाटत होती इतक्या चतुराईने ती वावरत होती. तर माता ह्रिया (Rhea) दुखाने वेडी झालेली दिसत होती म्हणजे वेडी असेलच असे नाही कदाचित वेड लागल्याचे नाटक देखील करत असेल. ज्या अर्थी सम्राट झियस जराही न डगमगता अतिशय शांतपणे व अतिजलद वेगाने सर्व व्यवस्था करू लागतो ह्याचा अर्थ ते सर्वजण सुरक्षित असले पाहिजेत.

आता वेध लागले आहेत रविवारच्या अग्रलेखाचे.…….