Dellusion Circle

#342124

ketaki. Kulkarni
Participant

हरी ॐ
आजच्या अग्रलेखात एक वाक्य आहे की..” सॉलोमनने हॉरेमाखेतच्या सहाय्याने निर्माण केलेल्या भ्रमवलयामुळे (Dellusion Circle) शुक्राचार्य व निक्सला ती ‘मूळ’ स्फटिकनलिका कुठे आहे ते शोधताच येत नाही”…
इथे एकदम आठवले ते आपल्याला बाप्पाने सांगितलेले π वरचे प्रवचन.. हे भ्रमवलय म्हणजे नक्कीच कधीही पूर्ण न होणारे वर्तुळ असावं.. आणि जेव्हा वर्तुळ पूर्ण होत नाही तेव्हा तिथे सुख कधी असुच शकत नाही.
बाप्पाने एका प्रवचानात सांगितल्याप्रमाणे त्रिविक्रमाचं स्थान हे आपल्या प्रत्येकाच्या आतमधे आहेच मग तो श्रद्धावान असो की श्रद्धाहीन.. आणि हे स्थान म्हणजे CIRCLE OF WILLIS… इथे या स्थानात फक्त चांगल्या आणि पवित्रच गोष्टी स्वीकारल्या जातात. रामासहित हनुमंत म्हणजे त्रिविक्रम आणि ह्या त्रिविक्रमाचे हे स्थान! पण जर मला ह्या चांगल्या गोष्टी स्वीकारायच्या असतील तर त्यासाठी गरजेचे आहे ते म्हणजे माझे आज्ञाचक्र locked असणे. आणि ते आपल्या मोठ्या आईच्या ताब्यात देणे.. ह्या circle of willis चा आणि आपल्या आज्ञाचक्राचा संबंध खुप महत्वाचा आहे.
श्रद्धाहिनांचे आज्ञाचक्र हे सैतानाच्या पायाशी जोडलेले असल्यामुळे त्यांना कुठलीच गोष्ट कधी मिळू शकत नाही आणि मग ते अजुनच अघोरी कृत्य करून ते मिळवायच्या मागे लागतात.. जसे शुक्राचार्य, सर्की ह्यांसारखे श्रद्धाहीन करत आहेत..
श्रद्धावानांच्या आयुष्यामधे ती मोठी आई, त्रिविक्रम बाप्पा, हनुमंत बाप्पा सतत हे वर्तुळ पूर्ण करण्याचा प्रयास करत असतात. पण श्रद्धाहिनांच्या आयुष्यात मात्र हे असेच भ्रम निर्माण होत राहते..
इथे उदा. सर्किचेच घेतले तर लक्षात येईल की अत्यंत बुद्धिमान, तरबेज, अनेक कौशल्य असूनही ती तड़फड़तेच् आहे. कैदेतून स्वतःची सुटका करून तिने घेतली खरी पण आता तर स्वतःची ओळखही गमावून बसली आहे. तिच्या जनुकांमधेच बदल घडवून आणल्यामुळे ती आता स्वतःला सर्की म्हणून कधी prove ही करू शकणार नाही.. पण एवढे असूनही तिचा अजूनही असाच भ्रम आहे की आपण एकटी सर्व सत्ता मिळवू शकतो. ह्याचे कारण हेच की तिचे आज्ञाचक्र पूर्णपणे सैतानाच्या ताब्यात आहे. त्यात तिला असे वाटत आहे की आपली खबर कुणालाच नाही परंतु आपल्या श्रद्धावानांना तर तिची एकूण एक खबर आहे. आणि ह्याच कल्पनेत ती अधिकाधिक अडकत आहे..
म्हणून मला माझे आज्ञाचक्र ह्या त्रिविक्रमाच्या, मोठ्या आईच्या ताब्यात देणे किती आवश्यक आहे ते कळून येतं.. नाहीतर सर्की सारखी ‘ना घर का ना घाट का’ अशी अवस्था होण्यात काही वेळ लागणार नाही..

तेच दुसरीकडे आजच्या अग्रलेखातील अजुन एक गोष्ट.. जी खरं तर अत्यंत हास्यास्पद आहे.. ती म्हणजे जाहबुलॉनला जन्म देण्यासाठी त्या नीच लोकांना गरज आहे ती महादुर्गेश्वर लिंगाच्या राखेची..खरच हसू आवरत नाही हे वाचून.. सैतानाला जन्म देण्यासाठी सुद्धा ह्या लोकांना परमात्म्यच्या गरज भासते आणि तरीही हे स्वतःला ‘देव’ म्हणून घेतात. स्वतःचे सामर्थ्य काय आहे हे जाणून सुद्धा ह्या मुर्ख लोकांना समजत कसं नसतं!!
आणि ज्याअर्थी महादुर्गेश्वर लिंगाची राख मिळाल्यावरच जर जाहबुलॉनचा जन्म ‘नीट’ होउ शकतो तर मग जाहबुलॉनचा जन्म होउच कसा शकेल??? कारण महादुर्गेश्वर लिंगासारखी अतिपवित्र गोष्ट अशा श्रद्धाहिनांच्या हाती लागणे ही केवळ अशक्यप्राय गोष्ट आहे..
– केतकीवीरा कुलकर्णी