concentration and observation power of Hercules

#172823

Sailee Paralkar
Keymaster

॥ हरि ॐ ॥

२६ मार्च २०१५ चा अग्रलेख….तुलसीपत्र – १०९४ म्हणजे प्रचंड वेगाने घडणार्‍या घटना वाटत होत्या. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच पुढचा क्षण आणखीन काहीतरी भन्नाट वास्तव दाखवणारा असतो. अनिरुद्ध बापू (Aniruddha Bapu) आपल्या अग्रलेखांमधून समोर आणत असलेला इतिहास अनेक गोष्टींवर विचार करायला भाग पाडतो. तुलसीपत्र – १०९३ व १०९४ मध्ये हर्क्युलिसचे (Hercules) प्रचंड सामर्थ्य, शौर्य आणि या सगळ्याचा आधार असलेली त्याची त्रिविक्रम (God Trivikram) व महादुर्गेवरील (Mahadurga) निष्ठा क्षणोक्षणी दिसून येते. महामाता सोटेरिया (Matriarch Soteria) म्हणते त्याचप्रमाणे हे धाडस केवळ हर्क्युलिसच (Hercules) करू शकतो. कोणत्याही थराला जाऊन स्वत:ला पूर्णपणे झोकून देऊन हर्क्युलिस पावित्र्याच्या रक्षणासाठी प्रयास करीत असतो. नाईल नदीचा (River Nile) अभ्यास करताना फक्त साडेतीन सेकंद एकत्र येणारे १२ रंगांचे पाणी कॉम्प्युटरवर हर्क्युलिसलाच दिसले. यातूनच त्याची concentration आणि observation power दिसून येते.

पाण्याच्या २०० फूट खाली असणार्‍या प्रचंड प्रयोगशाळेत जाऊन तेथील माहिती गोळा करणं किती कठीण काम आहे, हे अनिरुद्ध बापूंनी लिहिलेल्या वर्णनातून डोळ्यांसमोर उभं राहतं. अजगराशी हर्क्युलिसने दिलेली झुंज पण अक्षरश: थरारक वाटते…..आणि पुन्हा एकदा हर्क्युलिसला वाचविण्यासाठी त्रिविक्रम (God Trivikram) स्वत: प्रगट होतो आणि क्षणार्धात त्या अजगराचा नाश करतो.

श्रद्धावानावरील प्रत्येक संकट त्या अजगराप्रमाणेच असतं. त्या विळख्यातून बाहेर पडणं श्रद्धावानाच्या आवाक्याबाहेरचं असतं. त्यातून आपल्याला आपला सद्गुरुच (sadguru) …बापूच सहीसलामत बाहेर काढतात आणि प्रेमाने जवळ घेऊन धीरही देत असतात. अगदी प्रत्येक वेळेस. मात्र मला त्याच्याशी झुंज देण्याचे प्रयास करावेच लागतात. माझा सद्गुरु सर्वसमर्थ आहे, मग तोच काय ते करेल, असा विचार हर्क्युलिसने केला नाही, तो त्याचे कर्तव्य करतच होता. हेच बापूंनी या प्रसंगामधून सांगितले असावे, असा विचार मनात येतो. आणि हेच वारंवार घडत असतं……महादुर्गा (Mahadurga) आणि तिचा पुत्र काहीही करू शकतात….ज्याचा आपण विचारही करू शकत नाही.