Cold war has ended

#78915

Amitsinh Katwankar
Participant

इतिहासात आपण नेहमीच वाचतो की एका राजाने शत्रुराज्यात घुसुन त्यांचा शत्रुंचा बिमोड केला किंवा हेराने परकिय राज्यात राहून त्यांची माहिती कुशलतेने आणली. म्हणजेच पूर्वीच्या पुस्तकी इतिहासांमध्ये पुरूषप्रधान संस्कृती व त्या विषयाच्याच कथा वाचायला मिळतात. पण एखाद्या स्त्रीने किंवा सम्राज्ञीने अशा प्रकारे आपल्या शत्रुंना अद्दल घडवलेल्या गोष्टी फारच कमी आहेत.
खूप सुरुवातीला बिजॉयमलानाने(Bijoymalana) सॅथेडॉरिनाला (Circe)भुलवण्यासाठी “वेड लागल्याचे” नाटक रचले. सॅथेडॉरिना, क्रॉनस (Cronos)या धूर्त व चाणाक्ष मंडळींसमोर असे खोटे नाटक करून, ते सत्य असल्याची त्यांना जाणीव करून देणे ही काही सोपी गोष्ट नक्कीच नव्हती.
मागील अग्रलेखांमध्ये बिजॉयमलाना कद्रुच्या(Kadru) बिळसदृश्य गृहात शिरली व कद्रुला आंधळी करून तेथून बाहेर पडली. मला असे वाटते की या कद्रुच्या बिळसदृश्य गृहात बिजॉयमलानाला एकटी पाठवायला झियसचा पूर्ण पाठिंबा होता आणि यावरून सम्राट झियसचा(Zeus) बिजॉयमलानाच्या बुद्धीमत्तेवर व सामर्थ्यावर पूर्ण विश्वास होता हे दिसून येते. तसेच बिजॉयमलानालाही हा ठाम विश्वास होता की जरी मी तिथे एकटी असली तरीही महादूर्गा माझ्याबरोबर सदैव असतेच, त्यामुळेच ती न घाबरता न डगमगता या श्रद्धाहिनांबरोबर लढत होती.
आता असे जाणवते आहे की श्रद्धाहिनांचे श्रद्धावानांबरोबरचे Cold War संपून आता उघड उघड युद्धाला सुरुवात झाली आहे.