Circe manhandles Bijoymalana

#74745

Sailee Paralkar
Keymaster

हरि ॐ
सम्राज्ञी बिजॉयमलानाचे (Bijoymalana)व्यक्तिमत्व खरोखर विलक्षण आहे. सगळ्यात पहिल्यांदा निंबुरावरून बिजॉयमलानाच आली होती. ह्या सगळ्या ड्रुईड (Druid)पंथीयांची व त्यांच्या वाईट कारस्थानांची तिला कल्पना असावी असे वाटते. सॅथाडॉरिनाने (Circe) व तिला साथ देणार्‍यांनी बिजॉयमलानाला नजरकैद केले. मात्र त्या गोष्टीने जराही खचून किंवा घाबरून न जाता तिने स्वत:ला सावरले. सम्राट झियसशी(Zeus) contact झाल्यानंतर तिने वेडाचे नाटक करता करताच झियसला तिने निंबुरावरिल एक लोकगीत ऐकवले होते. यावरूनच तिची प्रसंगावधानता, सारासार विचार करण्याची ताकद आणि वेडाचे नाटक करून राज्याच्या हितासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी दिसून येते. तेव्हापासून आतापर्यंतचा बिजॉयमलानाचा प्रवास तिच्यातल्या कणखर व्यक्तिमत्वाचीच ओळख करून देत आहे. बापूंच्याव्दारे लिहिल्या जात असलेल्या या अग्रलेखांच्या मालिकेतून श्रध्दावानांनी कठीण प्रसंगांमधेही कसे वागावे याचे practicle उदाहरण बापू देत आहेत. बिजॉयमलाना ही आपल्या पतीला भक्तिमार्गाशी जोडून ठेवते. आपल्या प्रयासांचे सगळे श्रेय ती महादुर्गेच्या चरणी अर्पण करते. महामाता सोटेरिया आणि थियापाशीपण तिची कृतज्ञता व्यक्त करते. मागील अग्रलेखात बिजॉयमलानाचे सॅथाडॉरिनावर असलेले लक्ष, सून आर्यश्रीची काळजी आणि लेटोने म्हटल्याप्रमाणे गुप्त कारस्थान करण्यात असलेले प्रावीण्य यातून बिजॉयमलानाचे साम्राज्ञीपण वारंवार स्पष्ट होते.
खरंच योगिंद्रसिंह यांनी म्हटल्याप्रमाणे बिजॉयमलानासारखी श्रध्दावान सम्राज्ञी लाभणं ही झियस आणि निंबुरावासियांसाठी भाग्याचीच गोष्ट म्हटली पाहिजे. बिजॉयमलानाप्रमाणेच अन्य काही महत्वपूर्ण व्यक्तिमत्व या अग्रलेखांच्या मालिकेत येतात. मात्र व्रती आणि सावर्णि घराण्यातील महादुर्गेच्या भक्तिचा वारसा ही महत्वाची गोष्ट ठरते. बापूंनी उपनिषदामध्ये सांगितल्याप्रमाणे, दुष्ट दुर्जनांशी लढताना श्रध्दावान एकटा कधीच नसतो, तर संपूर्ण चण्डिकाकुल त्याच्या बरोबर असतेच……ही गोष्ट मनावर खोलवर रूजते.