Circe instead of Rhea

#118678

ketaki. Kulkarni
Participant

अहाहा!!
काय अग्रलेख आहे आजचा…
चित्र सगळ पालटवून टाकणारा आजचा अग्रलेख!
आपल्या सर्वांचेच अंदाज खरे ठरवणारा आजचा अग्रलेख!
आजच्या अग्रलेखात एक एक ओळ वाचताना.. woowww great…. असेच शब्द बाहेर येत होते..
मागच्या अग्रलेखामधे जेव्हा समजले की थाडाच्या रुपामधे डेमेटर आहे तेव्हाच संशय येउ लागलेला की इतक्या वाईट अवस्थेत माता ह्रियाला आणले जात आहे म्हणजे ही नक्कीच माता ह्रिया नसेलच… आणि yessss..आजच्या अग्रलेखामधे खरे काय ते उलगडले.. ती माता ह्रिया नसून सर्वात घाण असलेली, नीच असलेली, अशी सेथोडोरीना ( Circe )होती… तिची जीभ कापून टाकली गेली होती.. सही!
नंतर सम्राट झियस(Zeus)जो उतनापिष्टिम (Utnapishtim)म्हणून होता. तो त्या सेवकाना सांगतो की ‘ह्या कुत्रीस तिच्या अंधारकोठडित नेउन डांबा’
हे सर्व वाचताना बापुंचे परवा हिंदी प्रवचनातिल वाक्य आठवले.
” ये सब लोग कुत्ते की मौत मरेंगे”
बापुंचे एकेका प्रवाचानांचे खरोखर काय timing असते!!

इकडे डेमेटर(Demeter) स्मशान वस्तीकडे येण्यास सांगताना हर्मिसला सांगते..की कुठेही ही काहीही पाहिलेत तरी, जराही प्रतिक्रिया दाखवू नका!!
आणि खरोखर तिथे जाताना जेव्हा समोर सर्कीबरोबर प्रोमेथस व झिरोन ह्याना बघून हर्मिस प्रसन्न राहतो.. व त्याला ” महादुर्गा आपल्या पाठीशी आहे” ह्याची पूर्ण खात्री पटते..
एक क्षण विचार जर केला तर इतके सारे डोळ्यासमोर दिसत असताना खरी गोम ओळखणे किती अवघड असेल… पण इथे परत दिसून येते ते म्हणजे मोठ्या आईवर असलेला पूर्ण विश्वास!!
तिथे लिलिथभक्तांमधे (Lilith) बुँगी म्हणून वावरणारी माता सोटेरिया.. किती विलक्षण आहे हे सर्व काही!!
एक गोष्ट नक्की जाणवली की प्रत्येक वाईट ठिकाणी ही मोठी आई कुठल्या ना कुठल्या रुपात असतेच असते.. त्यामुळे त्या वाईट गोष्टीचा नायनाट हा ठरलेलाच असतो.. त्याचबरोबर तिथे जर कोणी श्रद्धावान तिथे काही कारणाने अडकला गेला असेल तर तिथे त्याला दिलासा देण्यासाठी मोठी आई असतेच!
जसे रावणाच्या कचाट्यात सीता असताना तिच्या सोबत तिला धीर देणारी त्रिजटा होती.. हनुमंत बाप्पला पूर्ण सहकार्य करण्यासाठी तिथे विभीषण होताच.
अगदी तसेच इथे हर्मिस, सोरेथस, अपोलो ह्यांच्यासाठी थाडा(डेमेटर) होतीच..

खर्या थाडाला किती आधीच मारले गेले होते हे आत्ता समजत आहे. पुझुझुला देखिल झियसने किती सफाईने मारले होते.. बापरे!!
काय plan केले असतील आणि ते कसे आम्लात आणले गेले असतील!
किती मेहनत घ्यावी लागली असेल ह्या सर्वांनाच.. ह्याचा अंदाज बांधणे ही खरच कठीण आहे..दिसते तितके सोपे हे नक्कीच नव्हते..
सम्राट झियस स्वतः सगळ्या चेटू व वेटू वस्त्या नीट पिंजून काढतो.. श्रद्धावान लोकांना ह्या वाईट लोकांमधे राहणे किती कठीण गेले असेल..
इथे आठवते ते अत्ता गुरुवारी केलेले बापुंचे प्रवचन..
ध्येय व ते पूर्ण करण्यासाठी लागलेली चिकाटी..
झियस, बिजोयमलाना, डेमेटर ह्यांची अफरोडाईट बरोबर झालेली बैठक.. व पुढे घडून आलेल्या ह्या सर्व गोष्टी!! पण हे सर्व घडवून आणण्यासाठी चिकाटीची पराकाष्टा गाठावी लागली असेल हे निश्चित..
इथे दिसून येतो तो ISNESS TO SUCHNESSचा प्रवास..
श्रद्धाहीन लोकांमधे राहताना जी परिस्थिति आहे ती स्वीकारली नाही तर ती नीट समजुन घेतली व त्यानुसार प्रत्येक हालचाली झियस, माता ह्रिया. वगैरे करत गेले..
आणि पुढे त्याचे उचित फळ आपण बघतच आहोत..
मोठ्या आईचे प्रत्येक श्रद्धावानासाठी उचित plan योजलेले असतात व ते तसे आपल्या आयुष्यात उतरवण्यासाठी आपल्याला ही सहकार्य करायला लागते हेदेखिल ह्यातून दिसून येते.. ते म्हणजे हर्मिसच्या वागण्यातुन..
जेव्हा प्रोमेथस व झिरोन ह्याना पाहून सोरेथस व अपोलो ह्याना संताप आलेला असतो पण तिथे जर त्यानी तशी प्रतिक्रिया उमटवली असती तर कदाचित नको ते झाले असते. आणि तेव्हाच बरोबर हर्मिस त्याना शांत राहण्यास सांगतो.. आणि मग पुढे सर्व सत्य उघड झाले.. पण त्या वेळी शांत राहणे किती आवश्यक होते.. व हे हर्मिसने जाणले होते..
हे जे काही अग्रलेखामधे येत आहे तो एक घडून गेलेला खरा इतिहास आहे व बापू प्रवचनातुन आणि side by side ह्या लेखमालिकेतून आपल्याला कसे वागायला पाहिजे हे किती छान शिकवत आहेत..
hatsss off to my Dad!!

आता ती बेशुद्ध अवस्थेतील जखमी वृद्ध स्त्री कोण… ह्याकडे लक्ष लागुन राहिले आहे..

अंबज्ञ
केतकीवीरा कुलकर्णी