Circe-a wicked personality

#264118

Sailee Paralkar
Keymaster

॥ हरि ॐ ॥

सर्की (Circe / Sathadorina)….सदैव कपटानेच वागणारे व्यक्तीमत्त्व (Circe-a wicked personality)

अग्रलेख १११० मध्ये सर्की (Circe)पळून जाण्यात यशस्वी झाल्याचा प्रसंग येतो. हा प्रसंग वाचून थोडा धक्कादेखील बसला. कारण प्रत्येक वेळी सावध असणार्‍या डेमेटरच्या(Demeter) लक्षात कसे आले नाही, असेही वाटले. सर्की (Circe)सावधपणे विचार करीत आपली पावले उचलते आणि अर्धमृतावस्थेत असलेल्या हरेन्नाखसला (Harennakhas) घेऊन तेथून पळ काढते. या सगळ्यामध्ये सर्कीने (Circe) खूप पूर्वीच केलेली तयारी लक्ष वेधून घेते. महालाची रचना, त्या गुप्त कक्षातील न्हाणी घरातील सामान अशा अनेक गोष्टी आधीच तयार होत्या. इतकेच नाही तर ती स्वत:च्या अंगावरील कठीण असलेले कवचही एका रसायनाच्या सहाय्याने केवळ काही क्षणांमध्ये काढून मोकळी होते.

पुढे सर्की साजूंच्या वस्तीमध्ये जाऊन आपले शोकाचे नाटक करून त्यांची सहानुभूती मिळवते. मनाने निर्मळ असणार्‍या साजू (Saju)लोकांनी आश्रय देताच सर्की त्यांच्यामधील दोन्ही स्त्रियांची हत्या करते. इतकेच नाही तर नंतर आणखी एका वृद्ध स्त्रीची हत्या करते (अग्रलेख १११३). वैद्य टॉलोपस (Tolopus) हा चिलेापसचा (Chilopus) भाऊ आहे, हे कळताच सर्की त्याच्या पत्नीलाही घरातून खाली फेकून देते. एकच सर्की केवळ आपल्या स्वार्थासाठी कुणाचाही जीव घेण्यास मागेपुढे पाहत नाही. ह्या सगळ्या गोष्टी वाचतानासुद्धा भयंकर वाटतात पण हे प्रत्यक्षात करताना सर्की सारखी स्त्री अत्यंत निर्घृणपणे अशी कृत्ये करते.

या सगळ्या प्रसांगांमधून काही गोष्टी ठळकपणे जाणवतात –
* नीच लोकांच्या कोणत्याच वागण्यावर कधीच विश्वास ठेवू नये. (सर्कीने केलेले आजारपणाचे नाटक) या लोकांच्या प्रत्येक कृतीमागे कारण असतेच.
* या लोकांची तयारी प्रसंग घडण्याच्या खूप पूर्वीपासून केलेली असते.
* ज्या लोकांनी आश्रय दिला त्यांनादेखील सहजपणे मारू शकतात.
* भोळेपणा मानवाचा चांगला गुण असला तरीदेखील आजूबाजूचे वास्तव माहिती नसणं, ही गोष्ट घातक ठरू शकते. साजू लोकांना सर्कीच्या कपटाचा साधा संशयही आला नाही. तिची कोणतीही गोष्ट किंवा हालचाल संशयास्पद वाटली नाही. सर्कीने दिलेले प्रत्येक कारण, सबब त्यांना पटली. नीच लोकं कायम भाबड्या लोकांचाच आधार घेत असतात.

इतकेच नाही तर स्वत:ची आई गमावल्यावरही वल्लाचे डोळे उघडत नाहीत. या लोकांनी आजूबाजूला चौकशी करून सावधपणा स्वीकारून पुढील गोष्टी टाळता आल्या असत्या असं वाटतं. बापू नेहमी सांगतात की नेहमी सावध असणं गरजेचं आहे. आजूबाजूचं वास्तव माहित नसणं म्हणजेच अंधार आणि अंधारातच कायम घात होतो. हे प्रसंग वाचत असताना बापूंचे (aniruddha bapu) हेच शब्द वारंवार आठवतात. मात्र महादुर्गेची (Mahadurga) आणि त्रिविक्रमाची (God Trivikram) भक्ती करणार्‍या श्रद्धावानाचा घात हे दोघे कधीच होऊ देत नाहीत.