Bijoymalana fights Kadru-Longmu

#85309

८ जानेवारी २०१५ च्या अग्रलेखामध्ये दोन घटना मांडलेल्या आहेत. एक आंधळी झालेल्या कद्रुची(Kadru-Longmu) कान उघडणी करणार्‍या निक्सची (Nyx)तर दुसरी निंबुरावर चाललेल्या युद्धात हर्क्युलस व अफ्रोडाईटच्या सहाय्याची. पहिल्या कथेत कद्रुला आंधळे केलेल्या या बिजयमालाच्या सदाचारी उपासनेचे बळ निक्स सांगते. उपासनेतूनच श्रद्धावानाला बळ मिळत असते हे इथे सहज सांगण्यात आले आहे व एक संपूर्णपणे भक्त असणार्‍या बिजयमालाची ( bijoymalana) ताकद देखील अधोरेखित केली आहे.

परमेश्वराला विरोध करणे हीच मूळ वृत्ती असणार्‍या या दुष्ट दुराचारी पंथाची ताकद सुद्धा अघोरी उपासनेतच आहे. त्यामुळे अनेक कथांमध्ये हे दुराचारी, असूर विविध अघोरी उपासना करताना आढळतात. जर या शत्रुंचा सामना करावयाचा असेल तर परमेश्वराची नित्योपासना, नित्य नामःस्मरण हाच तरणोपाय आहे.

तसेच महादुर्गेची (Magna Themis)क्षमाशीलता ही या अग्रलेखात नमूद केली आहे व याच्या परस्परविरोधी तत्त्व म्हणजेच क्षमा नसण्याचे तत्त्व या आसुरी पंथाचे आहे. एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे कळते…निक्स म्हणते की “त्यातच त्यांची उपास्यदेवता “महादुर्गा” क्षमाशील आहे. तर आपणा सर्वांचे सर्वोच्च उपास्य दैवत “अंकारा” ह्याच्याकडे अणुमात्रही क्षमा नाही व तशी ती आपल्याकडेही असता कामा नये कारण क्षमा आली की शिस्त बिघडलीच व शिस्त बिघडली की मानव विश्वासघात करू शकतो व ते आपल्याला परवडणारे नाही.” इथे आपल्या लक्षात येते की या श्रद्धाहीनांना “विश्वासघाता”ची भीती आहे त्यामुळे त्यांच्याकडे क्षमाशिलता नाही.
]
ह्या विश्वासघाताची भिती “महादुर्गा” व तिच्या पुत्रांकडे असूच शकत नाही. त्यामूळे कोणालाही क्षमा करणे तीला सहज शक्य आहे. तिनेच उत्पन्न केलेल्या तिच्या सृष्टीवर तिचा अगाध विश्वास असला पाहीजे म्हणूनच ती क्षमाशील आहे. कारण ती आणि तिचा पुत्र प्रत्येक जीवात्म्याचा उद्धार करणे ह्याचसाठी धडपडत असतात व तसे होईपर्यंत ते सबुरी ही धरतात. रावणाने तमाचार पंथ स्वीकारुन परमेश्वराचा विश्वासघातच केला, मात्र हाच विश्वासघात त्याचा आत्मघात ठरला. पण परमशीव हनुमंताने मात्र रावणाला अनेकवार सुधारण्याच्या सावरण्याच्या संधी दिल्या. शिशुपालाचेही १०० अपराध घडेपर्यंत श्रीकृष्णाने वाटच पाहीली आणि मग त्याची वाट लावली. महादुर्गेने मनात आणले तर तीच्या एका श्वासात ती सार्‍या असूरांना नष्ट करु शकते….पण ती असे नाही करत नाही…याचे कारण केवळ तीलाच माहीत असेल.

केवळ तिचा विश्वासघात करण्याचा विचार देखील करणे म्हणजे आत्मघात करणेच होय. त्यामुळे ती आणि तिचा पुत्र आहे आणि ते दोघेही सतत माझ्याबरोबर आहेत आणि ते दोघेही प्रेमळ आहेत… हा “विश्वास”च आपला उद्धार घडवून आणू शकतो…आपल्याला बलशाली करीत असतो….आणि आपल्याला संकटात सतत मदत धाडत असतो….आणि याचे उदाहरण लगेचच पुढच्या कथेत येते….जेव्हा पोसायडन, एरिस व ऍटलासच्या मदतीला हर्क्युलस (Hercules)आणि अफ्रोडाईट हे दोघेही धावून येतात..आणि त्यांचे रक्षण करतात. तेव्हा अफ्रोडॉईटने खूप महत्त्वाचे तत्व सांगितले….”वेळ पडल्यास युद्ध जिंकण्यापेक्षाही आपल्या चांगल्या प्रजेचे रक्षण करणे श्रेष्ठ असते हे लक्षात ठेवा….” चांगल्यावर वाईटांनी मात करणे असे जिंकण्याचे एकमेव ध्येय श्रद्धाहीनांचे असते तर जिंकण्यापेक्षाही श्रद्धेचे संरक्षण, श्रद्धावान मुल्यांचे संरक्षण, चांगल्या गोष्टींचे संरक्षण हे अत्यंत महत्त्वाचे असते व तो खरा व चिरंजीव विजय असतो.