Atlas is able to chant Durgakavya even in this fatal accident

Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) प्रारंभ Atlas is able to chant Durgakavya even in this fatal accident

#102460

Harsh Pawar
Participant

आणखी एक चित्तथारक अग्रलेख बापूंचा… आजच्या अग्रलेखाचा climax आपण वाचत नसून प्रत्यक्ष डोळ्यासमोर पाहत आहोत अस जाणावल.. हे माझ्या बापूंच्या लिखाणाचे कौशल्य आहे.. जमिनीच्या खाली असलेल्या आणि स्वतः अफ्रोडाइटने स्थापन केलेल्या महादुर्गेच्या(Mahadurga) मंदिरातून जेव्हा आशिया(Asia) आणि आटलस(Atlas) तेथील मूर्ति, प्रतिमा आणि पवित्र हवनकुंड घेऊन बाहेर पडतात तेव्हा त्यांच्या समोर निम्बुरावरिल (Nibiru)सर्वोच्च चेटकिण सेमिरामिस(Semiramis) हातात शस्त्रे घेऊन त्यांना ठार मारण्यासाठी उभी असते. आशियाला कळून चुकत की आता आपला मृत्यु निश्चित आहे.. पण अटलास अशा भयंकर परिस्थितीतही हार नाही मानत…
तो अफ्रोडाइटने(Aphrodite) त्याला सांगितलेली दुर्गाकाव्य मोठ्या आवाजात म्हणू लागतो आणि मग चमत्कार घडतो… एवढी वर्षे सेमिरामिसची मानसिक गुलाम असलेली पुलिका अटलासच्या मुखातून निघालेले दुर्गाकाव्य ऐकून पूर्णपणे भानावर येते आणि ती आशिया आणि अटलासला घेऊन तिथून पलायन करण्यात यशस्वी होते..
इथे आपल्याला पवित्र मंत्र, पवित्र काव्य, दुर्गास्तुती ह्यांची ताकद कळून येते.. …पुलिका गेली अनेक वर्ष सेमिरामिसच्या मननियंत्रणा खाली असते.. दुर्गाकाव्य तिच्या कानावर पडताच ती पूर्णपणे भानावर येते.. ” तेतु भक्तालागी पावसी लवलाही” ही line आठवली दुर्गेदुर्गटभारी ह्या आरतीमधली.. इथे ही पुलिकाला (Pulika)दुर्गामाता लवलाहीपणे पावली आहे.. दुर्गाकाव्य पुलिकाच्या कानी पडाव काय आणि तिची सेमिरामिसच्या मननियंत्रापासून पूर्णपणे सुटका होण काय सर्वकाही चुटकीसरशी घडल…
जीवावर प्रसंग ओढवलेला असतानाही अटलास दुर्गाकाव्य मोठ्याने उच्चारतो.. गुरुचरित्रातील १४व्या अध्यायमधला सायंदेव ब्राम्हण आठवला.. “भितोपि चकितो विप्रो दध्यो चित्तेन् सद्गुरुम्”…क्रूर यवनाला पाहुन जरी सायंदेव घाबरतो तरी त्याच्या मनामधे तो सद्गुरु नामस्मरण चालूच ठेवतो ( दध्यो चित्तेन् सद्गुरुम् )…
दत्तबावनी मधील ही एक ओवी आठवली: डाकण शाकण भेंसासुर, भुत पिशाचों जंद असुर.. नासे मुठी दैने तुर्त दत्तधुन सांभाळता मूर्त..
सेमिरामिस ही डाकण/चेटकिण आहे.. ती जेव्हा समोर येते तेव्हा अटलास हीच दत्तधुन मुखी सांभाळतो
in the form of दुर्गाकाव्य..आणि त्याचा बचाव होतो… बापू ही म्हणतात की कितीही मोठ संकट आल आणि कितीही मोठ्या भयानक प्रसंगात आपण अडकलो तरी लगेच आपल्या भगवंताचे नामस्मरण करायला सुरुवात केली पाहिजे..
ह्यावरून नामस्मरणाचे महत्त्व कळून येत..
one more thing to notice here is अटलास (Atlas)is able to chant दुर्गाकाव्य even in this near fatal incident with ease… म्हणजेच तो नित्य दुर्गाकाव्याचे पठण करत असावा.. समोर हातात शस्त्रे घेऊन आद्य चेटकिण उभी आहे तरी अटलासची बोबडी वळत नाही.. ह्यावरून नित्य उपासनेचे महत्त्व कळून येत..
Lastly पुलिका कशी लगेच बरी होते दुर्गाकाव्य कानी पडताच त्यावरून श्रीराम जेव्हा पाषाण झालेल्या अहल्या त्याच्या चरणांच्या एका नखाच्या स्पर्शाने पुन्हा सजीव करतात तो प्रसंग आठवला..पुलिका ही मननियंत्रणामुळे सेमिरामिसची गुलाम म्हणून एका पाषाणाप्रमाणेच तर जीवन जगत होती.. तिच्या कानी पडलेले दुर्गाकाव्य हे प्रभु श्रीरामाच्या नखाच्या स्पर्शाचेच काम करत अस मला वाटत..
दुर्गाकाव्य कानी पडताच पुलिका भानावर येते तर तेच काव्य कानी पडल्यामुळेच सेमिरामिसचा एक खास सैनिक खाली कोसळून पडतो आणि सेमिरामिस त्या सैनिकाला वाचवण्यासाठी पळते आणि पुलिका आशिया आणि अटलासला घेऊन फरार होते..
Clearly completely opposite effect of दुर्गाकाव्य can be seen over here…पुलिका regains her senses while one of the most crucial soldiers of सेमिरामिस faints..
पुलिका is the mother of आशिया ..basically a श्रद्धावान while the soldier of course is a दुराचारी…hence the opposite effect of the दुर्गाकाव्य on both
श्रीराम
हर्षसिंह