Atlantis was Aporojatus’s prime location

#92090

Yogindra Joshi
Participant

ll हरि: ॐ ll

१५-०१-२०१५

हरि ॐ. राजेन्द्रसिंह, शन्तनुसिंह, रेश्मावीरा आणि श्रीनिवाससिंह, तुम्ही सर्वांनी खूप महत्त्वाची माहिती दिली आहे. अंबज्ञ. अ‍ॅपोरोजाटसचे(Aporojatus) बलस्थान ही अ‍ॅटलांटिसा(Atlantis) नगरीच होती. या नगरीत त्याने महामस्तिष्क(Bronze head) ठेवले होते. पण अ‍ॅब्रॅक्ससच्या(Abraxux) अंत्यविधीच्या आदल्या दिवशी सकाळी अ‍ॅटलांटिसावर एक भूकंप झाला. त्यामुळे नगरीमध्ये काही विशेष नुकसान झाले नाही, परंतु त्या भूकंपाचा केंद्रबिंदू महामस्तिष्क असलेल्या पर्वताच्या खालीच होता व त्यामुळे महामस्तिष्क पूर्णपणे निष्क्रिय झाले. त्याच्या दोन खास सहाय्यकांच्या मते महामस्तिष्क दुरुस्त होण्यासाठी 6 महिने लागणार होते आणि त्यामुळेच त्याला भाऊ एपिमेथियसबरोबर(Epimetheus) शुक्राचार्यांपुढे नाक घासावे लागले, निक्सची थुंकी आणि जोडे चाटण्याची, तसेच बहुवाकाचे पाय चाटण्याची वेळ त्याच्यावर आली. अ‍ॅटलांटिसासारख्या नगरीचा शासक भिकारी झाला. करावे तसे भरावे हेच खरे. अ‍ॅपोरोजाटसची दुर्गती कशी होईल हे आपणास पुढील अग्रलेखांमधून स्पष्ट होईलच.
ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञll