Apt nature of King Zeus

#57088

Sachin Rege
Participant

हरी ओम्!

ही लेखमाला जेव्हापासून सुरू झाली आहे, तेव्हापासून त्यात वर्णिलेल्या घटनाक्रमामधील अदभुततेने मनाची चांगलीच पकड घेतली आहे.

ह्या अनुनाकीय (Annunaki) इतिहासातली विविध पात्रं जसजशी एकामागोमाग एक समोर येतात, तसतसे त्यांच्या स्वभावाचे अनेक कंगोरे उलगडण्यास सुरुवात होते. अनेकदा ह्या नित्य नवीन वळण घेणाऱ्या कथेमधील नवनव्या डिटेल्समुळे पात्रांविषयीची मतंदेखील बदलू शकतात.

उदा. : ह्यांपैकी सम्राट झियोनॉदसचं(Zeus) पहिलं वर्णन – हा नास्तिक असला, तरीदेखील न्यायी व नीतिमान असणारा, सद्गुणांची आवड असलेला, परंतु स्वभावाने अत्यंत तापट व शिस्तप्रिय असणारा असं आहे. ह्यावरून त्याच्याविषयी आपलं जे मत बनतं ते हळूहळू जसजशी ही कथा उलगडत जाते, तसतसं बदलत जातं.

सुरुवातीच्या कथानकावरून असं वाटलं होतं की हा एक भीडस्त मनुष्य असून समोर येईल त्याला मान तुकवत राहतो. त्याचबरोबर दुराचारी व कपटकारस्थानी असणारी त्याची पत्नी सॅथाडॉरिना(circe)ही त्याला तिला हवी तशी नाचवत राहते.

परंतु आज कथानकाच्या ह्या वळणावर, तो ह्या कथानकातील दुराचाऱ्यांच्या विरुद्ध लढताना जसा ‘ठकास महाठक’ बनताना दिसतो, ते पाहिल्यावर वाटतं की त्याचा तापटपणा कदाचित एका सत्ताधीशाला आवश्यक असणारा, अन्यायाबद्दलच्या चीडेतून उद्भवणारा तापटपणा असेल का? ज्या सम्राटाने आपल्या आयुष्याचा दीडशे वर्षांपर्यंतचा काळ निंबुरावरील (Nibiru) दुराचाऱ्यांचा बीमोड करण्यात घालवला व त्याकारणाने विवाहदेखील केला नाही, तो अनाठायी तापट असू शकत नाही असं वाटतं.

असे अनेक पैलू हे कथानक परत परत वाचताना आपल्यासमोर येतात.

अंबज्ञ.