Aphrodite saves Athena

#97517

Naina Tushar
Participant

हरी ओम

बापूंचा रविवार दिनांक १८.०१. २०१५ रोजीचा अग्रलेख त्या सद्गुरु तत्वाचे अकारण कारुण्य दाखवून गेला .

अथेना नादन च्या हल्ल्यामुळे निष्क्रिय होऊ लागते प्रयास म्हणून ती तिच्या हातातील मुद्रे मधील कळ दाबते जी तिला ७ वेळा दाबायची असते . पण ती ३ वेळच दाबू शकते.
इथे ती अर्कविद्या शिकविणार्‍या माता सोटेरियास (Soteriya)आणि माता थियास (Thea)प्रणाम करते आणि निंबुरावर एकदाच पाहिलेली “महादुर्गेची” (Mahadurga)प्रतिमा तिच्या डोळ्यांसमोर तरळू लागते .
ती ३ वेळच कळ दाबते तरीही अ‍ॅफ्रोडाईट (Aphrodite)आणि हर्क्युलिस(Hercules) तिच्या मदतीला धावून येतात हीच ती त्या मोठ्या आईची करुणा

आपले बाळ संकटात आहे हे कळताच ती धावत येते (मदत पाठवते)
तुम्ही एक पाऊल टाकले कि ती आई / तो सद्गुरु धावत येतोच आपल्या मदतीसाठी ९९ पावले टाकून ….

जिथे सर्व काही निकामी होते तिथे अ‍ॅफ्रोडाईट चा स्पर्श आणि शब्द काम करतात , इथे मला बाबांची आठवण होते साई चरित्रामध्ये आपण बघतो कि बाबांचे शब्द कसे मोठ्या मोठ्या संकटाना परतवून लावतात. शिर्डी वर जेव्हा संकट ओढवते (अध्याय ५ वा) प्रचंड वर्षाव , वारे वाहतात तेव्हा बाबाच त्याच्या भोळ्या भक्तांसाठी त्या संकटाशी लढतात. मला इथे ती गोष्ट आठवते .
आपले बाल संकटात आहे हे जाणण्यासाठी तिला कोणत्याही कळीची आवश्यकता नसतेच मुली .

इथे अथेना च्या आत्मविश्वासाचे आणी तिच्या विश्वासाचे श्रद्धावानांना मदत करण्यासाठी करत असलेल्या प्रयासाचे फार कौतुक वाटते .
आज बापू आपल्याला हा इतिहास सांगतायत त्यात खूप काही शिकायला मिळते .

बिजोयमलाना (Bijoymalana) (सारखी श्रेष्ठ भक्त कद्रू सारख्या राक्षशीला एका क्षणात आंधळे करू शकते . हि शक्ती तिच्या भक्तीची , तिच्या सद्गुरू / मोठ्या आईवरील विश्वासाची ताकद आहे.

यात नेहमी एकाच गोष्ट लक्षात येते “रावण वधः निश्चित : ” , कुकर्मी आणी श्रद्धाहीन लोक कितीही बलवान, धनवान असले तरीही ते श्रद्धावानांचे काहीही बिघडवू शकत नाहीत.
जो दिव्या स्तंभ सापडतो तो श्रद्धावानानच कारण श्रद्धाहीन त्याचे अस्तित्व सुद्धा अनुभवू शकत नाहीत.

******************************************************************************************************************************************************************

अ‍ॅफ्रोडाईट आणी हर्क्युलिस यांची प्रेम कथा हा कहाणी मे TWIST आहे. या पूर्ण उलथापालथी मध्ये त्यांचे प्रेम आणी एकमेकांसाठी असलेली आपुलकी पाहून खरच समजत कि प्रेम कस असाव कस कराव 🙂
*******************************************************************************************************************************************************************
अ‍ॅफ्रोडाईट नुईत(Nuit) आणि पान (Pan Hadit)यांच्याशी कपटाने वागते. यात दिसून येते कि श्रद्धाहीन कधीच कोणाचेच नसतात त्यांना फक्त स्वतः ची पडलेली असते. मी कसा / कशी श्रेष्ठ ठरेन यासाठीच त्यांचा खटाटोप चालू असतो . आणी त्यांचा देवही तसाच ज्याच्याकडे अजिबात क्षमा नाही. हि अशी लोक कधीच कोणाची नसतात.
त्यांचे किळसवाणे प्रकार आणी उपासना वाचूनच वाटते “बापुराया !!!! तू आहेस म्हणून असले काहीही कधीच आमच्या वाट्याला आले नाही आणि येणारही नाही कारण ते यायच्या आधीच तू ते संपवलेले असशील.”

अम्बज्ञ
नैनावीरा शेलार