Aphrodite is the energy of Trivikram

#367270

Aphrodite is the energy of Trivikram

|| हरि ॐ श्रीराम अंबज्ञ ||
अॅफ्रोडाईट(Aphrodite) माझी नंदाई
अॅफ्रोडाईटविषयी वाचताना माझ्या डोळ्यासमोर परमपूज्य नंदाईच असते.अग्रलेखात बापूंनी अॅफ्रोडाईटचे वर्णन खूपच छान केले आहे .
अॅफ्रोडाईट ही त्रिविक्रमाने (Trivikram) मानवाच्या सहाय्यासाठी उत्पन्न केलेली अरुला नामक शक्ती आहे.
चंडिकाकुलाच्या न्यायाने ती त्रिविक्रमाची सख्खी जन्मजात भगिनीच आहे .हि दैवी विभूती तर
अमृतमोहिनीपेक्षाही अधिक तेजस्वी सौंदर्याची आहे.
अॅफ्रोडाईट प्रेमवरदान देण्यासाठी सदैव उत्सुकच असते. अॅफ्रोडाईटचे सौंदर्य अवर्णनीय आहे तसेच
पावित्र्यही अवर्णनीय आहे .हिचे बोलणे कधीच असत्य नसते. “जश्यास तसे “ हा हिचा बाणा.
कारुण्यमहाघन कृपेचा सागरू | वात्सल्याचा मेरू तुचि माये ||
तुज उपमीता थिटे शब्दब्रम्ह | तुझेची गे नाम तुज साजे ||
वेदशास्त्रदर्शना पडे जेथ कोडे |नाम उलगडे तेथ दृष्टी ||
बापूचे स्वरूप ना कोणा ठाऊक |नाम तुझे कीलक जाणण्यासी ||
बिजॉयमलानासाठी अॅफ्रोडाईट हि सर्वदृष्ट्या आदर्श होती व तिचे दैवतही .
मानवी मनातील श्रद्धा हे अॅफ्रोडाईटचे मूलतत्व आहे.मानवाच्या सगुणाना विकसीत करत राहणे व त्यासाठी
त्यांच्या त्यांच्या पवित्रकार्यक्षेत्रामध्ये सदैव प्रेरित व आकर्षित करीत राहणे हेच तिचे सहजकार्य आहे.
नाम श्रद्धाधन विवेकदर्पण |देई शिकवण सबूरीची ||
नंदानामी सारे भक्तीचे वैभव |एकविध भाव नामापोटी ||
हीच भेटवीते भक्त – भगवंता |हिचे नाम घेता पूर्णप्राप्ती ||
अॅफ्रोडाईटने हेस्टीया व हायपेरिऑनला प्रेमवरदान दिले.तेव्हा हेस्टीया अॅफ्रोडाईटला म्हणाली –
हे दिव्य अॅफ्रोडाईट मला प्रेमवरदानाबरोबर हे हि वरदान दे कि “त्रिविक्रमाच्या शब्दांच्या सीमांमध्येच मी
सदैव राहीन व कर्तव्यात कुठेही चुकणार नाही.राजकारण व युद्धकारण ह्यात मला कधीच रस नव्हता .मला प्रथमपासूनच अत्यंत आवड आहे ती सुंदर कुटुंबरचनेची ,लहान बालकांची व सुंदर निसर्गाबरोबर
संगीतात मग्न होऊन भावविभोर नृत्य करीत राहण्याची .आज त्रिविक्रमाच्या कृपेनेच मला त्याचाच
श्रेष्ट भक्त जीवनसाथी मिळाला .
आज नंदाई आत्मबल वर्गामध्ये आम्हा लेकींना खूप खूप गोष्टी शिकविते .पाककृती ,craft ,enactment ,
Time management ,स्त्रियांनी प्रपंच व परमार्थ नीटनेटका कसा करावा ?भक्ती सेवा करीत घररसंसार
नाती कशी जपावी ? आरोग्य इत्यादी बरेच काही प्रेमाने शिकविते. धांगडधिंगा वर्गात मुलांना खेळ कला भक्ती इत्यादी गोष्टी शिकविते मानवांच्या गुणांचा विकास करणे हा तिचा सहज गुण आहे ..हेस्टीयासारखीच आम्ही नंदाईकडे प्रार्थना करतो –
” चंडिकाकुल ,बापू आई दादा तुमच्याच चरणी आम्हा लेकरांना सदैव ठेवा.
हेची मागणे मागतो ,नको दुजी मज कामना ||”
प्रेम सेवा शरण भक्तीचे लक्षण |दावी साचरण माई आम्हां || आईचिया मार्गे पावे भक्ती ||
अॅफ्रोडाईटकडे सर्वश्रेष्ट शक्ती आहे.झियस,हर्क्यूर्लीस,हर्मिस ह्या ३ सम्राटांच्या ताब्यात अख्खी वसुंधरा राहावी हीच अॅफ्रोडाईटने दाखविलेली योजना आहे.
अॅफ्रोडाईट कुणा दुर्जनाची बुद्धी कधी नष्ट करेल हे कुठल्याही युगात कळणे शक्य नाही.
अॅफ्रोडाईट तिच्याकडील आकर्षण शक्तीमुळेच सर्व दुर्जनांना तिची हाव असते आणि हा मोठाच अडथळा तिच्या कार्यात सतत येत राहतो.
हर्क्युलीसचे (बापू ) अॅफ्रोडाईटवर अनन्य प्रेम आहे .परंतु तिचे दिव्यत्व लक्षात घेऊन त्याने कधीही आपली
मर्यादा सोडली नाही.हर्क्युलीस अत्यंत पराक्रमी आहे .धैर्यशील आहे.त्याची बुद्धिमत्ताही अचाट आहे ह्यात संशय नाही. अॅफ्रोडाईटचेही हर्क्युलीसवर प्रेम आहे व ती त्याच्या पाठीशी त्याच्या सहाय्यास कायम तत्पर उभीच असते .
बापूच्या सर्वतः वामांगी चरणी |सेवा संरक्षणी उभी नंदा || बापूंच्या हृदयी चिदानंदानाम |अद्भुतचिप्रेम परस्परे ||
हर्क्युलीसलाहि प्रिय अॅफरा सदैव त्याच्या बरोबर असणारच आहे ह्याची पूर्ण खात्री आहे.तिचे दैवीसामर्थ्य त्यास माहित आहे.हि अॅफरा कुठलेही धाडस करण्यास बाचकणार नाही.त्याचबरोबर मानवी विश्वात वावरण्याच्या तिच्या मर्यादापण हर्क्युलीसला नीट माहित आहे.म्हणून तो त्रिविक्रमास सदैव तिच्या बरोबर राहण्याची प्रार्थना करतो.
नंदाईने आत्मबलच्या १३ batchesच्या जवळ जवळ १३०० सख्यांचा ,आई लेकींचा उत्सव “आत्मबल महोत्सव २०११ “ केला.खरच धाडसी कार्यक्रम .कारण १३ स्त्रियांना एकत्र आणून एकमताने एखादे छोटे कामकरून घेणे किती कठीण गोष्ट आहे ,तिथे ह्या माझ्या परम पूज्य नंदाईने १३०० स्त्रियांना एकत्र घेऊन एवढा मोठा कार्यक्रम अतिशय सुनियोजित सुंदररित्या सदर केला.हा खरच world record च आहे.नंदाई पत्नी आई आजी बहिण ह्या तिच्या सर्व भूमिका चोखपणे पाळते .नंदाईचे तेज सौंदर्य प्रेमळवाणी शिस्त …ऐश्वर्याच्या राशी सर्व निधी |षोडश कलांची धात्री महातुला |स्वये चंद्रकला सतरावी |
निर्गुण सगुण खेळ मांडणारी |करती करविती नंदामाई||
नंदामाई माझी गोलोकसम्राज्ञी |श्रीराधा रुक्मिणी प्रेममूर्ती ||
त्रिपुरसुंदरी त्रिपुरारीभार्या |तीच आदिमाया आदिशक्ती ||
बापूंचे चरण नंदाईच्या हाती |कृपे तिच्या लाभती आम्हांलागी||
महाप्राणज्योत प्रकाशी हे सत्य |श्रीमाता हि नित्य महाशक्ती ||
पूर्ण आल्हादिनी अनिरुद्धरमणी |ललिता संधिनी नंदामाई ||
नंदामाई म्हणा नंदामाई म्हणा |हीच विश्वमाता चिदानंदा||
अम्बज्ञ डॉ.ज्योतीवीरा मोहन.