Aphrodite and Zeus

#158185

Sangita Vartak
Participant

हरि ॐ,
दि १ मार्चचा अग्रलेख खरचं खूपच थरारक व श्वास रोकून ठेवणारा असाच होता…. हा अग्रलेख वाचताना संपूर्ण प्रसंग समोर उभा झाला….. फक्त प्रसंगच समोर उभा झाला असे न वाटता त्याबरोबरच आपण तो प्रसंग प्रत्यक्ष अनुभवत असल्याचे जाणवत होते…. त्या भितीची जाणिवही अनुभवली…. प्रत्येक ठिकाणी झियसची (Zeus) हुशारी, सावधानपणा, संयमी, शेवटपर्यंत प्रयत्न करण्याची चिकाटी आणि महत्वाची भक्ती असे अनेक गुण अनुभवले…..

अ‍ॅफ्रोडाईटने झियसला केलेली प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे केलेली मदत मला विशेषत: जाणविली अ‍ॅफ्रोडाईटने (Aphrodite) झियसला वेळॊवेळी केलेले मार्गदर्शन त्याच्या कठीण समयी [जाहबुलॉनचा (Devil – Jahbulon) शोध घ्यायला दनुच्या गुहेत (cave of danu) गेला असताना] कसे उपयोगात येते ते दिसले….

I) अ‍ॅफ्रोडाईटने झियसला दनुच्या गुहेत अंधार करणारा दिप असतो असे आधीच सांगितले होते ज्याचा त्याला पुढे मार्ग काढण्यास उपयोग झाला.

II) अ‍ॅफ्रोडाईटने झियसला गरूड्पंथाच्या राजाचा वेष करून जायला सांगितले त्यामुळे त्याला खालील बाबतीत त्याचा फायदा झाला.
१) काचेची नलिका – ज्याच्यामुळे नंतर त्याला अंधारात विजेरीचा उपयोग झाला.
२) एथिडियम (Ethidium) – ज्याचा फवारा मारल्याने तो विजेच्या प्रवाहापासून स्वत:चे संरक्षण करून घेऊ शकला.
३) गरूड नाक – ज्यामुळे तो जहाबुलॉनच्या जळत्या डोळ्यातून येणार्‍या घानेरड्या दर्पाच्या धूरापासून बचाव करू शकला.

III) जिकडे मानवी प्रयत्न कमी पडतात तिथे मदत करणारा महाप्राणाच्या जपबाबतही संगितले होते

IV) शिवाय जेथे झियसचे प्रयत्न कमी पडतात तेव्हा त्याच्य मदतीला हर्क्युलिसला घेऊन हजर राहीलीच….

V) एवढेच नाही तर शेवटी स्वत:च्या अलंकारतील एक मोती काढून जहाबुलॉनच्या अंगावर फेकला त्यासरशी तो परत एकदा दनुच्या आसनामध्ये कोंडला जातो.

आहाहा काय तो झियस आणि धन्य ती अ‍ॅफ्रोडाईट….
अंबज्ञ….