Alcmene is vivid personality

#77611

Amitsinh Katwankar
Participant

विशाखावीरा, तुम्ही अल्केमिनी (Alcmene) विषयी जे मत मांडलय ते मलाही पटलं. मंगळवार दिनांक ३०-१२-२०१४ च्या अग्रलेखात सम्राज्ञी अल्केमिनीचे अजुन दोन महत्वाचे स्वभावगुण आपल्या समोर येतात.

१) लेटो (Leto) जेव्हा फॉसिस नामक दरीकडे जात असते तेव्हा तिला अल्केमिनी भेटते. पहिल्या शिखरावरून पठार सुरू होताच अल्केमिनी लेटोस शस्त्रसज्ज होण्याची सूचना करते व स्वतःची शस्त्रेही बाहेर काढते. पठाराच्या दुस‍र्‍या टोकाकडून एक हिंस्त्र मानवांचा जत्‍था खेचरांवर बसून जेव्हा दौडत येताना त्यांना दिसतो तेव्हा अल्केमिनी स्वतःच्या कंबरेस गुंडाळलेला एक विचित्र शेला लेटोच्या गळ्यात फेकते, लेटोच्या शरिराचा स्पर्श होताच तो विचित्र शेला एखाद्या चिलखताप्रमाणे लेटोच्या मस्तकापासून गुडघ्यापर्यंट घट्ट चिकटून बसतो.
या प्रसंगातून अल्केमिनीचा सावधपणा दिसतो व ती लेटोच्या संरक्षणासाठी किती तत्पर आहे हे कळते.

२) सेटप्रमुखाने फेकलेला काटेरी पेटलेला गोळा अल्केमिनी केवळ तिच्या उजव्या हाताने मध्येच अडवते व तसाच परत सेटूंवर फेकते. यामुळे अल्केमिनीचा हात चांगलाच भाजतो. तिच्या हातात असलेले स्फटिकाचे पातळ कवचदेखिल तिच्या हाता रुतून बसते तरीही तिच्या चेहर्‍यावर इवलूशीही वेदना नसते.
पावित्र्याच्या रक्षणासाठी स्वतःवर कितीही संकट झेलून घेऊन त्यांच्या समर्थमपणे मुकाबला करायला ही अल्केमिनी सदैव तयार असते.