#91852

आज वाटले होते की त्रिविक्रमाचे रहस्य अग्रलेखात उघडेल..पण बापू सांगतय वेगळचं…आणि खूप धक्कादायक. बापूंनी १५ जानेवारीच्या अग्रलेखात पुन्हा हॉरस, डेव्हीडॉहान, ओसिरिस यांची चेटू आणि वेटू यांच्या वस्त्यात गेल्याची कथेचा पुढचा भाग सांगितला. ज्या अर्थी ही गोष्ट आता आली त्याअर्थी आधीच्या अग्रलेखात सुरु असलेल्या घटनेशी समांतर ही गोष्ट घडत असावी असे वाटते आहे. या चेटू आणि वेटूंचे किती बिभीस्तपद्धती आहेत हे बापूंनी दाखविले.

या श्रद्धाहीनांची कमाल आहे!! सतत एकमेकांवर कुरघोडी करण्याचे त्यांचे प्रयास चालू असतात. हा मोठा की तो मोठा. याच्यापेक्षा जास्त पावर त्याची मग पळा त्याच्याकडे. माझी पावर कमी होते मग चाटा दुसर्‍या सामर्थ्यवान शक्तीचे पाय. मागील काही अग्रलेखांमध्ये अशीच पळापळ दिसून येत आहे. काही क्षणांतर इतक गोंधळायला होता की कोण कोणाचा गुलाम आणि कोण कोणाला शरण गेला हेच कळत नाही.

आजच्या अग्रलेखात पुन्हा नव्या ओळखी झाल्या….मागच्या काही अग्रलेखात निक्स ही सर्वात बलशाली श्रद्धाहीन स्त्री म्हणून समोर आली आज तिच्या तोडीची नुइट असल्याचे समजले. आणि पुन्हा तेच चक्र सुरु झाले. आता पुढे या दोघींपेक्षा ही अधिक बलवान कुणीतरी श्रद्धाहीन स्त्री उभी राहीली तर त्यात नवल नाही. पण नीट बारकाईने पाहीले तर दिसून येईल की इथे ही स्पर्धा आहे. श्रद्धाहीनांमध्ये स्पर्धा आहे स्वतः सर्वश्रेष्ठ बनण्याची आणि मग त्यासाठी ते काहीही म्हणजे अगदी काहीही करायला तयार असतात. अशी स्पर्धा आपण सामान्य मानवही करतो. अगदी चित्रपटामध्ये ही ठासून दाखवतात. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र…..ही त्यांची मित्रत्वाची व्याख्या….आपण आपल्या आजूबाजूला अनुभवत असतो…

एखाद्याला शह देण्यासाठी दुसर्‍याची कुबडी वापरणे…मी सगळ्यांपेक्षा कसा बलशाली ठरेन ही स्पर्धा आजच्या युगातही सुरुच आहे आणि त्यातूनच अनेक कटकारस्थांनाचा जन्म होत आहे. आणि आपण जर असे कळत नकळत वागत असू तर आपण अजाणतेपणी या श्रद्धाहिंना फॉलो करतो की काय असा मला प्रश्न पडला आहे.

घरात एका सुनेला शह द्यायचा असेल तर लहान मुलाची नवीन सून घरात आणणे आणि तिचा वापर मोठ्या सूनेच्या विरोधात करणे…बॉसला शह द्यायचा असेल तर बॉसच्या बॉस बरोबर चांगले हितसंबंध वाढविणे….दोन ग्रुप्समध्ये स्पर्धा…. ग्रुप मग तो कसलाही असो क्रिकेटचा किंवा सोसायटीचा…आमच्या ग्रुपमध्ये तुमच्या ग्रुप पेक्षा चांगली व हुशार किंवा जास्त पावरची माणसे आहेत असे करणे…ही अशी साधी साधी चढाओढ सुरुच आहे….आणि आपण सामान्य माणसे यास Used to आहोत….पण कधी तरी असा विचार केला पाहीजे…..की याची गरज आहे का? माझे मोठेपण या अशा स्पर्धात्मक हालचालीतून सिद्ध होणार का?

पण अग्रलेखांचा विचार केल्यास हीच गोष्ट किती भयानक असू शकते आणि आपल किती भयानक नुकसान करु शकते हे माझ्या ध्यानात आले पाहिजे. आणि म्हणूनच कदाचित या नविन वर्षात बापूंनी प्रेम करा आणि स्पर्धा टाळा हा संकल्प दिला आहे. कारण ही सगळी चढाओढ निर्माण होते ती स्पर्धेतूनच…..आणि स्पर्धा निर्माण होते ती महत्त्वकांक्षेतून….जेव्हा महत्त्वकांक्षेला प्रेमाचे अधिष्ठान असते तेव्हा निर्माण होणारी स्पर्धा ही पावित्र्य व प्रमाण ह्या मूल्यांच्या चौकटीत असते व जेव्हा प्रेमाचे अधिष्ठान सुटते तेव्हा राक्षसी महत्त्वकांक्षा जन्म घेते. व मनुष्याचा प्रवास हा श्रद्धाहीनतेकडे होतो. ही राक्षसी महत्त्वकांक्षा म्हणजेचे महिषासूर ज्याला प्रतिपरमेश्वर बनायचे आहे. अर्थात “I M THE BOSS” ही भावना…..पण त्याची जागा माझ्या आज्जीच्या त्रिशुळाखाली रक्ताच्या थारोळ्यातच आहे…..हे आपण कधीच कधीच विसरता कामा नये.

या राक्षसी महत्त्वकांक्षेमध्ये श्रद्धावानांचा, चांगल्या माणसांचा बळी जाऊ नये म्हणून बापूंनी प्रेम करा…परमात्मावर प्रेम करा आणि स्पर्धा टाळा हा मोलाचा संकल्प दिला आहे. कारण आजाराच्या मुळावरच घाव घातला तर पुढचा प्रश्नच येत नाही…..असूरी वृत्ती ही कॅन्सरसारखी आहे….कितिही केमो घेतल्या तरी पुन्हा उदभवण्याची भिती असतेच….त्यामूळे आधीच त्याची लागण होऊ नये याची काळजी घेतली तर हा आसूरी वृत्तीचा आजार कुणाला होणारच नाही….पण त्याच्यासाठी आवश्यक आहे ते केवळ शारण्य…..पूर्णपणे विश्वास…..आणि प्रेम…..

ज्याने महादुर्गेकडे पाठ फिरवली ते असूर, डॅक्रो, श्रद्धाहीन आणि असे अनेक प्रकारामध्ये मोडणारे झाले….

पण महादुर्गेकडे जो सन्मूख झाला तो फक्त तीचा झाला. बस्स!!! इथे फक्त एकच मोठी आई…महादुर्गा आहे…जिच्या आशीर्वाद प्रेरणेमुळे सगळकाही चालू आहे….आणि इथे फक्त नात ते एकच आई आणि बाळ…जो कुणी तीचा होतो तो तिचा बाळ…तिचा देवीसिंह, त्रिविक्रम ही मोठी बाळं आणि आपण सारी त्यांची छोटी छोटी बाळ, नातवंड, पतवंड….पण मुळ सगळ्यांची ती एकच आई…..मग इथे श्रद्धावानांमध्ये स्पर्धा येणार कुठून…जर असा विचार केला की, तू ही बाळ मी ही बाळ….स्पर्धा काय करणार? आपण जर तिचेच आहोत तर आपल्यात स्पर्धा कसली? माझी आई आणि तुझी आई हा फरकच आपण करु शकत नाही तर पुढच्या सगळ्या स्पर्धा फोलच नाही का? आणि स्पर्धा नाही मग दुरावा कुठून येणार…आणि जर मी इतर भौतीक स्पर्धा करत असेन (उदा. मत्सरापोटी, तुलनात्मक, स्वतः मोठेपण घेण्यासाठी इत्यादी…खेळांची स्पर्धा सोडून) तर मी पथभ्रष्ट होतोय का हा विचार केला पाहीजे…..

म्हणूनच आपला बाप असणारा मित्र आपल्याला तुलना सोडून स्पर्धा न करण्याचा संकल्प देतो…इतकेच नव्हे तर परमेश्वरावर प्रेम करताना स्वतःशीच स्पर्धा लावण्याचे आव्हानपण देतो….आज जितक प्रेम करतोय त्यापेक्षा कणभर अधिक उद्या करण्याची स्पर्धा….आज मी ह्या परमेश्वराच्या जवळ जितका आहे त्याहून अधिक जवळ जाण्याची स्पर्धा…त्याच्या चरणांशी असलेल्या वाळूच्या कणांशी स्पर्धा….त्याच्याकडे एकटक पाहत बसण्याची स्पर्धा…या अशा स्पर्धा आहेत की ज्यात तो हरायला ही तयार आहे….हरि विठ्ठल – हारी विठ्ठल होतो तो या अशा प्रेमळ स्पर्धेनेच नाही का?

जेव्हा आई आणि लहान बाळामध्ये धावण्याची स्पर्धा लागते आणि तेव्हा १००००८% आई हरतेच..आणि ती हरावी ह्याकडे तिचा प्रयत्न असतो…तेव्हा ह्या स्पर्धेत असणारे गुपीत, आनंद, प्रेम आणि वात्सल्य हे कधीच श्रद्धाहींनाच्या स्पर्धेत सापडणार नाही….हे नक्की….

– रेश्मा नारखेडे……