#615488

ketaki. Kulkarni
Participant

     हळूहळू वेगळेच चित्र समोर येत चालले आहे… चक्क शुक्राचार्यांसारखा माणूस ह्या एवढ्या प्रमाणात बदलला आहे!!! एका क्षणासाठी पण विश्वास ठेवू शकत नाही…अशी ही गोष्ट आहे…
     आजच्या अग्रलेखामधे शुक्राचार्यांनी सरळ सरळ त्यांच्या सर्व चुकांची कबुली दिली आहे… समन्मिताला व संजीवनीला बोलावून घेण्यामागे केवळ त्यांचा स्वार्थच होता.. फक्त एक ‘उपयोगी व्यक्ति’ म्हणून शुक्राचार्य फक्त तिचा वापर करत होते.. आणि काम संपल्यावर मात्र त्यांनी त्या दोघींनही एकटे सोडून दिले… तसंच त्यांची बदलण्याची इच्छा.. ” मला आताकुविद्याध्यान करायचे नाही आणि प्रायश्चित्त घेऊन शुद्ध होइपर्यंत देवयानापंथाचे मंत्र वापरायचे नाहीत.” शुक्राचार्यांचे हे सर्व बोलणे वाचतांना आश्चर्याचा धक्काच बसत होता.. एवढा बदल कसा झाला…  
     ह्या अग्रलेखामधे एक गोष्ट दिसून येते..शुक्राचार्य म्हणतात… “भारतवर्ष सुटले आणि मग माझा प्रवास अधिकच वेगाने कुविद्येच्या साम्राज्यात सुरु झाला. माझ्या इतर सर्व कन्याही त्याच प्रवृत्तीच्या निघाल्या. लिलिथने तर माझ्याशी अतिप्रसंगच केला आणि मग हळूहळू माझे मन ह्या गोष्टींनी विटु लागले. परंतु तसे विचार क्षणभरच राहत आणि सुडाची, इर्ष्येची भावना परत प्रबळ होई”…इथे बापूंचे एक प्रवचन आठवते.. त्यात बापूंनी माणसाच्या 4 stages सांगितल्या होत्या..
* unconsciously incorrect (जाणीव नसताना केलेली चूक)
* consciously incorrect ( चुकीची जाणीव)
* consciously correct (जाणीवपूर्वक अचूक)
* consciously incorrect ( सवयीने अचूक)
त्यातली तीसरी स्टेज ही खुप अवघड असते.. आपल्या चुकीची जाणीव झाल्यावर मग मुद्दामुन चूक न होऊ देणं हे सोपे नसते… जेवढा प्रयास आपण चूक न होण्यासाठी करतो तेवढीच जास्ती ती चूक आपल्याकडून होत राहते.. जसे शुक्राचार्यांचे झाले.. त्यांना त्या चुकीच्या गोष्टी नको वाटू लागल्या होत्या, पण पुन्हा पुन्हा ते सुडाच्या भावनेत गुरफटले जात होते.. आणि अधिकच वाईट मार्गावर ओढले जात होते.. आणि म्हणूनच ही स्टेज पार करण्यासाठी आपल्याला ‘त्या’ची गरज असते.. जेव्हा मी त्याला शरण जातो.. त्याला माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदु मानतो, तेव्हा तोच मग मला जाणीवपूर्वक अचूक राहायला मदत करतो..
आता आपल्याला बापूंनी ‘श्रीशब्दध्यानयोग’ ही उपासना दिली आहे..ह्यात प्रत्येक चक्राच्या स्वस्तिवाक्य आपल्याला एक वेगळेच बळ देणारे आहे.. त्यात आज्ञाचक्राचे स्वस्तिवाक्य.. ” साक्षात श्रीहनुमन्त माझा मार्गदर्शक आहे आणि माझे बोट धरून चालत आहे”…हे विश्वास ठेऊन म्हटलेलं स्वस्तिवाक्य.. म्हणजे मला वाटते की ही तीसरी स्टेज.. consciously correct राहण्याची स्टेज पार करण्यासाठी आपल्याला आपल्या बाप्पाने दिलेली एक खुप मोठी सुवर्णसंधी आहे..कारण जिथे साक्षात महाप्राण हनुमंत सोबत असेल, तिथे चूक होणे शक्यच नाही.. म्हणजे ज्या विश्वासाने आपण हे स्वस्तिवाक्य म्हणू, त्याप्रमाणात किंबहुना अधिकच प्रमाणात मला माझ्या सदगुरुंकडून, सहाय्य मिळत राहील आणि माझ्या चुका आपोआप कमी होत जातील..

आजच्या अग्रलेखातील अजुन एक गोष्ट.. शुक्राचार्य अफ्रोडाइटच्या पायावर लोळण घेतात.. आणि पहिल्यांदाच ते तिच्याकडे मातृभावाने बघतात.. आणि त्याच वेळेला तिथे हरक्यूलिस शुक्राचार्यांचा हात धरून त्याला उठावतो व म्हणतो..” जूने जाऊ द्या मरणालागुनी. आज मी हात पकडला आहे आणि तेदेखिल अफ्रोडाइटच्या सुचनेवरुनच. आता तुम्ही इच्छा केलीत तरच ही साथ सुटू शकते,एरवी नाही.”
ह्यातून ह्या भगवंताचे अकारण कारुण्य किती जाणवते.. अतिशय पापी मनुष्यासही तो शरण येताच, हा परमात्मा त्याचा हात आपल्या हातात घेतो.. आणि जेव्हा परमात्मा आपला हात त्याच्या हातात घेतो तेव्हा तो स्वतःहून सोडतही नाही.. किती ते प्रेम!!
ह्यावरून ह्याच गुरुवारी.. म्हणजेच 21 जानेवारी 2016।।ह्या दिवशी बापूंचे झालेले पितृवचन आठवले.. ज्यात बापूंनी हीच गोष्ट सांगितलेली ..की त्याची आणि तुमची नाळ कधीच तुटत नाही.. अगदी पाप्यातल्या पापी माणूससुद्धा त्याच्याशी जोडला गेलेला असतो.. आणि आता अगदी तुम्ही मला सोडून जायचे जरी म्हटले.. तरी मी तुम्हाला सोडणार नाही.. हात धुवून तुमच्या मागे लागेल..”
अजुन काय पाहिजे आपल्याला..हे असं एवढं प्रेम फक्त एक खरा बापच करू शकतो.. दूसरे कोणीही नाही..त्रिवार अंबज्ञ बापुराया!!!

ह्या त्रिविक्रमाचे अकारण कारुण्य एखाद्या समुद्रापेक्षाही कितीतरी पटीने खोल आहे ह्याची जाणीव ह्यातुन होते आहे.. पुढे अफोरडाइट शुक्राचार्याना सांगते..कुणीही कितीही कुमार्गावर गेला, तरीदेखिल त्याचे पूर्वार्जित पूण्य व पावित्र्य त्रिविक्रम कधीच काढून घेत नाही.
परत एकदा तो श्रेष्ठ महर्षि शुक्राचार्य पवित्र तेजाने विलसू लागेल, ह्याची काळजी आम्हाला…”
किती सूंदर आहे हे..
आणि ह्यासाठी शुक्राचार्यांना फक्त एकच काळजी घेण्यास ती सांगत आहे..” कुठल्याही लोभात, मोहत अथवा इर्ष्येत अडकून त्रिविक्रमाचा मार्ग सोडु नकोस. कारण कोणाच्याही व्यक्तिस्वातंत्र्याला महादुर्गा कधीच बंधन घालित नसते व त्रिविक्रमही”.
मी 1 पाऊल उचलले की ‘तो’ 99 पाऊले माझ्याकडे चालत येतोच.. हे ह्याचे उत्तम उदाहरण आहे..

आता उत्सुकता लागली आहे..ते ह्या धर्मयुद्धात पुढे काय होते ते बघण्याची..

अंबज्ञ
केतकीवीरा कुलकर्णी