#612954

Suneeta Karande
Participant

हरि ॐ.
जय जगदंब जय दुर्गे ! आदिमाता दुर्गेचा आणि त्रिविक्रमाचा (माझ्या बापूरायाचा ) सदैव विजय होतोच होतो !
दिनांक ३१-०१-२०१६ चा अग्रलेख “तुलसीपत्र १२०७ ” वाचून खूप आनंद झाला की सरते शेवटी आपल्या आदिमातेच्या आणि त्रिविक्रमाच्या चरणी सर्व कुविद्याधारकांना स्वत:च्या अधिपत्याखाली हवे तसे कळसूत्री बाहुलीप्रमाणे नाचविणारा एवढेच नव्हे तर अंकाराशक्तीचे सामर्थ्य असलेल्या पिंडार व पॅंडोरांचींही डाळ शिजू न देणार्‍या प्रथम शुक्राचार्यांनाही आपली नांगी टाकावी लागलीच. अखेरीस का होईना ह्या कुकर्मी , दुराचारी प्रथम शुक्राचार्याने आदिमाता दुर्गेचा आणी त्रिविक्रमाचा धावा केलाच , आपल्या चौदाव्या पत्नी समन्मिताच्या प्राणांतिक हाकेला आणि तिने घातलेल्या शपथेला साद देण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे त्यांच्या प्रेमळ व पवित्र मार्गावरून चालून भक्ती करणार्‍या “संजीवनी” नावाच्या कन्येला तिच्यावर त्यांचीच एक कन्या निक्स आणि तिचा पुत्र तितान उर्फ मिनॉसने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातून वाचविण्यासाठी ! किती हा विचित्र खेळ आहे नियतीचा ! ज्या निक्सला शुक्राचार्य त्यांच्या इतर कन्यांपेक्षा सदैव झुकते माप देत होते तिच्या उपासना (अर्थातच कुमंत्राच्या आणि कुविद्येच्या )नियमिततेने करण्याच्या स्वभावाने , तिला देखिल स्वत:च्या हातांनी बळी चढवितात, शुक्राचार्य !
खरे तर ह्याच शुक्राचार्यांना संजीवनी विद्या अवगत होतीच आणि तिचा ते दुरुपयोग करून दुराचारी समूहाला , कुविद्येलाच बळ पुरवित होते
संत तुलसीदास विरचिते सुंदरकांडात आपण वाचतो की सहस्त्रबाहूशी झालेल्या युध्दात वानरराज वालीचे हात तुटलेले असतात आणि हेच शुक्राचार्य ते हात संजीवनी विद्या वापरून जोडून देतात आणि प्रभू श्रीरामांची भेट झाल्यावर जेव्हा सुग्रीवाचे व वालीचे युध्द होते तेव्हा वालीला युध्द संपल्यावर शस्त्र न उचलण्याची अट घालून पाठवतात, कारण त्यांचा भ्रम असतो की युध्द वालीच जिंकणार आणि नंतर शस्त्र ठेवलेल्या वालीवर श्रीराम वार करू शकणार नाही. म्हणजेच शुक्राचार्य कायम संजीवनी विद्येचा वापर परमात्म्याला विरोध करण्यासाठीच करीत असावे असे वाटते. पण अशुभाची ताकद ही क्षीण होतेच कधी ना कधी.
बापूंनी आपल्याला तुलसीपत्र १०१६ मध्ये सांगितले होते की शुक्राचार्यांना ब्रम्हर्षि अगस्तींनी शाप दिल्याने त्यांची संजीवनी विद्या वापरता येत नव्हती. स्वत:च्या सामर्थ्याचा अनुचित प्रकारे वापर केल्यावर किती दारूण अवस्था होते ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
तुलसीपत्र १००९ मध्ये साक्षात पार्वती माता ब्रम्हर्षी कश्यपांना हा इतिहास सांगत असतानाचे बापूंचे बोल आठवले की पार्वती माता म्हणते शुक्राचार्य काही महादुर्गेला अर्थात मॉनडॉरगीला मानवी सम्राज्ञी मानत नव्हते. ते देखिल तिच्या विरोधातच होते. परंतु शुक्राचार्यांनी तिच्या अमर्याद ताकदीची चव अनेकवार चाखलेली होती. आणि म्हणूनच कदाचित आपल्या “संजीवनी” कन्येला वाचविण्यासाठी शुक्राचार्य स्वत:चा वध करा , पाहिजे तर अशी कळवळ्याची साद घालतात, व संजीवनीलाही केवळ तिच्यासाठी स्वत:चे सर्व जुने मार्ग सोडण्यास तयार असल्याचे कबूल करतात.
मला वाटते की कदाचित त्रिकालज्ञानी, त्रिकालदर्शी आदिमाता आणि तिचा पुत्र त्रिविक्रम हे जाणत असल्यामुळेच शुक्राचार्यांसाठी क्षमेचा मार्ग खुला ठेवतात सदैव !
मागील तुलसीपत्रात (तुलसीपत्र क्रमांक आठवत नाही ) बापूंनी लिहिले होते की आदिमातेने आणि त्रिविक्रमाने शुक्राचार्यांनी शरणागती स्विकारली तर त्यांना क्षमा करण्याचा मार्ग मोकळा ठेवला होताच आधीपासूनच त्यांच्या अकारण कारूण्याने. तेव्हा जराही कुठेही पुसटशी कल्पना देखिल येत नव्हती की हा अंहकाराने उन्मत्त झालेला शुक्राचार्य कधी तरी आदिमातेला आणि त्रिविक्रमासमोर नाक रगडत येईल म्हणून ! खरेच आदिमातेचे “क्षमा ” हे नाव किती किती किती महान आणि व्यापक प्रंमाणावर कार्यरत आहे त्याची ही साक्षच म्हणायला हवी.
पण ह्या शुक्राचार्यांचा काही भरवसा वाटत नाही, लॉबिरिन्थमध्ये स्वत:ला अडकवून त्यांनी असेच सर्वांना गाफिल ठेवले होते, पण येथे गाठ आदिमातेशी आणि तिच्या पुत्राशी त्रिविक्रमाशी असल्याने कदाचित शुक्राचार्य कपट नीतीचा अवलंब करायला धजावणार नाहीत असाही आशावाद निर्माण झाला आहे खरा. पण ह्या दुराचार्‍यांचा विश्वास ठेवणे घातकच वाटते , न जाणो शुक्राचार्यांनी गरज संपताच पुन्हा आपल्या मूळ स्वभावाला कवटाळले !
ह्या तुलसीपत्रात महामाता सोटेरियाची दूरदृष्टी किती जबरद्स्त ताकदीची आहे ह्याचा प्रत्यय येतो. पिंडार जेव्हा स्थेवोने सांगितलेल्या गोष्टींची सत्यता पडताळण्यासाठी त्याच्या कक्षात जातो आणी स्काली यंत्रावर तपासणी करतो तेव्हा ते सत्य असल्याचा संदेश मिळतो कारण ते स्काली यंत्र वसुंधरेवरील स्कालीस्थानाशी आधीच महामाता सोटेरियाने जोडून घेतले होते आणि त्याचा ताबा मीनाक्षी, बिजॉयमलाना आणि आयरिसकडेच होता.
प्रत्यक्षात कद्रूचा बळी देताना मंत्र म्हणणारे सेरापिस अनुबीस (महर्षी सुमेधस म्हणजेच सम्राट युरॅनस ) होते जे कोणालाच दिसू शकत नाही ना निक्सला ना सॅथाडॉरिना ऊर्फ सर्कीला. झेनु आणि इष्टार तर तेथेच हजर असून देखिल ते मंत्र संध्या भाषेतले असल्याने त्यांनाही ते कळलेच नव्हते, जरी कद्रू प्राणांच्या आकांताने झेनुला समजावण्याचा प्रयास करत होती. कद्रूने ज्या कुविद्येच्या वापराने सम्राट युरॅनसच्या पित्याची निर्घृण हत्या केली होती त्याचा बदला घेण्यात सम्राट यशस्वी झाले होते. ( तुलसीपत्र १२०६)
एकीकडे खुद्द Afrodite ज्या मेड्युसाबद्दल साशंक होती ती मेड्यूसा मेली , कद्रू मारली गेली , क्रॉनस व मॉरॉसचा (चक्क एन्की आणि एनलीलचा ) मृत्यु झाला – एकामागून एक जबरदस्त ताकदीचे प्रतिपक्षाचे मातब्बर नामशेष होत आहेत तर दुसरीकडे टायफॉन , हॉरेवॉनस , हरेन्नाखस , आणि आता शुक्राचार्य एकामागून एक बलाढ्य लढवय्ये शरणागतीचा मार्ग स्विकारत आहेत, त्यामुळे खरेच आता पुढे काय ह्याची उत्सुकता अजूनच शिगेला पोहचत आहे.

जय जगदंब जय दुर्गे !
आदिमातेचा आणी तिच्या पुत्राचा त्रिविक्रमाचा सदैव जयजयकार असो !

मी अंबज्ञ आहे.
आम्ही अंबज्ञ आहोत.

हरि ॐ. श्रीराम. अंबज्ञ
सुनीतावीरा करंडे