#612823

Harsh Pawar
Participant

 बापरे ! आज चक्क आद्य असुरगुरु शुक्राचार्य आदिमाता दुर्गेला आणि त्रिविक्रमला काकुळतीने हाक मारत आहे … !! ह्या दुष्ट श्रद्धाहीन दुराचार्यांना आदिमाता चण्डिका व त्रिविक्रमाचे सामर्थ्य नेहमीच ठावूक असते पण आज प्रथम शुक्राचार्य सरळ सरळ आदिमातेस व त्रिविक्रमाला मदतीला बोलावत आहेत ..कुठे गेली त्यांची स्वताःला सर्वश्रेष्ठ समजण्याची हेकेखोरी ? कुठे गेली त्यांची तामसी मिजास ?
निक्स आणि मिनॉसने ( राजा तितान ) धूर्त योजनेचा वापर करुन मिथेच्या कन्येवर आक्रमण केला .. निक्सने तिच्या दोन्ही डोळ्यांतून निघणारी ‘ल्युसीफेरॉन’ प्रकाशकिरणे त्या कन्येभोवती फिरविण्यास सुरुवात केली व मिनॉसने त्याची अजगराची शेपटी अधिकाधिक बळकट करुन त्या शेपटीचे धारदार टोक त्या कन्येच्या हृदयाचा वेध घेण्यासाठी सज्ज केले …आपल्या लेकीवर ओढ़ावलेला हा भयानक प्रसंग पाहुन मिथेने शुक्राचार्यांना ” आता तरी धावत या ,तुम्हाला माझी शपथ आहे ” असे गारहाणे घातले व मिनॉसच्या शेपटाचे टोक मिथाच्या कन्येच्या छातीत घुसणार, एवढ्यात प्रथमशुक्राचार्य तेथे येऊन पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या नाभीतील दोन मोती काढून निक्स आणि मिनॉसवर फेकले व बेशुद्ध होऊन जमीनीवर पडणाऱ्या त्या कन्येला आपल्या हातांनी सावरले ..निक्स आणि मिनॉस जागच्या जागी जळून ख़ाक झाले होते !

पुढे शुक्राचार्यांच्या मुखातून निघणारे उदगार आणखी अचंबित करतात ” प्रिय ‘संजीवनी’, प्रिय कन्ये ! जागृत हो .मी तुझा पिता केवळ तुझ्यासाठीच जुने सर्व मार्ग सोडण्यास तयार आहे  ! हे आदिमाते दुर्गे ! हे त्रिविक्रमा ! पाहिजे तर माझा वध करा, पण माझ्या ह्या प्रिय कन्येला, तुमची प्रेमळ व पवित्र भक्त असणाऱ्या ह्या संजीवनीला ‘संजीवनी’ द्या ”
आणि काय चमत्कार ! सदैव मातृहृदय विलसणारी आदिमाता शुक्राचार्यांच्या हाकेला प्रतिसाद देते ,व संजीवनी हळू हळू डोळे उघडू लागतेआणि हे पाहून शुक्राचार्यांच्या 14व्या पत्नीला अर्थात मिथेला शुक्राचार्यांविषयी अत्यंत आदर वाटू लागतो !

महापाप्यालाही आदिमाता त्याने संकटसमयी मनापासून हाक मारताच , आदिमाता कशी वाचवते हे आज पुन्हा एकदा पाहायला मिळाले !

मेड्यूसा मेली , कद्रू गेली , क्रॉनस व मॉरॉसचा मृत्यु झाला आणि आज निक्स आणि मिनॉसही( राजा तितान ) मृत्युघाटी उतरले ! हे धर्मयुद्ध आता त्याच्या अंतिम निर्णायक स्थितीकडे झुकत आहे .. बापूंच्या या अदभूत लेखमालेत आपण मागील काही लेखांमध्ये खूप विलक्षण बदल होतांना पाहत आहोत .. हरक्यूलिस आणि दिव्या एफ्रोडाइटच्या प्रयासांमुळे मागे आपण दुष्ट दुराचारी टायफॉन ,  हॉरेवॉनस आणि हरन्नेखस ह्यांना आपण दुराचारी मार्ग सोडून श्रद्धावान होतांना पाहिले .. आज जो प्रकार घडला त्यावरून अशी अपेक्षा असुरगुरु शुक्राचार्यांकडून करणे हे कितपत योग्य ठरेल हे येणारे बापूंचे लेखच सांगतील .. शुक्राचार्य चण्डीकेच्या सेनेमध्ये सामील होतील की ” गरज सरो आणि वैद्य मारो ” च्या नियमाने ते पुन्हा महादुर्गेच्या विरोधात उभे राहतील हे लवकरच कळेल ..

जय जगदंब , जय दुर्गे !!!
श्री राम
– हर्ष पवार