#608489

Harsh Pawar
Participant

धर्मयुद्ध सुरु झाले आहे आणि एक एक नीच मृत्युमुखी जात आहे .. मागे लिलिथच्या हाती मेड्यूसा मेली आणि आज ऋषि सुमेधसांनी इष्टार व झेनुच्या हाती कद्रू , क्रॉनस व मॉरॉसचा बळी अंकारोडोडस ग्रहावर चढविला .. काट्याने काटा कसा काढवा हे ऋषि सुमेधस बरोबर जाणतात ..
एक कमालीची गोष्ट आज कळाली ..एका श्रद्धाहीन दुराचारी व्यक्तिसही मृत्यमुखी पोहोचवण्या आधी महादुर्गेचे उपासक आधी खात्री करुन घेतात की ही व्यक्ति आधी कधी चांगली होती का ? व पुढे कधी बदलणार आहे का ? कद्रूला झेनु हाती संपवण्या आधी ऋषि सुमेधसांनीही माता सोटेरियाकडून ह्या गोष्टीची खात्री करुन घेतली होती …
दिव्य  एफ्रोडाइटच्या योजनेनुसार अंकारोडोडसवर 3 बळी गेले होते व त्या नंतर इष्टार व झेनु त्यांच्या यानामध्ये बसून ड्रैको ग्रहावर निघुन गेले .. त्यानंतर  महर्षि मेधातिथि काण्व व महर्षि प्रियमेध आंगिरस तेथे पोहोचले ..त्यांना त्या तिघांच्या शरीरांना अग्नी द्यायचा होता व त्यांची राख जमा करुन ठेवायची होती …
ह्या दुष्ट दुराचार्यांच्या मृत शरीराला अग्नी देणे गरजेचे असते ..कारण आपण उपनिषदामध्ये वाचतो की आद्य असुर मधु-कैटभ ह्यांचा महाविष्णुने वध केल्या नंतर ही त्यांच्या शरीराचे तुकडे तसेच मासाचा गोळा बनून अंतरीक्षामध्ये फिरत राहिले व पुढे ह्याच मधु-कैटभांच्या मासामधुन नियतीच्या पोटी वृत्रासुर जन्माला आला होता …
दैनिक प्रत्यक्षामध्ये बापूंच्या आजच्या अगरलेखामध्ये आज आणखी एक महत्वाचा मुद्दा कळला :
 अंकारोडोडसवर झेनु इष्टारला सांगत होता, ” प्रिय इष्टार! क्रॉनॉस व मॉरॉस हे पितापुत्र, तसेच ओसिरिस व हॉरस हे पितापुत्र एकरूप होऊन फक्त ५१वा ‘एन्की’ व ५१वा ‘एनलील’ ह्या रुपात प्रगट झाले व ५१व्या ‘एन्की’ची  आणि ५१व्या ‘एनलील’ची युति झाली, तर त्या शुंभ-निशुम्भांपुढे कुणाचेच काही चालणार नाही.
     त्या ‘एन्की’ व ‘एनलील’ला अर्थात शुंभ-निशुंभांना हरवू शकणारा फक्त एकच आहे – जंभासुर आणि हा जंभासुर सध्या ‘ डेव्हिडॉहाना’ रुपात बंदिस्त आहे”

आता क्रॉनस व मॉरॉस नाही उरलेत व मग आता पुढे काय होणार ह्याची उतकंठा वाढली आहे …

श्री राम
– हर्ष पवार