Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) सिंहावलोकन – वैश्विक इतिहास Reply To: सिंहावलोकन – वैश्विक इतिहास

#552344

तुलसीपत्र ९९९

> कैलास (Mount Kailash) हा पर्वतच नाही ह्या वाक्याने सारे आश्चर्यचकित
> हीच विश्वातील खुपच विशाल व व्यापक सत्य विशद करण्याची सुरुवात याची ब्रह्मर्षी कश्यपांना जाणिव
> हा “इतिहास” (Real History) शब्दबद्ध करण्याची आदिमातेकडे ब्रह्मर्षी कश्यप व अदितीमती, ब्रह्मर्षि अगस्त्य व लोपामुद्रा आणि ब्रह्मर्षि वाशिष्ठ व अरुंधती यांची मागणी
> नित्यगुरु याज्ञवल्क्यांस पार्वतीचा प्रत्येक शब्द त्यांच्या मनःपटलावर कोरण्याची आज्ञा
> पार्वती उवाच,
* वसुंधरेवर प्रजापती ब्रह्म्याने मानवी जीवन निर्माण केले.
* त्यानंतर प्रत्येक कानाकोपर्‍यात मानववंशाची प्रगती होऊ लागली.
* त्या सत्ययुगाच्या पहिल्या ५० हजार वर्षांनंतर मानवाची स्थूल ज्ञानाच्या सहाय्य़ाने विज्ञानाने प्रचंड प्रगती झाली आणि ह्या प्रगतीमध्ये मानवास दूरध्वनीसंपर्क, आकाशगमन, दूरप्रागट्य (टेलिपोर्टेशन) असे विविध तंत्रज्ञान विज्ञानाच्या सहाय्याने प्राप्त झाले. त्यावेळी पृथ्वीवरील जमिनी व समुद्रांची रचना फार वेगळी होती.
* या प्रगतीमुळे मानवजात अत्यंत आनंद व सात्विक भावाने आपला जीवनक्रम पुढे नेत होती.
* ही सर्व प्रगती होत असताना भारतवर्षातील मानवसमाज सत्वगुणापासून ढळला नाही.
* परंतु पृथ्वीच्या इतर प्रदेशातील मानवांनी पुढील मुर्ख संकल्पनेला आश्रय देते झाले….”हे सर्वकाही आम्ही आमच्या प्रयासांनी मिळवत आहोत व आदिमाता ही केवळ वैश्विक ऊर्जा आहे व तिला आम्ही हवे तसे वापरु शकतो.
* आम्हीच श्रेष्ठ असा अहंकार व त्यातूनच विविध पृथ्वींवर ताबा मिळविण्याचे प्रयत्न सुरु
* वसुंधरावासी श्रेष्ठ व बाकी सर्व क्षुद्र अस त्यांना वाटू लागले.
* या समस्येवर ब्रह्मर्षी कश्यपांची जगातील समस्त ऋषींनी भेट घेतली व देवर्षी नारदांनी अत्रि-अनसूयेशी सल्लामसहलत करुन सर्व ब्रह्मर्षी व त्यांच्या प्रमुख शिष्यास एकत्रित करुन जगभरातील सर्व श्रद्धावानांना विविध प्रदेशांतून हिमालय पर्वताच्या दक्षिणेकडील भागात अर्थात वैदिक भूमीत आणून वसविण्याचे कार्य सोपाविले.
* सर्व श्रद्धावान भारतभूमीत स्थिर झाले व श्रद्धाहीन उर्वरित पृथ्वीवर होते.
* त्यातील राजे, सेनापती व प्रग्लभ शास्त्रज्ञ यांनी वेगळाच संप्रदाय निर्माण केला त्यास “अनुनाकीय” Annunaki नाव दिले.
* व त्यांच्या संघाच्या बाहेरच्यांना ते गुलाम समजू लागले.
* अनुनाकियांना निंबुरा ग्रहावरील सुवर्ण साठ्याची भुरळ पडली
* महत्त्वाचेया अनुनाकियांचा असुरत्वाकडे होणारा प्रवास पाहून “अमृतमोहिनी’ने त्या संपूर्ण ’निंबुरा’ nibiru नामक पृथ्विलाच सुवर्णत्व प्राप्त करुन दिले व एवढेच नाही तर तिथून जेवढे खणले जाईल तेवढेच आपोआप निर्माण होईल अशी व्यवस्थाही केली. त्यानंतर सुवर्णकांतीचे रुप धारण करुन “निंबुरा”च्या कांचन पर्वताच्या शिखरावर येऊन उभी राहिली व तिने अनुनाकियांना तेथील सुवर्णाची परिस्थिती समजवून सांगितली.
* परंतु तिच्या दिव्यत्वाची प्रचीती त्या श्रद्धाहिनांना आली नाही. ते केवळ तीच्या सौंदर्यास आकर्षित झाले होते.
* सर्व अनुनाकी आपल्या पद्धतीने निंबुरावर जीवन जगू लागले होते.
* वसुंधरेवर हिमालय पर्वताच्या दक्षिणेस श्रद्धावान व इतर भागात श्रद्धाहिन असे चित्र होते. ही श्रद्धाहिनता अनुनाकियांनी त्यांना अज्ञानात ठेवल्यामुळेच आली होती.
* त्यामुळे अगस्त्य ऋषींना दर शंभर वर्षांनी त्या श्रद्धाहीन प्रदेशात एक यात्रा करुन श्रद्धेची बीजे रोवण्याची कामगिरि दिली होती.