#534599

Suneeta Karande
Participant

हरि ॐ.
आजचा तुलसीपत्र ११८४ चा दिनांक ०८-१२-२०१५ चा अग्रलेख वाचताना बापूंनी मातृवात्सल्य उपनिषद् अर्थात् श्री स्वस्तिक्षेमविद्या ह्या ग्रंथात
अध्याय ३ मध्ये लिहीलेले आठवले की साक्षात त्रिविक्रम प्रत्येक कल्पामध्ये घडत राहिलेला वैश्विक इतिहास उत्तम व मध्यमाला समजावून सांगतो की जोपर्यंत मानव आहे व मानवामध्ये दुराचार आहे , तोपर्यंत ह्या वृत्राचा एकदा वध झाल्यानंतर मानवांच्या दुष्कृत्यांनी ऋतनियमांची मर्यादा पार केली की वृत्र जिवंत होतोच व जोरदारपणे कार्य करू लागतोच.
कारण ह्या वृत्राचा देह मधु-कैटभाचा आहे, ह्या वृत्राचा प्राण मानवाचे दुराचार व अश्रध्दा हेच आहेत आणि ह्या वृत्राचे मस्तक महिषासुर आहे.
त्यामुळे ह्या वृत्राला जिवंत ठेवतो तो मानवच !
आता महिषासुर म्हणजेच सध्याच्या प्रचलित भाषेत बफोमेट म्हणून ओळखला जाणारा सैतान आणि दैनिक प्रत्यक्षच्याच १४ जानेवारी २०१४ च्याबातम्यांमधून आपण वाचले होते की Arizona प्रांतात बफोमेटचे देऊळ बांधले गेले शेवटी तेथील जनसामान्यांच्या तीव्र विरोधाला झुगारून … म्हणजेच हा वृत्रासुर , महिशःआसुर , बफोमेट आज कार्य जोमाने करीत आहेत ते आम्हा मानवांच्याच दुराचाराने , अभक्तीने आणि त्रिविक्रमाला आणि त्याच्या मातेला आदिमाता चण्डिकेला (महादुर्गेला) नाकारल्यामुळे !
पुढे ह्याच उपनिषदात बापूंनी अध्याय ३० मध्ये परशुरामाने उत्तम , मध्यम व विगताला माणूस विगति का होतो ह्या त्यांच्या प्रश्नाचे दिलेले उत्तर आठवले. खरेच आजच्या अग्रलेखातून तेच सत्य पुन्हा एकदा प्रकाशित झाले आहे असे वाटते.
भगवान परशुराम म्हणाले होते की हे सुगति ! तू विगतो होतास कारण तू सर्वसुखात असताना प्रश्न विचारत होतास, ” आदिमातेला शरण मी का म्हणून जायचे ? ” व पुढे परशुरामांनीच समजावून सुध्दा सांगितले होते की हाच अशा अनेक श्रध्दावान विगतांचा व श्रध्दाहीन दुर्गतांचाही प्रश्न असतो व तो प्रश्नच त्यांचा घात करतो. पुढे परशुराम अधिकच स्पष्टपणे खुलासा करीत बोलले होते की अरे मित्रांनो ! ह्या प्रश्नाचे अगदी स्पष्ट शब्दांत उत्तर देतो,
हे शाश्वत व अपरिवर्तनीय वास्तवच सत्य आहे की कुणीही मानवच काय परंतु रावण, महिषासुर व वृत्रासुरसुध्दा तिला युध्दात जिंकू शकत नाहीत, जो जो चण्डिकेशी कृतघ्नतेने वागतो व असा प्रश्न विचारतो, तो असुरसैनिकच असतो व म्हणून तो महिषासुरसैनिक स्वत:च दुर्गेशी युध्द छेडत असतो व अशा युध्दात चण्डिकेशी लढ्णार्‍यांचा सर्वनाश हा ठरलेलाच.
आणि आज बापूच परत अग्रलेखातून हेच सत्य परत मांडीत आहे मेडयुसाच्या तोंडातून की सम्राट अनुने निन्कूच्याच मदतीने स्कालीची घोर साधना करून निर्माण केलेली व्यवस्था आहे आणि ही अशीच सदैव चालू राहील कारण जोपर्यंत मानव आहे, त्या मानवाकडे कर्मस्वातंत्र्य व विचारस्वातंत्र्य आहे,
जोपर्यंत मानव त्या महादुर्गेला ( अर्थातच आदिमाता चण्डिकेला) व त्रिविक्रमाला नाकारू पाहतो, त्यांची उपेक्षा करतो, त्यांच्या क्षमेचा गैरवापर करतो, तोपर्यंत ’स्काली’चे अस्तित्त्व तोच टिकवून ठेवत असतो. आणि ’ स्काली ’ ह्या स्व:च्याच ताकदीशिवाय अंकारा काहीही करू शकत नाही. व म्हणूनच आपण सर्व कुविद्याधारक मानवाला सतत देवयानपंथापासून दूर नेत राहतो. कारण त्यातच स्कालीचे सामर्थ्य दडलेले आहे व आपण सर्वजण त्या स्कालीचेच कार्य करत असतो आणि तीच आपल्याला सामर्थ्य पुरवीत राहते.
बापू प्रवचनात आपल्याला नेहमी सांगतात की भगवंताला नकार म्हणजेच सैतानाला होकार. माणसाने एकदा जर का रामाला नाकारले की त्याला पाहिजे असो वा नसो त्याचा रावणाच्याच राज्यात प्रवेश हा होतोच. म्हणजेच येथे आजच्या अग्रलेखातून हे स्पष्ट कळते की देवयान पंथावरून माणसाला दूर ठेवण्याचा हे दुराचारी , वामाचारी , कुविद्येचे पुरस्कर्ते नेहमीच प्रयत्न करतात.
मग आता माणसाला म्हणजे आपल्याला ठरवायचे असते की आदिमातेची आणि तिच्या पुत्राची त्रिविक्रमाची बांधिलकी ठेवाय़ची , त्यांना शरण जाऊन त्यांनी दाखविलेल्या देवयान पंथावर चालायचे का असुरपंथीयांना स्विकारून सैतानाचा, बफोमेटचा, महिषासुराचा मार्ग धरायचा .
“त्या” ला नाकारणे , भगवतीला वा भगवंताला नकार म्हणजेच सैतानाला होकार असेच जणू समीकरण बनले आहे. हे सर्व टाळायचे असेल तर माझ्या जीवनाची सूत्रे मला माझा एकमेव आधार व माझा खराखुरा एकमेव आप्त असणार्‍य़ा ” त्रिविक्रमा”च्या हाती सोपवायलाच हवीत.. म्हणूनच आपले महाधर्मवर्मन डॉक्टर योगिंद्रसिंह जोशी त्यांच्या एका अभंगात म्हणतात –
देवयान पंथी पार्थाचा सारथी तोच माझा साथी अखेरीचा
पार्थाचा सारथी साक्षात भगवंत श्रीकृष्ण स्वत: झाले होते, आणि “तो” भगवंतच माझा शेवटचा साथी असतो, सदैव माझ्या सोबत असतोच हे विसरून आम्हांला चालणार नाही.
महामाता सोटेरियाची त्रिविक्रमावरची आणि महादुर्गेवरची अनन्य भक्ती आणि तिचा अढळ विश्वासच सदैव तिला सत्य दाखवितो. आपण हे नेहमी ऐकतो की Truth is to be revealed and not to be told.
अगदी ह्याच न्यायाने इनाकाला जरी मेडयुसा , सेमिरामिस ह्यांनी नाटक करून फसविले असले तरी चाणाक्ष महामाता सोटेरियाने बरोबर ओळखले आहे की हे त्यांनी केलेले नाटक आहे.
प्रथमशुक्राचार्यांचा पुन्हा झालेला सक्रीय प्रवेश आणि स्कालीचे त्यांना मिळणारे सहाय्य ह्या गोष्टी ध्यानात घेता पिंडार, पॅंडोरा, बफोमेट, केरीडवेन च्या युती विरुध्द स्कालीच्या अधिपत्याखाली प्रथमशुक्राचार्य ,सेमिरामिस, मेडयुसा, सर्की अशी युती असे नवीनच वळण लागेल असे चित्र दिसत आहे, ह्या त्यांच्या आपापसातील कलहामध्ये कोणाचे पारडे जड होईल आणि महामाता सोटेरिया, ​​सेरापिस अनुबिसच्या रूपातील महर्षि सुमेधस ह्या सर्वांना कसे पुरुन उरतील हे वाचण्याची उत्कंठा वाढतच जात आहे….

जय जगदंब जय दुर्गे

हरि ॐ. श्रीराम.अंबज्ञ.
सुनीतावीरा करंडे