#533150

Suneeta Karande
Participant

हरि ॐ.
दिनांक ०६-१२-२०१५ चा अग्रलेख ११८३ वाचताना एक गोष्ट श्रध्दावानांसाठी किती महत्त्वपूर्ण आहे ते जाणवले ती म्हणजे त्रिविक्रमाची भक्ती !
आणि आदिमाता महादुर्गेच्या वचनांचे सामर्थ्य , तिच्यावरच्या अनन्य विश्वासाचे अचित्यदानी फळ !
अत्यंत विलक्षण महापराक्रमी महामाता जेव्हा तिच्या पतीच्या हत्येबाबत आणि तिची भगिनी अनंतव्रताची माता थिया हिच्या बलिदानाने भावुक आणि उद्विग्न झालेली दिसते तेव्हा नक्कीच त्या काळात काही तरी भीषण घडले असेल जेव्हा हे सर्वचजण हतबल झालेले होते ह्याची अस्पष्टशी जाणीव होते. सर्वसामान्यत: एक स्त्री तिच्या पतीच्या निधनाने खूपच हळवी होते, ती स्वत:ला खूपच निराधार समजू लागते आणि आपले आयुष्य़ पूर्णतया कोलमडून पडले असे मानून हतबल झालेली दिसते , अर्थातच झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवबांची जिजाऊमाता ह्यासारखे काही हाताच्या बोटावर मोजण्या इतके अपवाद सोडले तर ! परंतु माता सोटेरियाने मात्र त्यापुढील काळात आपल्या जिवलग आप्तांच्या निधनाने हळवे न होता , भावनेच्या आहारी जाऊन अकार्यक्षम वा निष्प्रप्रभ न होता, अत्यंत कठोर संयमाने आणि महादुर्गा व त्रिविक्रमावरच्या अढळ विश्वासाने स्वत: आपण आणि आपल्या सार्‍या आप्तांकडून जो अचंबित करणारा प्रवास करवून घेतलेला दिसतो तो खरोखरीच अत्यंट स्पृहणीय आणि कौतुकास्पद आहे. तिचे आणि तिच्या पारिवारातील सर्वच सावर्णि घराण्याचे जीवितकार्य हे त्रिविक्रम आणि महादुर्गेवरच्या अनन्य , अविचल विश्वासातूनच यशस्वी होताना दिसते आहे.
असाध्य ते साध्य। करिता सायास।
कारण अभ्यास। तुका म्हणे।।
ह्या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीची प्रचिती येथे पदोपदी येते कारण सदगुरु बापूंनी “आनंदसाधना ” ह्या श्रीमद्पुरूषार्थ्: – तृतीय खण्ड: ह्या ग्रंथात पुरुषार्थगंगेतील आचमन १ – अभ्यास मध्ये सांगितले आहे की अभ्यासानेच कुठलीही ताकद व कुठलेही सामर्थ्य प्राप्त होत असते.
वेडीवाकडी असो वा अडाणी असो , भक्तीच अभ्यासाला बळ पुरविते. धनही व्यर्थ जाते, ताकदही निष्फळ ठरते, सत्ताही विफल ठरते, परंतु अभ्यास केव्हाही व्यर्थ होत नाही.
अभ्यासाने प्रचंड मोठया पर्वताचेही हळूहळू चूर्ण करता येते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे परमात्मा हा अनंत अभ्यासक आहे आणि म्हणूनच परम्यात्म्याच्या सर्व सुहृदांनी हा गुण आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे.
माता सोटेरियाने आणि तिच्या परिवाराने अभ्यास हा गुण आत्मसात केला त्रिविक्रमाच्या भक्तीतून!
आज त्रिविक्रम बापूंनी स्वत: ग्रंथातून हा सोपा मार्ग आपल्याला आधी दाखविला आणि त्याचे प्रात्यक्षिक कसे आचारणात आणायचे असते ते ह्या अग्रलेखांच्या , तुलसीपत्रांच्या माध्यमातून शिकवित आहे. आपण सर्व श्रध्दावानांनी हा त्रिविक्रमाचा – माझ्या बापूंचा , आपल्या सर्वांच्या बापूंचा मार्ग नक्कीच आचरणात आणायलाच हवा असे प्रामाणिकपणे वाटते.या वरून आम्हा सर्व श्रध्दावानांना त्रिविक्रम आणि त्याची माता महादुर्गा म्हणजेच आदिमाता चण्डिका हीच एकमेव खराखुरा आधार असल्याचा फक्त १०८ % विश्वासच ठेवून चालत नाही , तर भरोसाही असायलाच हवा हेच सप्रमाण सिध्द होते. डेमेटरने असाच विश्वास आणि अतूट भरोसा ठेवला असावा महादुर्गेवर आणि तिच्या पुत्रावर त्रिविक्रमावर ठेवला असावा,ज्यामुळेच ती निंबुरावर सम्राज्ञी झाल्यावर एकटी असूनही महामाता सोटेरिया तिच्या मदतीला कोणालाही पाठवायच्या वृध्द सेनापती आरकॉनच्या व अंनतव्रताच्या सूचनेकडे कानाडोळा करते, एवढेच नव्हे तर “नोहॉन” पठारावर डेमेटरला एकटीनेच जाण्याची आज्ञा करते असे वाटते.
आता हा नोहॉन म्हणजेच पलाश वृक्ष ! ह्याचा संबंध हा युध्द्साहित्याशी, युध्दाशी आणि धर्मयुध्द्विजयाशी असतो हे अधिव्रताने डेमेटरला शिकविलेले विधान आठवण करून देते त्या त्रिविक्रमाने त्याच्या अनसूया मातेचे आख्यान सांगताना वर्णिलेल्या कथेतून ! अर्थातच आपल्या सदगुरु अनिरुध्द बापूंनी लिहिलेल्या “मातृवात्सल्यविंदानम् अर्थात् मातरैश्वर्यवेद्: ” ह्या ग्रंथातून आपण वाचतो ती सदगुरु दत्तात्रेयांनी भगवान परशुरामाला सांगितलेल्या अनसूया आख्यानमधील ४४ व्या अध्यायातील गोष्ट. जेव्हा माता अनसूया आपले प्रकट अवतारातील अंतिम कार्य संपादन करण्यासाठी स्वत:च्या आश्रमाच्या सीमेबाहेर येऊन एका पलाश वृक्षाच्या सावलीत एका शिळेवर बसते व दोन्ही डोळे बंद करून परमेश्वराचे अर्थात दत्तगुरुंचे निश्चल ध्यान करू लागते, तेव्हा कलिपुरुष तिला नाना प्रकारे त्रास देऊ पाहतो.अंतिम क्षणी कलिचे सर्व प्रयत्न विफल झाल्यावर अनसूया माता त्या कलिपुरुषाला शुध्दतेची व पावित्र्याची जरब बसणे आवश्यक आहे हे जाणून तिच्या चरणांवर अका अतिशय गरीब,अशिक्षीत परंतु निस्सीम भक्ती करणार्‍या भक्ताने वाहिलेले पळसाचे पान केवल संकल्पमात्रे व तेही दत्तगुरुस्मरण अखंड राखून कलिपुरुषावर फेकते आणि पुढे काय घडते हे आपण सारे जाणतोच की कलिची किती अगतिक, हीनदीन अवस्था करून अनसूया माता त्याला गलितगात्र करते व शरण येण्यास भाग पाडते.
आता ह्याच नोहॉन म्हणजे पलाशवृक्षांनी वेढलेल्या गुंफेत डेमेटरला आढळतात “तत्पर” अवस्थेतील निरनिराळी युध्दयंत्रे, यंत्रिका, अस्त्रे आणि शस्त्रे !
म्हणजेच अंतिम निर्णायक धर्मयुध्दाची जय्यत तयारी !!!
येथेच डेमेटर थबकली आहे १५० फूट उंचीचे प्रचंद मानवी आकाराचे विलक्षण यंत्र आणि त्यावरील “सर्वयंत्रविनाश” हा माता सोटेरियाच्या खास सोटेर लिपीत कोरलेला शब्द वाचून ! कारण ही लिपी माता सोटेरिया, इनाका, झियस, इपेटस व डेमेटर ह्यांच्या व्यतिरिक्त फक्त एकाच व्यक्तीला ठाऊक होती आणि तो होता तिचा प्रिय “हेफॅस्टस” ! आणि पुढे त्रिविक्रमावरील भक्तीतून येणार्‍या माता सोटेरियाच्या असंख्य आशीर्वादांची परिणीती म्हणजे साक्षात “हेफॅस्टस” च्या कुशीत स्थिरावलेली डेमेटर !
अगणित उत्कंठा, अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा दाटविणारे हे माझ्या बापूरायाचे अग्रलेख !!!
बापूराया खरेच खूप खूप खूप अंबज्ञ आहोत की आम्ही सारी तुझी लेकरे , जो हा अफाट ज्ञानाचा सागर तू आम्हासाठी मुक्त हस्ते उधळीला आहे. खरेच हे अत्यंत गूढ , अनाकलीय सत्य केवळ आणि केवळ तूच आम्हाला सांगू शकतोस.
त्या यंत्रावरील “सर्वयंत्रविनाश” हा शब्द वाचताना अचानक बापूकृपेने आठवले की आपल्याला जो “दत्तमालामंत्र” आपले बापू म्हणायला लावतात दिपावलीतील धनत्रयोदशीच्या पूजनाच्या वेळीस त्यात दत्तमालामंत्रात आपण शेवटच्या कडव्यात म्हणतो –
सर्वमंत्रस्वरूपाय, सर्वयंत्रस्वरूपाय, सर्वतंत्रस्वरूपाय, सर्वपल्लवस्वरूपाय ॐ नमो महासिध्दाय स्वाहा ।।
“आनंदसाधना” मधील परिशिष्ट १ – मध्ये ह्याचा अर्थ बापूंनी सांगितला आहे की सर्व मंत्र, सर्व यंत्रे, सर्व तंत्रे, व सर्व पल्लव हे ज्यांचे स्वरूप आहे अशा महासिध्द दत्तात्रेयांना नमस्कार असो. ह्या यज्ञात मी दत्तात्रेयांना आहुती अर्पण करतो.
म्हणजेच सर्व यंत्र ज्याचे स्वरूप आहे तोच सर्वयंत्र विनाशासाठी सुध्दा सहाय्यभूत होऊ शकतो आणि “त्या” अवधूत सदगुरु दत्तातेयांची कृपा आदिमाता चण्डिकेच्या , महादुर्गेच्या आणि त्रिविक्रमाच्या भक्तीतूनच मिळू शकते. म्हणजेच महामाता सोटेरिया आणि तिच्या परिवाराला “सर्वयंत्रस्वरूप” भगवान दत्तात्रेयांची कृपा, आशिर्वाद नक्कीच लाभणार आहेत.
ह्यात आणखी एक गोष्ट प्रकर्षाने आढळली की ६ डिसेंबरच्या अग्रलेखाच्या बाजूलाच दैनिक प्रत्यक्ष मध्ये एक तिसर्‍या महायुध्दाशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाची बातमी छापली गेली होती आणि ती म्हणजे –
“तिसरे महायुध्द सुरु रशियाची आण्विक सिध्दता ” या बातमीत उल्लेख होता – लष्करी तळ उध्दवस्त झाल्यानंतरही संरक्षणदलांना प्रतिहल्ल्याची ऊचना व आवश्यक माहिती पुरविण्याची जबरदस्त क्षमता असलेले ’इल्युशिन आयएल-८०’ हे अतिप्रगत विमान ! या विमानाला ’डूम्सडे प्लेन’ अर्थात प्रलयाच्या दिवशी वापरले जाणारे विमान असे म्हटले जाते. आण्विक किंवा सर्वसंहार करणार्‍या भयंकर हल्ल्यात लष्करी तळ, जवान व अधिकारी ह्यांचा बळी गेल्यानंतर ’आयएल – ८०’ विमानांचा वापर करता येऊ शकतो. ह्या विमानाचा माग काढणे अशक्य कोटीतील बाब असते आणि त्यामुळे ’आयएल – ८०’ ही अजेय यंत्र्णा ठरते असा रशियाचा दावा आहे. रशियाखेरीज अमेरिकेकडेच अशी यंत्रणा असलेले विमान आहे.
ह्या बातमीतील ” सर्वसंहार ” हा शब्द आणि अग्रलेखातील “सर्वयंत्रविनाश” हा शब्द कोठेतरी समान धागा दर्शवित आहेत असे राहून राहून वाटते. कदाचित हे चुकीचे असेलही पण बापूच आपल्याला एकाच पानावर ह्या दोन्ही साधर्म्य असणार्‍या बातम्या दाखवून येणार्‍या काळाची दिशा दर्शवित आहेत असेच वाटते कारण हा निव्वळ योगायोग असूच शकत नाही. बापूच गुरुवार दि. १३-०३-२०१४ रोजीच्या प्रवचनात जगविख्यात शास्त्रज्ञ आइनस्टाइन यांच्या “माणूस ज्याला योगायोग म्हणतो, ती खरं तर भगवंताने नामानिराळे राहून त्या मानवाच्या हितासाठी केलेली योजना असते”, (coincidences are nothing but the God’s ways of remaining Anonymous) ह्या वाक्यासंदर्भात सांगितले होते की योगायोगाला अस्तित्व नसून ती भगवंताची लीला असते आणि भगवंत स्वत:कडे कुठलेही श्रेय न घेता लाभेवीण प्रेमाने आपल्या लेकारांसाठी त्यांच्या विकासाची योजना कार्यान्वित करत असतो.
खरेच दैनिक प्रत्यक्ष मधून आपले सदगुरु बापूच येणार्‍या काळाची पावले आपल्याला समजावून दाखवित आहे प्रत्यक्षपणे आणि तेही आपल्या स्वत:कडे कुठलेही श्रेय न घेता, सारे श्रेय आदिमातेच्या चरणी अर्पण करून – हेफक्त तिचा पुत्र परमात्मा, त्रिविक्रमच करू शकतो – “लाभेवीण प्रेम”
अंबज्ञ अंबज्ञ अंबज्ञ
हरि ॐ. श्रीराम. अंबज्ञ.
बापूराया तुझ्याच कृपेने आम्ही सारी तुझी लेकरे तुझ्या आणि आदिमातेच्या चरणी अंबज्ञ आहोत आणि सदैव अंबज्ञच राहू !
जय जगदंब जय दुर्गे !!!

सुनीतावीरा करंडे