Forums Sai – The Guiding Spirit हेमाडपंतांची व यवनाची भेट (Hemadpant’s tryst with Mohammedan gentleman) Reply To: हेमाडपंतांची व यवनाची भेट (Hemadpant’s tryst with Mohammedan gentleman)

#329231

snehalgadkari26
Participant

हरि ओम
Topic वाचला आणि साई चरित्रातील अतिशय सुंदर ओव्या आठवल्या .

साई संकल्प विद्योती उजळली हि चारित्र्य ज्योती
मार्गदर्शक होवो तद्दीप्ती मार्ग भावार्थी उमगोत
खरोखरच ! साई चरित्रातील या गुरु भक्तांच्या कथा वेड लावतात. प्रत्येक भक्ताचा प्रवास वेगळा आणि या प्रत्येक भक्तासाठी त्याला अभ्युदय आणि निः श्रेयस याची प्राप्ती करून देऊन त्याचा मागच्या जन्मी पेक्षा अधिक पटींनी विकास घडवून आणून त्याला सामिप्यग्रामी पोचवण्याची तळमळ असणाऱ्या या माझ्या अतिशय लाडक्या सद्गुरूचे प्रयास पाहिले कि खरोखर विगतकृत त्रिविक्रमाची प्रार्थना आठवते .

हेमाडपंत आणि यवनाची भेट आपल्याला भक्तीमार्गावरील प्रवासाचे अनेक पैलू निदर्शनास आणून दाखवते.हेमाडपंतांच्या डब्यात चालत्या गाडीत चपळतेने पडलेले यवनाचे पाऊल म्हणजे साईनाथांचे हेमाड पंतांच्या जीवनात पडलेले पहिले सक्रिय पाऊल आहे .बाबांची अचूक आणि अतिशय तत्पर मार्गदर्शकता आहे .आपल्या बाळाचे एक पाऊल आपल्या दिशेने पडल्यानंतर हा सद्गुरु स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कसा आपल्या भक्ताच्या मार्गात जाऊन अत्यंत चपळाईने त्याला वेळीच सावध करून पुन्हा योग्य मार्ग दाखवतो. साई चरित्रात अनेकविध भक्तांचे प्रवास येतात किंबहुना या सद्गुरूचे प्रत्येक बाळाला आपल्या जवळ खेचण्याचे मार्ग वेगवेगळेच .इथे केवळ लंगड्या मनाला ताळ्यावर आणावे या भाबड्या पण प्रामाणिक हेतूने बाबांकडे आलेले दीक्षित काका जसे आहेत तसेच केवळ बाबांचे परीक्षण करण्यासाठी आलेले सोमदेव स्वामी आहेत .,महारोगासारखे अतिशय घोर प्रारब्ध असूनही बाबांच्याच अकारण कारुण्याने त्यांचा हात हातात घेण्याचे भाग्य लाभलेला भागोजी आहे तर बाबांच्या हस्तरेषा पाहण्याच्या कुतूहलाने मशिदीत आलेले मुळे शास्त्रीही आहेत. तरीही प्रत्येकाच्या जीवनाचा सुंदर प्रेमप्रवासच बाबांनी करून दिला हा सद्गुरु असाच प्रेमळ असतो क्षमेचा पुत्र प्रचंड क्षमा धारण करतो आज आपण . अनुभवतोच बापुरायाकडे .

खर तर यालाच ओढ असते आपल्या बाळांना भेटण्याची। “छाये खालता बैस जरा ” हे खर तर हा सदगुरु प्रत्येक बाळाला म्हणून बोलावीत असतो पण आम्हीच नाटाळ असतो हेमाडपंत स्वतःचीच कथा अत्यंत प्रांजळपणे मांडत आहेत .ते जरी स्वतःला नाटाळ, टवाळ आदी विशेषणे लावत असले तरी हा त्यांचा या सद्गुरू च्या पायांशी असलेला शारण्यभाव आहे. हेमाडपंत वेद जाणत होते बाप्पांनी सांगितले तसेच ज्ञानेश्वरी ,पुराणे आदि अध्यात्मिक ग्रंथांचा त्यंचा गाढ अभ्यास होता भागवत तर मुखोत्गत होते . हेमाडपंत १७ व्या अध्यायात लिहितात “तैसेच आम्ही दिसाया थोर ,परी त्या सिद्ध साई समोर , खरेच आम्ही पोरांहूनी पोर” अगदी सामान्य पातळीवर जाऊन आपला भक्तीमार्गातील प्रेमप्रवास हा सद्गुरू कसा करून घेतो याचे मार्गदर्शन हेमाडपंत करतात

आपल्या प्रिय मित्रांकडून , दिक्षित काका आणि नानासाहेब चांदोरकर यांच्याकडून हेमाडपंतांना बाबांबद्दल कळले होते या दोघांच्या मनापासून केलेल्या आग्रहास्तव हेमाडपंत शिरडीला जाण्यासाठी निघायचे निश्चित करतात आपल्याला वाटत असते कि आपण सद्गुरूच्या दर्शनाला जातो पण खरच बापूंनी सांगितल्याप्रमाणे आपण सद्गुरु कडे जाणारे कोण असतो त्यानेच आपल्याला select केलेले असते म्हणून आपण त्याच्याच कृपेने त्याच्या दर्शनाला जात असतो हेमाडपंतांना पुढे हे सत्य पटतेच हेमाडपंत लिहितात
न जाणू कवण्या जन्मांतरी ,कवण्या प्रसंगी कवण्या अवसरी
केले म्यां तप कैशियापरी घेतले पदरी साईने
हे काय म्हणावे तपाचे फळ ,तरी मी तो जन्माचा खळं
साईच स्वये दीनवत्सल ,कृपा हि निश्चल तयाची
पण हे विचार पुढचे ,सुरवातीला आपल्या या मित्रांच्या सांगण्यावरून हेमाडपंत शिर्डीला जायला निघतात तर खरे, पण आपल्याला ठाऊक आहे कि त्यांच्या प्रिय मित्राचा पुत्र लोणावळ्याला निधन पावतो त्याचे गुरु जवळ बसतात तरी मृत्यू पासून ह्या भक्ताच्या एकुलत्या एक मुलाला वाचवू शकत नाहीत आणि मग हेमाडपंतांचे मन उचल खाते. खरच बापूंचे शब्द आठवतात कि भक्ती हे बुद्धिवानाचेच काम आहे .भक्ति बुद्धीनेच करता येते पण प्रेम करणे हे मनाचेच कार्य आहे आणि उत्कट प्रेमच भक्तिमार्गात आपल्या निष्ठा रुपी जात्याचा खुंटा कोणत्याही प्रसंगी घट्ट ठेवत. देवयान मार्गावरच्या हेमाडपंतांना अजून हा प्रेमाचा स्पर्श व्हायचा बाकी होता का असा प्रश्न पडतो मनाला …पण खरेच आहे कि कितीही शास्त्रांचा अभ्यास केला तरी सद्गुरूच्या कृपेशिवाय भक्तीमार्गातील प्रगती होणे शक्य नाही कारण ती तळमळ त्या सद्गुरुचीच असते. आपल्या बाळाच्या विकासासाठी त्याला प्रसंगी मारत झोडत शाळेत पाठवणाऱ्या आईसारखी तळमळ असते त्याची , म्हणून बाबांचे प्रयास चालूच राहतात आणि मग पुन्हा एकदा नानासाहेब चांदोरकरांच्या द्वारे ,त्यांच्या कळकळीच्या आग्रहाने हेमाडपंत पुन्हा एकदा शिरडीला जाण्याचा निग्रह करतात . हि कथा खर तर आपलीच आहे हेमाडपंत निमित्त आहेत असे मला प्रामाणिकपणे वाटते .
.
मन हे प्रवर्तक इंद्रिय असणाऱ्या मानवाच मनच दुबळ असत, त्या मनाला समर्थ बनवण्याचे सामर्थ्य फक्त या मनःसामार्थ्यदात्याकडेच असते आणि म्हणूनच छायेखाली न येणाऱ्या आपल्याच बाळांसाठी हा सद्गुरु , आपल्या मोठ्या आईचा पुत्र, तिच्याच प्रमाणे आपली करुणा विस्तारत राहतो. कशी ते आपण या लीलेतून पाहतो .
हेमाडपंत शिर्डीला जाण्यास निघाले. दादरला जाऊन मनमाडची गाडी गाठायची म्हणून दादर पर्यंतच तिकीट घेतलेले असते आणि गाडी सुटताच एक यवन अति चपळतेने आत शिरतो आणि स्वतःहून चौकशी करून हेमाडपंताना सांगतो कि गाडी दादरला थांबणार नाही आपण सरळ बोरीबंदरला जा. या प्रसंगातील दोन ओव्या लक्ष वेधून घेतात
‘यवन एक गाडी सुटता अति चपळता आत ये ‘
नकळे मग या चंचल मन काय कल्पना उठत्या ते
खरच किती धडपड आहे या सद्गुरूची .देवयान पंथावरून चालणाऱ्या आपल्या बाळासाठी आणि ज्याचे एक पाऊल जरी सद्गुरूच्या दिशेने पडले असते त्या बाळासाठीरु हा सद्गुरु चालत्या गाडीत चढण्याची ” risk” घेतो ह्या इथेच मन थबकते. हेमाडपंत ” चपळाई ” शब्द वापरतात हि चपळाई त्याला करावी लागली आणि नेहमीच करतो तो, कारण जर हेमाडपंताना गाडी मिळाली नसती तर पुन्हा हेमाडपंतांच्या मनात विकल्प आला असता आणि मग ते बाबांकडे कसे आले असते ? पण खरच सद्गुरूच्या दिशेने एक पाऊल टाकणाऱ्या भक्ताची गाडी हा बाप्पा कधीच चुकू देत नाही त्याला त्याच्या उचित destination ला हा सद्गुरु पोचवतोच .आणि भक्तासाठी हवहवस गंतव्य स्थान एकच असत आणि ते म्हणजे आपल्या लाडक्या सद्गुरूच सामिप्य . क्षणोक्षणी संकल्प विकल्पाच्या फेऱ्यात अडकणाऱ्या मनाला थांबवण्यासाठी मनापेक्षाही अधिक वेग हवा नाही का ?मनोजवम मारूततुल्य वेगम अशा हनुमंताचा स्वामी असणाऱ्या सद्गुरूच्या वेगाची कल्पनाच केलेली बरी म्हणुन त्या मद्रासी भक्ताला बाबा म्हणतात धाव मला पकड आणि बाबा क्षणात दृष्टीआड जातात सुद्धा. आजही बापूंचे श्रद्धावानांसाठी चाललेले प्रयास ,तळमळ पहिली कि या प्रसंगाची प्रचीती येते …हेमाडपंतांच्या मनात हा प्रसंग नीट कोरला गेला . हेमाडपंतांच्या किती ओळखी होत्या ,त्यांचे अनेक मुसलमान हि ओळखीचे होते पण हा अनोळखी यवनच कसा नेमका गाडीत चढतो हा विचार मनात येतो . हेमाडपंताना शिरडीच्या मार्गात प्रथमच भेटणारा हि यवन आणि साईनिवास मधे बाबांची मूर्ती घेऊन येणारा हि यवनच,. त्या काळी हिंदू मुसलमान यांच्यात खूप दुही होती हेमाडपंताना तर असा काही भेद नव्हताच पण बाबांना या लीलेतून सामान्य भाक्तानाही मार्गदर्शन करायचे आहे कि हा सद्गुरु जात पात याच्या पलीकडे जाऊन नेहमी भक्ताला मदत करण्यास उत्सुक असतो । पुढे बाबांचा निस्सीम भक्त झालेला मेघाही ” नाही नीच यवनापरता ” असे उद्गार काढतोच न सुरवातीला ! .बाबांना हेमाडपंतांच्या मनाचा ठाव तर घ्यायचा नव्हता न असा विचार येतो, कारण हेमाडपंतानी विश्वास ठेवलाय या अनोळखी यवनावर . मला वाटत बाबांनी हेमाडपंतांची आकृती घडवायला याच क्षणापासून सुरवात केली होती
यवनरुपी बाबांच्या मुखातील या ओळी खूप महत्वाच्या आहेत. हा सद्गुरु कशा प्रकारे सन्मार्गावर चालू इच्छिणाऱ्या बाळांना मार्गदर्शन करतो हे स्पष्ट होते
“उतरू नका हो दादरावर ,मेल न तेथे थांबणार ,बोरीबंदर गाठावे ” स्पष्ट मार्गदर्शन आहे .थांबू नका आणि का थांबू नका आणि पुढे काय करा. नाहीतर what to do and what not to do ,काय करावे आणि काय नाही या द्न्द्वात अख्खं आयुष्य जात पण सद्गुरु शिवाय कोणीही उचित मार्ग दाखवू शकत नाही क़य करायचे नाही ,का करायचे नाही आणि काय करायचे हा ठाम निर्णय भक्ताच्या जीवनात सद्गुरु घेतो आणि त्यांच्या कल्याणासाठी तसे करायला लावतो त्याचे शब्द हि त्याची आज्ञाच असते ती आपण बिनदिक्कत पाळायची असते. हेमाडपंतानी हि बाबांची आज्ञा सहजपणे पाळलेली आहे आज आपले बापूही आपल्या बाळाना कलियुगाच्या भीषण परिणामांची सूचना देऊन त्यातून सही सलामत बाहेर आणण्यासाठी काय करायचे नाहीआणि का ? आणि काय करायचे हि त्रिसूत्री अत्यंत तळमळीने आपल्या जीवनात उतरवत आहेत. अगदी आहारापासून विचारापर्यंत ,काय खायचे नाही ,का खायचे नाही आणि काय खायचे ,याचे हीच त्रिसूत्री सांभाळून केलेले मार्गदर्शन आज आपले बापू करतात म्हणून आपली आनंदी जीवनाची गाडी चुकत नाही इतरांसारखी हे आपण अनुभवतो .
हेमाडपंत आणि यवनाच्या ह्या भेटीतून या सद्गुरूचे perfect timing हेमाडपंताना जाणवते .बापूंच्या शब्दांची आठवण होते कि” मी नेहमी वेळेवरच पोचतो “हेमाडपंत स्पष्ट शब्दात कबुल करतात कि “होती न वेळेवर हि सूचना ,नकळे मग या चंचल मन काय कल्पना उठत्या ते ”
उद्धरेत आत्मना आत्मानं” या वचनाचे निस्सीम पुरस्कर्ते असलेल्या हेमाडपंताना या प्रसंगातून नक्की जाणवते कि सद्गुरुकडे जाण्यासाठी पहिले पाऊल उचलण्याची तळमळ फक्त आपली तीही त्याच्याच कृपेने पुढची सर्व चळवळ त्याचीच “माझे तरी काय असे सर्व तुझेची रे देवा ” तो यवन म्हणजे बाबाच होते हे जाणण्याएव्हडे हेमाडपंत सुज्ञ होते . सनमार्गावरून चालतानाही पुढे येणाऱ्या अडचणींचे ज्ञान फक्त त्यालाच असते आणि त्याच प्रेम अपार असत” तुम ते प्रेम राम के दुना” “निजप्रेम निदर्शना आणिले ,सहज लीलेकरून ” हेमाडपंतांच्या मनात निर्माण झालेले हे प्रेम आणि अम्बज्ञता हेमाडपंतांच्या कृतीतून स्पष्ट दिसते. हेमाडपंत शिरडीच्या च्या पवित्र भूमीवर पाऊल ठेवतात आणि त्यांच्या हृदयांत आनंदलहरी उसळतात बाबा तर हेमाडपंतांच्या दिशेनेच येत होते केंव्हापासूनच ! आणि हेमाडपंत अक्षरशः धावत सुटतात बाबांच्या दिशेने आपले मानसन्मानाचे, विद्वत्तेचे कल्पनांचे सगळे पडदे फाडून बाबांची पहिलीवहिली धुळभेट घेतात …
हेमाडपंत आणि यवनाच्या त्या भेटीतूनच पुढे हेमाडपंतांच्या जीवनातला साईप्रेमाचा वृक्ष बहरत गेला ।हेमाडपंताना पहिल्यापासूनच योग्य गाडीत बसवले गेले ज्या गाडीत बसल्यापासूनच हेमाडपंतांच्या मनात सद्गुरूच्या अकारण कारुण्याचे गुणसंकीर्तन नक्कीच चालू झाले असेल आणि मग ते बाबांच्या स्पष्ट आज्ञेने चालूच राहिले अखेरच्या श्वासापर्यंत ! मागणच तस मागितलं” जो वरी या देही श्वास ,नीज कार्यासी साधून घ्या:” .सद्गुरूच्या सामिप्यग्रामाला हेमाडपंत पोचले या हेमी हा हेमाडपंत विरून गेला । या आपल्या बाळाच्या भेटीची ओढ बाबांनाच होती. सद्गुणांच्या अलंकारांनी सजवण्याचा नादच असतो या सद्गुरूला नाही का ?

“बाळकासी घालीता लेणे ,बालक त्यातील स्वारस्य नेणे
ते कौतुक एक माताच जाणे ,तैसेच करणे सद्गुरूचे ” हरि ओम ! श्रीराम ! अम्बज्ञ !