#192983

आजचा अग्रलेख खूप सुंदर होता.  आजच्या अग्रलेखातल्या अफ्रोडाइट आणि हर्कुलीस ह्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संवाद त्यांच्या भावना, प्रेम पावित्र्य आणि कर्त्यव्य दक्षता ह्यांचे वर्णन वाचताना तो इतिहास नकळत पणे डोळ्यासमोर येतो.  आणि आपण त्या गोष्टीत इतके तल्लीन होतो कि आता पुढे काय असेल? ही जिज्ञासा उतपन्न करते.  त्रिविक्रम आणि अफ्रोडाइट ह्यांचा संवाद, तसेच तिचा तिच्या भावनेला विरोध न करण्याचे सांगणे.  त्याचवेळेस हर्कुलीसची खरी ओळख! ह्या गोष्टीं त्याचप्रमाणे डेमेटर, प्रोमेथस, माता ह्रिया, माता सोटेरीया ह्यांचे पावित्र्य जपण्यासाठीचे चाललेले प्ल्यानिंग आणि विविध गोष्टींचा पूर्वनियोजित बारकाईने चाललेला त्यांचा अभ्यास खरंच खूप आश्चर्यदायी आणि कौतुकास्पद आहेत.  बापू प्रत्येक गोष्ट किती अलगद आणि सुंदररित्या सांगतो.  प्रत्येक गोष्टीचे कोडे बापूंच्या प्रत्येक अग्रलेखातून उलगडतेच.

दोघांचा प्रेमाचा अबोल नजराणा देखिला,
मनाची चलबिचलता आज नजरेने हेरीला.

दोघांचा प्रेमाचा अबोल नजराणा देखिला,
मनाची चलबिचलता आज नजरेने हेरीला .

आहे दोघांचेही प्रेम,
परी हे सांगण्यास एकमेका धजले
कावरी बावरी ती आज प्रथमच झाली.
त्याला पाहता ती नकळतच गोंधळली.

त्याच क्षणी त्याने पाहिले तिला,
पाहता क्षणीच त्याने मिटल्या पापण्या.
लाजली ती आज प्रथमच त्याला,
तिचे लाजणे त्याने डोळ्यातच साठवल्या.

काय प्रेमाची लावण्यता, काय प्रेमाचा गोडवा,
पवित्र प्रेमाचा हा विलक्षण सोहळा.
आला बंधू सोबतीला बहिणीचा पाठीराखा,
ओळखिली बहिणीच्या चेहर्यावरची खळबळता.

दोघांचे शब्दांत वर्णन अवर्णनीय अतुलनीय,
प्रेम आणि पावित्र जपणारे
पराक्रमी, साहसी, धाडसी व धैर्यी
दिला दुजोरा बंधूने प्रेमाने सहमती दर्शवूनी.

मन दोघांचे तरीही तितकेच कर्तव्य दक्ष,
एकमेकांना न सांगताही, निष्ठा प्रेमावरी.
प्रेमात असणे म्हणजे काय असते!
कळले आज दोघांनाही, नजरेतूनीच नजरेला.
लाभेवीन ‘प्रेम पावित्र्याचा’ हा विलक्षण सोहळा.

श्रीराम!
अंबज्ञ.
अनुप्रिया ठोंबरे-सावंत.