#192329

ketaki. Kulkarni
Participant

आजचा सुरुवातीपासूनच अफलातून असणाऱ्या अग्रलेखातून जे थोडे काही सुचले ते मांडण्याचा केलेला हा एक छोटा प्रयास..

अखेर त्यांच्या लपंडावाचा
खेळ हा संपला
त्याच्याविषयी तिच्याही मनात
प्रेमभाव दाटला

कावरी बावरी होऊन अन लाजून ती
त्याच्याकडे  बघत होती
मनातील तिच्या तो गोंधळ सारा
ती सावरु पहात होती

त्याची ही नजर नेमकी
तेव्हाच तिच्याकडे वळली
तिची गोंधळलेली स्थिति बघून
मग त्याने ही पापणी मिटली

जरी त्याने घेतला होता
मिटूनी त्याचा डोळा
तरीही साठवली होती मनात
तिची ती लज्जित मुद्रा

काय त्या प्रेमाची माधुर्यता
अन काय ह्या प्रेमाचा गोडवा
ह्या दोघांतील ह्या पवित्र प्रेमाचा
रंगच होता काही वेगळा

प्रेम प्रेमाच्याच अधीन होताना
ह्या प्रेमास नेमके वाटत असेल कसे
स्वतःसच स्वतःपुढे व्यक्त होताना
हे असेच काहीसे होत असेल

आजचा अग्रलेख खरच खूप सूंदर.. त्रिविक्रम अफ्रोडाइटला तिच्या भावनेला विरोध न करण्यास सांगतो व तेव्हाच सांगतो की ” हरक्यूलिसची खरी ओळख फक्त मलाच ठाऊक आहे”
आता प्रश्न पडला तो म्हणजे नक्की हा हरक्यूलिस कोण?? ज्या प्रमाणे अफ्रोडाइटचे अस्तित्व दैवी होते तसेच हरक्यूलिसही कोणी दैवी अवतारच असावा का?
तसेच ह्या दोघांचे प्रेम पूर्णत्वाला गेले असावे का??
खरोखर.. बापूंचे अग्रलेख प्रत्येक वेळी एक नवीन जिज्ञासा उत्पन्न करणारे असतात.. हे कोडे ही नक्कीच लवकर उलगडेल बापूंच्या अग्रलेखातून… 🙂
अंबज्ञ
केतकीवीरा कुलकर्णी