A Complete U-Turn

#124228

Aniketsinh Gupte
Participant

हरी ॐ,

‘A Complete U-Turn’!! मागील ४-५ अग्रलेख म्हणजे रणरणत्या वाळवंटातून सुखद आणि नयनरम्य परिसरात प्रवेश केल्याचा अनुभव !! जिथे “आता सारे काही संपले” ही परिस्तिथी होती तिथून “आता सारे काही संपले” हीच परिस्तिथी आहे….फरक फ़क्त गटांचा आहे.
बघता बघता संपूर्ण चित्र फिरले !
झालेली घटना आणि त्याचा सुंदर संदर्भ सर्वांनी आधीच उत्तम रित्या मांडले आहे. सुनितावीरा, केतकीवीरा, शांतनुसिंह तसेच इतरांचे लेख आणि विचार उत्तम ! “ये सब लोग कुत्ते की मौत मरेंगे” हे वाक्य खरोखरच आता स्पष्टपणे दिसून येतय. ह्या संपूर्ण मालिकेत हर्कुलिस आणि अफ्रोदाईट ह्यांच्यासाठी सर्वांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण झालीच आहे. सम्राज्ञी बिजोयमलाना, हिने तर आपल्या बुद्धी-कौशल्य ने सर्वांचे मने अगोदरच जिंकली आहेत. पण आता मी खरा fan झालोय ते म्हणजे सम्राट झियसचा ! मागील काही अग्रलेखातून त्याचे सम्राट म्हणून असलेली नियुक्ती त्याच्या हालचाली वरून स्पष्ट होते. एखाद्या कठीण प्रसंगी डोक स्थिर ठेवून निर्णय घेणे, आपल्या सार्या आप्तजनांचे स्वहित राखणे, एकाच वेळी सर्व दिशेने, सर्व ठिकाणी आपली माणसे पेरून त्या नीच आणि हलकट माणसांचे मनसूबे पाडून लावणे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर त्याचे अजुन एक स्वभाव-अंग बघतो आणि ते म्हणजे शून्य अहंभाव. सम्राट असूनही स्वतःच्या पदचा जराही अहंकार त्याला नाही, उलट आपण आधी चुकलो ह्याचे कबूली तोह सर्वांसमोर करतो. बरेच काही शिकण्यासारखे आहे.

युद्धाच्या ह्या टप्प्यावर काही महत्वाच्या गोष्टी आणि तसेच श्रद्धावान आणि श्रद्धाहीन लोकांमधला फरक समजून घ्यायला हवा.

वरकरणी दिसत असलेला पराभव ह्यातही विजयश्री खेचून आणणे हे फ़क्त योग्य रणनीति, चणाक्ष बुद्धिमत्ता व ह्या सर्व planning ला सर्वांनी दिलेली उत्तम साथ ह्यामुळेच शक्य झालेले दिसते. अफ्रोदाईट व सम्राट झियस ह्यांनी केलेली अचूक planning ने हे सारे काही शक्य झाले हेच समोर येते.
आजचा काळ हा अतिशय बिकट आहे. ज्याचा कधी विचारही केला नाही असे गोष्टी, माहिती आपल्यासमोर येत आहेत. पण ह्या सर्वातून माझा Dad योग्य मार्ग काढेलच हा विश्वास आहे. ह्यासाठी त्याची planning कधीच सुरु झालीय हे ही आपण जाणतोच.
हा विजय प्राप्त होण्याचे एक महत्वाचे कारण जसे वर सांगितले म्हणजे सर्वांची साथ. सर्व श्रद्धावान आपल्याला नेमून दिलेले कार्य अचूक बजावतात. आपण हे कार्य महामाता महादुर्गेच्या प्रेरणेने सार्या व्रती आणि सार्वनी पंथीय लोकांसाठी करत आहोत ह्याचा विचार सर्वांच्या मनात दृढ़ आहे. कोणालाही स्वतःचे कोणतीच इच्छा किंवा महत्वांक्षा ह्याला आड़ येत नाही. ह्याच उलट आपण बघतो की वरवर जरी सर्व श्रद्धाहीन एकत्र आले असले तरी प्रत्येकजण दोन युद्ध खेळत आहे – एक म्हणजे ह्या सर्व श्रद्धावान विरुद्ध आणि दुसरे स्वतःची महत्वांक्षा जपण्यासाठी एकमेकांविरुद्ध. कुठेही एकी किंवा विश्वास अजिबात नाही. ह्याचे उदहारण आपल्याला स्पष्ट दिसून येत –
हेर्मिस जेह्वा प्रोमेथ्स व झिरोनला प्रथम सर्की व उतनापिष्टिम सोबत पाहतो तेह्वा त्याचा विश्वास अजिबात डगमगत नाही. हे दोघे असे करुच शकत नाही असा त्याचा विश्वास खरा ठरतो. ह्याच उलट जेह्वा उतनापिष्टिमला जाग येते तेह्वा आपल्याला दगा सर्कीनेच दिला आहे हा त्याचा ठाम विश्वास बसतो. कुठेही त्याच्या मनात असा विचार येत नाही की ह्याच्या मागे काही दुसरे planning असून सर्कीही आपल्यासारखीच अडकली असावी. उलट तो तिचा अधिक द्वेष करू लागतो.
आजच्या अग्रलेख (१२.०२.२०१५) मधे एक महत्वाची गोष्ट समोर येते. उतनापिष्टिमला जाग येताच समजते की त्याची जीभ कापलेली आहे आणि कुविद्या प्राप्त करण्यासाठी केलेले मंत्रोच्चार तो पुन्हा करू शकत नाही कारण ते करण्यासाठी मोठ्याने बोलावे लागते. मनातल्या मनात हे मंत्रोच्चार करण्याचा काहीच उपयोग नाही. पण अगदी ह्याच उलट कोणत्याही श्रद्धावानाने अगदी भावनेने, मनाने भगवंताचे नाव नुसते मनात जरी घेतले तरी ते नाव, मंत्र त्याचे कार्य करून जाते.
आज आपण illuminati बद्दल वाचतो. ही लोका दुहेरी आयुष्य जगतात असे समोर येते. सर्वांसमोर साध सरळ आयुष्य तर अंधारातिल त्यांचे वेगळे जीवन. तिथे ते त्यांचे कुविद्येचे धड़े घेतात कारण हा अभ्यास किंवा ह्याचे उच्चार मनातल्या मनात करून काहीच उपयोग नाही आणि म्हणुनच त्यांना अंधार आणि अलिप्तपणाचा आधार लागतो. तर एक श्रद्धावान जसा आहे तसा अगदी ताठ मानेने आपल्या भक्तिभावनेचा कसलाही आड़ पडदा न ठेवता जगतो. कारण त्याच्या पाठीशी त्याच्या देवाचे बळ आहेच हाच त्याचा ठाम विश्वास !

पुढे येणारे अग्रलेख अजून बरेच काही शिकवतील ह्यात दुमत नाही. तसेच ह्या सर्व इतिहासाचे शेवट जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

हे त्रिविक्रमा तू खुप प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे
अनिकेतसिंह गुप्ते