12 Labours of Hercules

#198719

हर्क्युलिस आणि अफ्रोडाईट (Hercules and Aphrodite) यांचा स्वतःच्या भावनांवर किती संयम आहे हे दिसून आले. त्रिविक्रमाच्या (Trivikram) अनुमतीशिवाय ह्या भावना प्रगट करणॆ ही अफ्रोडाईटला उचित नाही वाटत. अहहा!!! काय ही कर्तव्य निष्ठा. महादुर्गेने (Mahadurga) दिलेल्या कार्या पुढे कोणतीही भावना महत्त्वाची नाही. स्वतःचे असे काही उरतच नाही. त्रिविक्रमाच्या अनुमती नंतर अफ्रोडाईटने हर्क्युलसकडे भावनिक झुकते माप टाकले. यावेळी बापूंनी ज्या प्रकारे वर्णन केले ते वाचून अक्षरशः निशब्द झाले.

एक गोष्ट मला प्रकर्षाने मांडायची आहे.

त्रिविक्रम – अफ्रोडाईटचा बंधू (संदर्भ अग्रलेख)
अफ्रोडाईट म्हणजेच अरुला (संदर्भ अग्रलेख)
अरु्ला – त्रिविक्रमाची कार्यशक्ती (संदर्भ अग्रलेख)
अरुला (Arula) – विश्वातील हिलींग पावर (श्रीश्वासम प्रवचन)
ह्नुमंत – त्रिविक्रमाचा मोठा बंधू (संदर्भ बापूंचे प्रवचन)
हनुमंत हि हिलिंग पावर आपल्या शरिरात पोहचवतो आणि ती सप्त चक्रांमध्ये खेळविण्याचे काम त्रिविक्रम करतो. अर्थात इथे स्पष्ट होते त्रिविक्रमाच्या आज्ञेत हिलिंग पावर (healing power)कार्यरत असते.

मग ही हिलिंग पावर अर्थात अफ्रोडाईट ज्या हर्क्युलिसच्या प्रेमाला दुजोरा देते तो हर्क्युलिस म्हणजे नक्की कोण? उत्कंठा अधिक वाढली आहे.

कारण “हर्क्युलिसची खरी ओळख फक्त मलाच ठाऊक आहे”. हे त्रिविक्रमाच्या उदगाराने तो नक्कीच कुणीतरी वेगळा असावा हे पूर्णपणे पटते. मला वाटते मागच्या काही अग्रलेखांमधून आणि प्रवचनातून याच्या उत्तराची हिंट बापूंनी दिली असावी.

—————————————
हर्क्युलिस कोण? जगविख्यात हर्क्युलसचे १२ लेबर(12 labours) खरच होते का? जर होते तर त्यामागिल सत्य काय? त्याचा संबंध श्रीश्वासमच्या प्रवचनात बापूंनी उल्लेख केलेल्या ज्या १२ गोष्टींवर उपाय होतो त्याच्याशी काही संबंध असू शकेल काय?

ते बारा उपाय पुढील प्रमाणॆ –
Dis-ease (म्हणजे व्यधी, सर्व प्रकारच्या व्याधी)
Dis-comfort (म्हणजे पीडा, सर्व प्रकारच्या पीडा दूर करण्याचं सामर्थ्य ह्या गुह्यसूक्तामध्ये आहे, ह्या हीलिंग कोडमध्ये आहे.)
Dis-couragement (म्हणजे निराशा, उत्साहभंग, साहसहीनता, ह्यांचा नाश होऊ शकतो ह्याने)
Des-pair (म्हणजे नाउमेद होणे, किंवा भग्नाशा, आशेचा पूर्ण नाश झालेला असतो)
Depression (म्हणजे खिन्नता, न्यूनता, मंदी, किंवा उदासपणा, औदासीन्य नाही – उदासपणा)
Fear (म्हणजे भय)
Weakness (म्हणजे दुर्बलता, हे केवळ शारीरिक Weakness नाही, सगळ्या प्रकारचा Weakness लक्षात ठेवा)
Deficiency (म्हणजे कमतरता, आपण म्हणतो ना की त्याच्यामध्ये विटॅमिन Deficiency झालेली आहे, म्हणजे विटॅमिनची कमतरता आहे, ही दुरुस्त केली जाऊ शकते)
Unrest & Trouble (म्हणजे अशांती आणि त्रास, हे दोघेही जुळे आहेत, हे एकत्रच असतात)
Grief (म्हणजे शोक)
Conflict (म्हणजे संघर्ष)
Feebleness (म्हणजे कमकुवतपणा)

आणि हर्क्युलिसचे बारा लेबर पुढील प्रमाणे –

Slay the Nemean Lion.
Slay the nine-headed Lernaean Hydra.
Capture the Ceryneian Hind.
Capture the Erymanthian Boar.
Clean the Augean stables in a single day.
Slay the Stymphalian Birds.
Capture the Cretan Bull.
Steal the Mares of Diomedes.
Obtain the girdle of Hippolyta, Queen of the Amazons.
Obtain the cattle of the monster Geryon.
Steal the apples of the Hesperides.
Capture and bring back Cerberus.

ही अग्रलेखांची मालिका श्रीश्वासमच्या पार्श्वभूमीवर चाललेली आहे. म्हणून हा प्रश्न पडला.
खर तर कशाचाही संबंध कशासी असेल हे केवळ बापूंनाच ठाऊक.
जसे अफ्रोडाईट-हर्क्युलस च्या प्रेमाला गती त्रिविक्रमाने दिली तसेच खरा हर्क्युलिस हा कोण आहे हे देखिल उलघडेल आणि मग तेव्हा सार्‍या प्रश्नांची उत्तरे सापड्तील
पुढील अग्रलेखांच्या प्रतिक्षेत……

– रेश्मा नारखेडॆ