Ziggurat had hidden places within it

#117765

shantanu natu
Participant

युद्ध म्हणजे नक्की काय , युध्दाची भिषणता काय असते हे अग्रलेख १०७४ मधुन आपल्या समोर येते.

ह्या अग्रलेखातुन समोर आलेल्या काही गोष्टी मांडाव्याशा वाटतात –

१. मौशमीवीरांनी म्हटल्याप्रमाणे, “१०७३ अग्रलेखामध्ये बापूंनी दिलेली शेवटची ओळ खुप काही सांगुन जाते – ” सम्राट झियस जराही न डगमगता अतिशय शांतपणे परंतु अतिजलद वेगाने सर्व व्यवस्था करू लागला. ” – ज्याप्रमाणे क्रॉनोस च्या गृहामध्ये लपण्यासाठी जागा होत्या त्याचप्रमाणे झियस च्या महालामध्ये तसेच डेमेटर च्या महालामध्ये अशा जागा असु शकतात.

आणखीन एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे – झियस ने बांधुन घेतलेली मंदिरे म्हणजेच – “झिगुरात” (Ziggurat) – ह्या मंदिरांच्या वर्णनात पण एक गोष्ट येते – ती म्हणजे – प्रत्येक झिगुरात मध्ये ” गुप्त गृहे ” बांधलेली होती – (अग्रलेख १०६५) – म्हणजेच ह्या “झिगुरात” मध्ये देखील लपायला जागा असणार हे नक्की.

आणि अजुन एक गोष्ट म्हणजे – हर्मीस व अपोलो ला मार्गदर्शक ठरणारे एक लहानसे यान – १०७४ मध्ये म्हटले गेले आहे कि ह्या यानातुन एक हात बाहेर येतो जो हर्मीस ला त्यावर असणार्या गरुड चिन्हामुळे भामीर किंवा थामीर चा असावा असे वाटते. –

म्हणजेच भामीर आणी थामीर हे दोघे देखील तेथे झियस ग्रुप च्या मदतीला आहेत व हे एक remote control operated यान पाठवुन हर्मीस च्या ६ जणांच्या ग्रुप ला देखील अत्यंत चतुरतेने कोणीही trace करु शकणार नाही अशा पध्दतीने कुठ्ल्याही communication शिवाय देखील वाचवत आहेत.
तसेच डेमेटर देखील वेश बदलुन त्या सेटु आणी वेटु लोकांमध्येच फ़िरते आहे.

हे वाचुन नक्किच असे वाटते, कि व्रती व सावर्णी पंथीयांनी लपण्याचे मार्ग नक्किच शोधले असावेत, मात्र ते मार्ग नक्कि काय आहेत ते मात्र येणार्या अग्रलेखांमधुनच कळेल.

२. हर्मीस स्वत: खचुन जातो मात्र नंतर तो सॉरेथस व अपोलो ला चेतवतो , कि आपल्याला ह्या ’ सर्व दुष्टांची वाट लावल्यानंतरच आपल्याला शोक करण्याचा अधिकार असेल ’,

तसेच अजुन एक उल्लेख येतो तो म्हणजे – जेव्हा थाडा च्या रुपातील डेमेटर त्यांना भेटते तेव्हा – डेमेटर च्या चेहेर्यावरील “करारी तेज” हर्मीस व त्याच्याबरोबरील ६ जणांना“पुर्ण” बळ देते झाले. – त्यामुळे आत्तापर्यंत वरकरणी शांत असलेल्या व्रती पंथीयांचा प्रतीहल्ला कशा प्रकारचा असेल ह्यबद्दल मनात प्रचंड कुतुहल आहे.

३. माता र्हिया पकडली गेल्याचा उल्लेख येतो, कदाचीत बाकी सर्वांना वाचवताना माता र्हिया पकडली गेली देखील असेल, मात्र इथे तिचे वेड लागल्याचे वर्तन – हे जेव्हा बिजोयमलाना सर्की व क्रोनोस कडुन पकडली जाते तेव्हाच्या वर्णनाशी मिळते जुळते वाटते – त्यावेळेच्या बिजोयमलाना प्रमाणेच माता र्हिया वेड लागल्याचे नाटक तर करत नसेल ना, असे वाटते. किंवा कदाचीत अजुन कुठ्ल्यातरी उद्देशाकरता माता ह्रिया ने स्वत:ला पकडुन घेतले असेल कि काय असे देखील वाटते. (उदा: बिजोयमलाना स्वत:ला पकडुन घेते व direct कद्रु ला च आंधळी करुन येते त्याप्रमाणे).

जे काही असो, आता मात्र युध्द संपुर्णपणे पेटलेले आहे, ह्या दुष्ट लोकांनी कितीही विनाश केला, तरीही व्रती पंथीय काही कमी नाहित , व्रती लोकांचे plans आणि कारवाया ह्या दुष्ट लोकांना पुरुन उरतील असे वाटते त्यातच अजुन ऍफ़्रोडाईट, हरक्युलीस, अल्केमीनी, इनाका, एरीस असे एक सो एक योध्दे आहेतच. व सर्वात महत्वाचे म्हणजे तो ’त्रिविक्रम’ तसेच मोनोडॉरेगी चे म्हणजेच “मोठ्या आईचे” पाठबळ ह्या सर्व व्रतींना आहेच.

आता पुढे काय होणार ह्याची प्रचंड उत्सुकता लागुन राहीली आहे, कधी एकदा रविवार येतो व कधी पुढचा लेख वाचतो असे झाले आहे !!!