Forums वैश्विक वास्तव (The Universal Truth) सुंदरकांड प्रवासाची… सुंदर ९ वर्षे (तुलसीपत्र मालिका) Reply To: सुंदरकांड प्रवासाची… सुंदर ९ वर्षे (तुलसीपत्र मालिका)

#1012049

Chetansinh Deore
Participant

अनिरुद्ध पौर्णिमा एएडिम परेड- 2016

हरि ॐ,

अनिरुद्ध पौर्णिमा एएडिम परेड

तो दिवस, तो क्षण जवळ आला आहे ज्याची प्रत्येक “एएडिम परेड डिमव्ही” आतुरतेने वाट पाहत असतो… तो दिवस म्हणजे — अनिरुध्द पौर्णिमा..

वर्षभर प्रत्येक डिमव्ही प्रत्येक रविवार आपल्या वैयक्तिक कामांना, आठवडय़ाच्या विश्रांतीला बाजूला सारून, आळसाला झटकून परेड प्रॅक्टिस करतो, डॅड चा सर्वात आवडता उपक्रम एएडिम – अनिरुध्दाज् अकॅडमी आॅफ डिझास्टर मॅनेजमेंट मधील “परेड” ह्या महत्त्वाच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी.

श्रीमद् पुरुषार्थ ग्रंथराज द्वितीय खंडात डॅड नी नवविधा निर्धार दिले आहेत, यांचे पालन करून “उत्तम” वानर सैनिक होण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
अगदि सोप्या भाषेत डॅड नी प्रत्येकाच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व ह्या नवविधा निर्धारा मध्ये दिले आहे.
नवविधा निर्धारांचा अभ्यास करतांना वानर सैनिक बनण्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन दुसऱ्या निर्धाराने आपल्याला मिळते.

नवविधा निर्धार – 2 :

“रामाच्या वानरसैन्यातील उत्तम सैनिक बनण्यासाठी ती शिस्त – अनुशासन ; देहाला (शरीर, प्राण, मन, व बुद्धी) यांना लावणे एवढाच माझा योगमार्ग.”

आम्हाला रामराज्य हवे आहे, त्यासाठी मी वानर सैनिक बनणे आवश्यक आहे, आणि रामाचा उत्तम वानर सैनिक बनण्यासाठी शरीर, प्राण, मन, व बुद्धीला शिस्त आवश्यक आहे,

ही शिस्त, अनुशासन सहजतेने प्रत्येकाला मिळावी यासाठी डॅड नी जी सुंदर योजना बनवली ती म्हणजे एएडिम परेड.

अनिरुध्द पौर्णिमेला डॅड… आपल्या प्रत्येक एएडिम डिमव्ही ला प्रोत्साहन देण्यासाठी, त्याचे कौतुक करण्यासाठी सेल्यूट करतात. प्रत्येक डिमव्ही साठी ही आयुष्यातील सर्वात मोठी पर्वणीच असते.
कारण मातृवात्सल्य उपनिषद मधील क्षमासुगंध प्रार्थना येथे आठवते..

“आणि हे क्षमाशील आदिमाते ,
माझी फक्त एक इच्छा पूर्ण कर ,
मला तुम्हाला माझ्यामुळे
आनंदित झालेले बघायचे आहे ”

परेड बघून डॅड च्या चेहर्‍यावरील आनंद पाहून प्रत्येक डिमव्ही कृतकृत्य होतो.

ह्या परेड मध्ये सामील होण्याची संधी डॅड नी मला दिली म्हणून मी खूप अंबज्ञ आहे..

अनिरुद्ध पौर्णिमा ते अनिरुध्द पौर्णिमा असे परेड चे कार्यकाल वर्ष असते , पुढील वर्षाला सुरूवात होत आहे, तर चला पुढच्या वर्षासाठी संकल्प करूया.. डॅड चा उत्तम वानर सैनिक बनण्याचा.. डॅड च्या चेहऱ्यावरील आनंद पुढच्या अनिरुध्द पौर्णिमेला अनुभवण्याचा.. आणि वर्षभर नियमित परेड प्रॅक्टिस करण्याचा..

हे मोठी आई, आमच्या कडून हा संकल्प पूर्ण करवून घे.

मी अंबज्ञ आहे

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ

जय जगदंब जय दुर्गे

चेतनसिंह देवरे
चेंबूर उपासना केंद्र (मुंबई)