जाणीव - भाग ७ (Consciousness - Part 7)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात जाणीव - भाग ७ (Consciousness - Part 7)’ याबाबत सांगितले. 

मी समजा तुम्हाला सांगितल एखाद्याला कोणाला ही सांगितल की बाबा तू दररोज राम, राम, राम म्हण, बरोबर. तुम्ही काय सांगाल दुसर्‍याला मी काय करतो? जपतोय किंवा त्याला दुसर नाव काय? ‘नामस्मरण’ बरोबर की नाही. काय म्हणाल तुम्ही त्याला? ‘नामस्मरण’. पण इथे आम्ही हा शब्द विसरतो. नाव उच्चारण आणि नामस्मरण ह्याच्यामध्ये फरक आहे. नामाची आठवण होते का तुम्हाला नाव घेताना. शब्द काय आहे? नामस्मरण करा मी तुम्हाला सांगतो. नाव नुसत उच्चारत रहा, ओढत रहा असं सांगत नाही आहे. नामाच स्मरण करायला पाहिजे यु मस्ट रिमेंबर, आल लक्षामध्ये.

आठवण म्हणजे काय? प्रत्येक नावामध्ये लक्ष असणं, नाही. ते आम्हाला जमु शकणार नाही आम्ही सामान्य माणस आहोत. परंतु मग काय नाव घेण्याच आठवण? की बाबा सकाळी उठल्या उठल्या मला नाव घ्यायच आहे, नाही. हे नाम कोणाच आहे? ह्याच स्मरण. नामीच स्मरण म्हणजे नामस्मरण. ते नाम उच्चारताना मला माहित असल पाहिजे की नाम कोणाच आहे? त्या भगवंताच आहे, त्या परमात्म्याच्या आईच आहे की जी अल्टिमेट सत्ता आहे. हे स्मरण अतिशय आवश्यक आहे लक्षात ठेवा. कारण स्मरण ही जाणीव आहे, उच्चारण ही जाणीव नाही आहे. तुम्ही नावाच उच्चारण करता ही जाणीव आहे का? नाही, बरोबर पटतय ना. म्हणजेच काय? बघा तुमच्या शरीरामध्ये बी कॉमप्लेक्स कमी आहे तर आयर्न घेऊन त्याची पूर्ती होईल का? बी कॉमप्लेक्सच घ्यायला पाहिजे. ज्याच्याकडे जाणीव शुद्ध करायची आहे, जाणीव प्रखर करायची आहे त्या जाणीवेवरच औषध करायला हवा.

स्मरण ही जाणीव आहे तर नामाचा नुसता उच्चार किंवा नामजप ह्यांचा सुद्धा प्रभाव आहेच पण अतिशय विक. परंतु नामाचा नुसता जप जो चालतो तो इतर गोष्टींवर काम करतो आमच्या शरीरातल्या केमिकल्सवर करतो, मनावर करतो, बुद्धीवर करतो सगळ करतो. पण जेव्हा नामस्मरण होत खरोखर आम्ही स्मरण पूर्वक नाव घेतो तेव्हा काय होत? स्मरण ही जाणीव असल्यामुळे त्याच कार्य कशावर होत? आमच्या जाणीवेवर होत आणि जाणीवेवर झाल्यामुळे काय होत? जाणीव आमची शुद्ध होते.

सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात जाणिवेबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥