जाणीव - भाग ५ (Consciousness - Part 5)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात जाणीवबाबत सांगितले.

जे असत्य मनुष्य निर्माण करतो ना, हे असत्य मनुष्याचा घात करतो. जी जाणीव त्या प्राण्यांमध्ये आहे प्राण्यांच्या रक्षणासाठी, प्राण्यांच्या विकासासाठी. तीच मनुष्याच्या विकासासाठीसुद्धा हजारो पटीने, अनंत पटीने मनुष्याकडे आहे. मनुष्य ती करप्ट करतो, भ्रष्ट करतो असत्यामुळे आणि हे असत्य जेव्हा आपल्याकडून असं वागलं जातं, बोलल जातं, वागलं जातं, तेव्हा आपण आपल्या स्वत:चाच खूप अधिकाधिक घात करीत असतो.

परमेश्वर मनुष्याला जाणवला कुठे? जेव्हा मनुष्याने आपला प्रवास करताना जीवनाचा किंवा भौतिक प्रवास करताना आजूबाजूला बघितलं, आजूबाजूला बघितल्यानंतर त्याला निसर्गामध्ये सौंदर्य दिसतं, ते सौंदर्य बघून त्याच मन खूश झालं. त्याने स्वत:साठी फळं गोळा केली, फळं त्याने कोणीतरी चोरली त्याला दु:ख झालं. जेव्हा आनंद आणि दु:ख ह्या भावनांची वेगवेगळी जाणीव त्याच्याकडे स्मृती म्हणजे मेमरी बनत गेली, तेव्हा त्या सुख-दु:खाच्या तळ्यातून, त्या निसर्गाच्या चक्रातून, की पाऊस पडण्यासाठी उन्हाळा येणं आवश्यकच आहे.

म्हणून, उन्हाळा आला नाही तर पावसाळा येतच नाही आणि पावसाळा आला नाही तर उन्हाळा करपवून टाकेल. हा सगळा ऊन-पाऊसाचा खेळ मनुष्य बघत बघत पुढे जात असताना एका क्षणाला त्याला जाणीव झाली की हे सगळ एकमेकांशी सबंधित आहेत, काय आहेत, एकमेकांशी सबंधित आहेत आणि मग त्याने त्या निसर्गाचा आणि स्वत:च्या जीवनाचा सबंध आपोआप त्याला कळायला लागला आणि तोपर्यंत मनुष्य खोटं बोलायला लागलेला नव्हता, सत्‌युग होतं.

जे आहे तसं होत होतं, त्याची फळं येऊन माकडं चोरत असतील, माकडाचा गुणधर्मच आहे काय, मिळेल ते घेऊन जायचं. अशा रितीने तो पुढे जात असताना त्याच्या जाणिवा प्रखर होत गेल्या, त्या प्रखर जाणिवेमधून त्याला ती जाणीव झाली की सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत. मी लावलेले शेत जे आहे, हे शेत जर सुरक्षित राहायचं असेल, त्या शेतामध्ये सापांचं असणं आवश्यक आहे, काय आहे? आवश्यक आहे. कारण उंदीर आणि घुशी येऊन हे सगळं अन्नधान्य, पिकं उभीच्या उभी खाऊन टाकतात. भाज्यांची मुळंसुद्धा हे उंदीर-घुशी येऊन खाऊन टाकतात आणि ह्या उंदरांना कोण खातो? साप खातो.

पण सापाचं अस्तित्व असलेलं शेतांमध्ये आवश्यक आहे, पण हा साप जर माणसाला चावला तर माणूस मरतो हेही त्याला कळत होतं. हा सगळा सृष्टीचा विविध विलास तो बघता बघता मनुष्याला जाणीव झाली की हे सगळं काही अपोआप होत नाही आहे. त्याला काय जाणीव झाली? पहिली जाणीव मनुष्याची काय आहे? हे आपोआप होत नाही आहे, हे कुठल्यातरी एका सुंदर नियमाने कंट्रोल केलं जातंयसद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात जाणिवेबाबत जे सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥