Marathi Pravachan

श्रद्धावानाच्या जीवनातील तीन महत्वाची वाक्ये (Three important sentences in Shraddhavan's life)  - Aniruddha Bapu Marathi Discourse 16 January 2014

श्रद्धावानाच्या सोबत सदैव त्याचा सदगुरु असतोच आणि तोच त्याचे जीवन घडवितो, हा विश्वास अधिकाधिक दृढ होण्यासाठी श्रध्दावानाने निरंतर तीन वाक्यांचे स्मरण करायला हवे आणि उच्चारण करायला हवे. या तीन वक्यांचे स्मरण आणि उच्चारण करताना श्रद्धावानाचा भावच महत्वाची भूमिका बजावतो. हे सदगुरु श्री अनिरुद्ध बापूंनी दिनांक 16 जानेवारी 2014 च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे सांगितले. जे आपण या व्हिडिओत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ

‘स्व’चा शोध ( Self Discovery ) - Aniruddha Bapu Marathi Discourse 30 January 2014

मानवाने स्वत:ची परीक्षा घेणे थांबवून स्वत:चा शोध ( Self Discovery ) घ्यायला हवा. स्वत:त काय चांगले आहे याचा शोध घेताना माणसाला स्वत:ची ओळख पटते. स्वत:तील उत्तम व्यक्तिमत्व शोधण्यासाठी त्या भगवंतावर विश्वास ठेवा, त्याची भक्ती करा. भगवंताच्या कृपेने मानव खर्‍या ‘स्व’चा शोध घेऊन जीवनविकास साधू शकतो, असे परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक ३० जानेवारी २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.

भीती आहे बुद्धीच्या जडत्वाचे कारण (Fear is the cause of Inertia of Intellect) - Aniruddha Bapu Marathi Discourse 15 May 2014

भीती ही माणसाच्या जीवनात बुद्धीचे जडत्व निर्माण करते आणि त्यामुळे मानव बुद्धीचा वापरच करू शकत नाही. लहानपणापासून मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या भित्यांना दडपून त्यांना भित्रे बनवू नका, त्यांना भक्तीतून निर्भय बनवा. भक्तीचा पाया असला तर त्यांचे पाऊल कधीच वाकडे पडत नाही. भगवद्‍भक्ती करून बुद्धीला जडत्व येऊ न देता मानवाने निर्भय बनले पाहिजे, असे परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक 15 मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे

बुद्धीचे जडत्व (Inertia of Intellect) - Aniruddha Bapu Marathi Discourse 15 May 2014

बुद्धीच्या जडत्वामुळे (Inertia of Intellect) मानवाचे जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य कमी होते. बुद्धीला जडत्व येऊ नये यासाठी मानवाने भगवद्‍भक्तीच्या आधारे बुद्धीवर उचित संस्कार करून स्वत:ची आव्हाने पेलण्याची शक्ती वाढवून स्वत:चा जीवनविकास करायला हवा, असे परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १५ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

अनमोल काळ व्यर्थ दवडू नये Don't waste precious time

अनमोल काळ (वेळ) व्यर्थ दवडू नये (Don’t waste precious time) – Aniruddha Bapu Marathi Discourse 15 May 2014 वेळ(time) ही मानवाला भगवंताने दिलेली अनमोल देणगी आहे. प्रत्येक माणसाला जीवनविकास साधण्यासाठी भगवंताने पुरेशा संधी दिलेल्या असतात. पण मानवाला मिळालेल्या जीवनाच्या काळाला मर्यादा आहे. म्हणूनच मानवाने काळाचा अपव्यय न करता त्याचा सदुपयोग करायला हवा कारण गेलेला काळ कधीही परत येत नाही, असे परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक 15 मे

सामूहिक बुद्धिमत्ता - भाग २ (Swarm Intelligence) -  Aniruddha Bapu Marathi Discourse 8 May 2014

मुंगीसारख्या प्राण्याच्या सामूहिक बुद्धिमत्तेबाबत(swarm intelligence) संशोधन झाले आहे आणि होत आहे व या संशोधनात थक्क करणारी माहिती मिळत आहे. सामूहिक बुद्धिमत्तेने असाध्य ते साध्य होते, हा मुद्दा मुंग्याच्या सामूहिक बुद्धिमत्तेच्या अभ्यासातून स्पष्ट होतो. मुंग्यांनी सामूहिकपणे स्वत:चाच तराफा करून अ‍ॅमेझॉन नदी शिस्तीत कशी पार केली आणि वारुळातील अवघ्या सामग्रीसह सुरक्षित स्थलान्तर कसे केले याबाबतच्या माहितीपटाबद्द्ल सांगून, जर मुंगीसारखा प्राणी हे करू शकतो तर आम्ही मानवही हे नक्कीच सहजपणे करू शकतो असे

सामूहिक बुद्धिमत्ता - भाग १ (Swarm Intelligence - part 1) - Aniruddha Bapu Marathi Discourse 8 May 2014

मुंगीसारख्या प्राण्याच्या सामूहिक बुद्धिमत्तेबाबत (swarm intelligence) संशोधन झाले आहे आणि होत आहे व या संशोधनात थक्क करणारी माहिती मिळत आहे. सामूहिक बुद्धिमत्तेने अशक्य वाटणारी कार्ये लीलया करता येतात, हा मुद्दा मुंग्याच्या सामूहिक बुद्धिमत्तेच्या अभ्यासातून स्पष्ट होतो. मुंग्यांची वसाहत, त्यामागील त्यांची कल्पकता, त्यांचे अन्न गोळा करणे, शेती आणि पशुपालन करणे याबाबतच्या संशोधनाबद्द्ल सांगून परम पुज्य सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी गुरूवार दिनांक ८ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात सामूहिक बुद्धिमत्तेबाबत सविस्तर माहिती दिली, ती

मानवी बाहुल्या (Human Dolls) - Aniruddha Bapu Marathi Discourse 1 May 2014

लहानपणापासून बालिकेला मैत्रिणींशी न खेळू देता तिचे जग फक्त बाहुलीशीच केन्द्रित करून तिला बाहुलीप्रमाणेच जगायला भाग पाडणे हे मानवतेच्या विरुद्ध आहे. त्या मुलीला एक मानव म्हणून स्वतन्त्रपणे जगू न देता, विकसित होऊ न देता तिला बाहुलीचेच जीवन जगण्यास भाग पाडणे आणि त्यासाठी तिच्या बाल्यावस्थेपासून तिच्यावर शस्त्रक्रिया करून तिला मानवी बाहुली(Human Dolls) बनवणे हे निन्दनीय कृत्य आहे. माणसाला माणूस म्हणून जगू न देणार्‍या यासारख्या अघोरी प्रथांचे कुठल्याही प्रकारे समर्थन न करता आपल्या

जडत्व (Inertia) - Aniruddha Bapu Marathi Discourse 15 May 2014

जडत्व (Inertia) – Aniruddha Bapu Marathi Discourse 15 May 2014 परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १५ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे मानवाने त्याच्या विकासाला विरोध करणार्‍या जडत्वापासून दूर रहायला हवे आणि काळाचा अपव्यय न करता भगवद्भक्तीच्या आधारे ध्येय गाठायला हवे, असे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

अ‍ॅरिझोनामध्ये बायबलवर बंदी (Arizona Bans Bible Study) - Aniruddha Bapu Marathi Discourse 8 May 2014

Arizona Bans Bible – अ‍ॅरिझोना प्रान्तात बफोमेटचे म्हणजे महिषासुराचे साधनास्थळ बांधले जात आहे म्हणजेच सैतानाचे साधनास्थळ बांधले जात आहे. हे दुष्कर्म करणारे परमेश्वराच्या, परमेश्वरी मूल्यांच्या विरुद्ध आहेत आणि त्यांनी सैतानाचे साधनास्थळ बांधण्याच्या या अपवित्र कामाची सुरुवात पवित्र ग्रन्थ बायबलवर बंदी घालून केली आहे. पवित्र परमेश्वरी ग्रन्थाला विरोध करणार्‍या अशा प्रकारच्या सैतानी बुद्धिभेद्यांपासून श्रद्धावानांनी सावध रहावे, असे परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक ८ मे २०१४ रोजी च्या मराठी