Marathi Pravachan

Aniruddha Bapu, Focus, God, Problems, Focus On God, Not On Problems

भगवंताचे ध्यान करा, अडचणींचे करू नका (Focus On God And Not On Problems) माणूस त्याच्या स्वत:च्या अडचणींना, शत्रुंना स्वत:च बळ देत असतो. अडचणी आणि शत्रु यांचा सतत विचार करत राहण्याने माणसाच्या अन्त:करणाचा अधिकाधिक भाग या गोष्टी व्यापत राहतात आणि त्यातून या गोष्टी त्या मानवाच्या जीवनात अधिकाधिक ताकदवान होतात. माणसाने अशा गोष्टींचा विचार करत राहण्यापेक्षा भगवंताची विश्वासाने भक्ती करणे आवश्यक आहे, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या 20 नोव्हेंबर 2014 रोजीच्या

Aniruddha Bapu , Ambadnya, Bestest Prayer, Prayer, अंबज्ञ

अंबज्ञ म्हणणे ही सर्वोत्तम प्रार्थना आहे (Saying Ambadnya Is The Bestest Prayer) इतरांशी वागताना माणसाची वृत्ती ‘कामापुरता मामा’ अशी असते. माणसाच्या वाईट प्रसंगी ज्याने त्याला मदत केलेली असते त्याच्या उपकारांचे ओझे वाटत असते. ‘अंबज्ञ’ म्हणण्याने माणसासाठी हे ओझे न उरता त्या मदतीची स्मृती राहते. अंबज्ञ म्हणणे ही प्रार्थना कशी बनते याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥

Aniruddha Bapu

सावधपणे निवड करा. (Choose Wisely) किती जणांनी स्वत:चे हस्ताक्षर सुधारण्याचा प्रयास केला आहे? ज्या गोष्टीमुळे आमचे अडत नाही त्या गोष्टीत सुधारणा करण्याचा माणूस विचार करत नाही. आवडीचे आणि हिताचे यांतील फरक ओळखा व सावधपणे निवड करा याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

Aniruddha Bapu

स्वत:च्या खांद्यावर स्वत:चेच डोके असू द्या (Think On Your Own) उचित माहिती अवश्य गोळा करावी, पण निर्णय मात्र स्वत:च्या बुद्धीचाच वापर करून घ्यावा. सद्गुरुतत्त्वाला शरण जाऊन मानवाने स्वत:चे हित साधायला हवे. खोटा अहं उत्पन्न न होण्यासाठी आणि जीवनविकास साधण्यासाठी स्वत:च्या खांद्यावर स्वत:चेच डोके असू द्या म्हणजेच विचारपूर्वक प्रत्येक पाऊल टाका, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥

जसे कर्म तसे फल  (You Reap What You Sow) - Aniruddha Bapu Marathi Discourse 16 Oct 2014

जसे कर्म तसे फल (You Reap What You Sow) प्रत्येकाने स्वत:च्या हिताचा विचार स्वत: करायला हवा. प्रत्यक्षपणे मी माझे हित काय करू शकतो याचा विचार करावा. लोकांनी जसे माझ्याशी वागावे असे मला वाटते तसे मला लोकांशी वागले पाहिजे. जसे कर्म तसे फल, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

मनुष्याची कृती ही त्या कृतीच्या परिणामांवर अवलंबून असते ( Action taken by man varies according to its outcomes )  - Aniruddha Bapu Marathi Discourse 16 Oct 2014

मनुष्याची कृती ही त्या कृतीच्या परिणामांवर अवलंबून असते ( Action taken by man varies according to its outcomes ) मनुष्याची कोणतीही कृती ही त्याला त्याचे ताबडतोब आणि भविष्य काळात जाणवणारे परिणाम यावर अवलंबून असते. हाच नियम तो भगवंताबाबतीतही लावतो याबद्दल परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

तुमच्या रांगेत तुम्ही एकटेच आहात ( You Are Alone In Your Queue )  - Aniruddha Bapu Marathi Discourse 25 Sep 2014

तुमच्या रांगेत तुम्ही एकटेच आहात (You Are Alone In Your Queue ) सद्‍गुरुतत्त्वाकडे प्रत्येकाची रांग वेगळी असते, कुणीही कुणाच्या रांगेत घुसू शकत नाही. सद्‍गुरुतत्त्वाने तुम्हाला दिलेले कुणीही चोरू शकत नाही. म्हणूनच श्रद्धावानाने तुलना करू नये, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

स्वत:च्या दुर्बलतेचा पुन्हा पुन्हा विचार करू नका ( Don't Think Again And Again About Your Weakness )  - Aniruddha Bapu Marathi Discourse 25 Sep 2014

स्वत:च्या दुर्बलतेचा पुन्हा पुन्हा विचार करू नका (Don’t Think Again And Again About Your Weakness ) स्वत:च्या अडचणींचा, स्वत:मधील कमतरतांचा वारंवार विचार करू नका. जीवनात त्या आदिमाता चण्डिकेवर आणि चण्डिकापुत्रावर विश्वास राखा. ते माझ्यातील सर्व प्रकारच्या दुर्बलतेचा नाश करणारच आहेत, हा विश्वास राखा. स्वत:बद्दल नकारात्मक विचार करून माणूस स्वत:च स्वत:चे नुकसान करतो, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा (Step Out Of Comfort Zone) - Aniruddha Bapu Marathi Discourse 25 Sep 2014

कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा (Step Out Of Comfort Zone) जी गोष्ट माणसाला सहजतेकडून असहजतेकडे, सुखद सहजतेकडून असहजतेकडे घेऊन जाते, ती गोष्ट भय उत्पन्न करते. माणसाला जर या भयाचा नाश करायचा असेल, तर त्याला आराम-स्थिती सोडून पुरुषार्थ करावा लागतो. आराम-स्थितीच्या क्षेत्राबाहेर म्हणजेच कम्फर्ट झोनबाहेर पडून पुरुषार्थ करण्याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥

विचार करताना सावध रहा  (Be Cautious While Thinking)  - Aniruddha Bapu Marathi Discourse 25 Sep 2014

विचार करताना सावध रहा (Be Cautious While Thinking) तुलनेतून भय उत्पन्न होते आणि तुलना ही चुकीच्या पद्धतीने केल्या गेलेल्या विचारांमधून उत्पन्न होते. म्हणूनच विचार करताना विवेकाची, मर्यादेची आवश्यकता असते. चुकीचे विचार मानवाच्या अन्तर्बाह्य परिस्थितीत चुकीचे बदल घडवतात. विचार करताना बाळगण्याचा सावधपणा याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥