Marathi

सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या निवासस्थानी चालू असलेला दत्तयाग - २०१८

सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या निवासस्थानी वर्षातून २ वेळा त्रिदिवसीय दत्तयाग केला जातो. या वर्षी या यागाची सुरूवात काल दिनांक १६ जुलै २०१८ रोजी झाली असून बुधवार दि. १८ जुलै रोजी संपन्न होणार आहे.  आपण पु्ढील व्हिडिओत पाहू शकता. पहिला दिवस   दुसरा दिवस   तिसरा दिवस  ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

गुरुक्षेत्रम मध्ये आपल्या लाडक्या 'डॅड' चे दर्शन

  आज गुरुवारी दर्शनाच्या ओढीने श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ येथे आलेल्या श्रध्दावानांना बापूंनी अवचितपणे येऊन आनंदाचा धक्का दिला. बर्‍याच दिवसांनी बापूंना गुरुक्षेत्रम्‌मध्ये पाहून एकच जल्लोष झाला.    जोरदार पावसामुळे दर गुरुवारी होणारी उपासना रद्द करण्यात आली असल्याने आज आपल्या लाडक्या डॅडचे दर्शन आपल्याला मिळणार नाही, असा विचार बाहेरगावाहून आलेल्या श्रध्दावानांच्या मनात आला असावा, आणि या मनकवड्या बापूंनी त्यांची ही इच्छा पूर्ण केली आणि अचानक समोर आलेल्या बापूंना बघून आनंदाचे जणू उधाण आले.

Aniruddha-Bapu-Aniruddha-Chalisa-pathan

हरि ॐ, मुंबई व परिसरात येत्या तीन चार दिवसांत हवामानखात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशार्‍यानुसार, श्रद्धावानांची गैरसोय होवू नये म्हणून शनिवार, दि. ०९ जून २०१८ रोजी श्रीहरिगुरुग्राम येथे श्रीअनिरुद्ध चलिसा पठणाचा पूर्वनियोजित कार्यक्रम होणार नाही, ह्याची सर्व श्रद्धावानांनी नोंद घ्यावी. ह्या कार्यक्रमाची नवीन तारीख जशी ठरेल, तशी त्याबद्दलची सूचना श्रद्धावानांना कळविण्यात येईल. हरि ॐ, मुंबई एवं परिसर में अगले तीन चार दिनों में अतिवृष्टि संबंधित मौसम विज्ञान विभाग की चेतावनी के अनुसार,

Thursday-Upasana-Shree-Harigurugram

हरि ॐ, मुंबई व परिसरात होणार्‍या वृष्टीमुळे, तसेच हवामानखात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशार्‍यानुसार, श्रद्धावानांची गैरसोय होवू नये म्हणून आज गुरुवार, दि. ०७ जून २०१८ रोजी श्रीहरिगुरुग्राम येथे गुरुवारची उपासना, पितृवचन, सत्संग, दर्शन, इत्यादि कुठलाच कार्यक्रम होणार नाही, ह्याची सर्व श्रद्धावानांनी नोंद घ्यावी. हरि ॐ, मुंबई एवं परिसर में हो रही बरसात के कारण, एवं  अतिवृष्टि संबंधित मौसम विज्ञान विभाग की चेतावनी के अनुसार, श्रद्धावानोंको असुविधा न हो इस कारण वश से आज गुरुवार, दि. ०७ जून २०१८ को श्रीहरिगुरुग्राम में उपासना, पितृवचन, सत्संग, दर्शन, आदि

Aniruddha Gurukshetram

हरि ॐ, मागील आठवड्यात ठरल्याप्रमाणे, रविवार, दि. २० मे २०१८ ते रविवार दि. २७ मे २०१८ ह्या कालावधीत, काही महत्त्वाच्या मेन्टेनन्सच्या कामानिमित्ताने श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ श्रद्धावानांकरिता बंद ठेवण्यात आल्याचा निर्णय सर्व श्रद्धावानांना कळविण्यात आला होता. मात्र ठरलेले मेन्टेनन्सचे काम अपेक्षित वेळेच्या आधीच पूर्ण झाल्यामुळे, श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ उद्या, म्हणजे मंगळवार, दि. २२ मे २०१८ पासून सर्व श्रद्धावानांसाठी दर्शनास खुले राहील. दि. २२ मे २०१८ पासून श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथील जलाभिषेक, पंचोपचार पूजन, श्रीरुद्र सेवा, श्रीदत्तकैवल्य याग सेवा, श्रीरामरसायन पठण, इ. सर्व विधी व

you-make-impossible-possible

हरि ॐ, दैनिक ‘प्रत्यक्ष’चे कार्यकारी संपादक डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी विश्रांतीसाठी सुट्टीवर असल्यामुळे, त्यांचे ‘तुलसीपत्र’ मालिकेतील अग्रलेख गुरुवार दि. २४ मे २०१८ ते रविवार दि. ३ जून २०१८ ह्या कालावधीत प्रकाशित होणार नाहीत. त्याऐवजी ह्या कालावधीमध्ये ‘वैभवलक्ष्मीचे व्रत – भाग १ ते ५’ हे डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी लिखित अग्रलेख पुनर्मुद्रित करण्यात येतील. हरि ॐ, दैनिक ‘प्रत्यक्ष’ के कार्यकारी संपादक डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी विश्राम के लिए छुट्टी पर होने

भगवान त्रिविक्रम गजराबाबत सूचना

हरि ॐ, मागच्या गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे सूचना केल्याप्रमाणे, परमपूज्य सुचितदादांनी भगवान त्रिविक्रमाचा एक अत्यंत सुंदर जप सर्व श्रद्धावानांना भेट म्हणून दिलेला आहे. आजच्या गुरुवारी, म्हणजे दि. १७ मे २०१८ रोजी श्रीहरिगुरुग्राम येथे नेहमीच्या उपासनेनंतर हा जप गजर स्वरूपात सर्व श्रद्धावानांसमोर सादर केला जाईल. मात्र कोणालाही हा गजर रेकॉर्ड करण्याची परवानगी नाही; रेकॉर्डिंगमुळे इतर श्रद्धावानांना गजराचा आनंद घेता येत नाही. हरि ॐ, पिछले गुरुवार को श्रीहरिगुरुग्राम में की गई सूचना के

Suchit dada

हरि ॐ, आपल्या सर्वांच्या लाडक्या परमपूज्य सुचितदादांनी भगवान त्रिविक्रमाचा अत्यंत सुंदर जप सर्व श्रद्धावानांनाच भेट म्हणून दिलेला आहे. हा जप, गजर म्हणून पुढील गुरुवारी श्रीहरिगुरूग्राममध्ये सर्वांच्या समोर सादर केला जाईल. नाथसंविध्‌, अंबज्ञ हरि ॐ, हम सबके प्यारे परमपूज्य सुचितदादा ने भगवान त्रिविक्रम का बहुत ही सुन्दर जप सभी श्रद्धावानों को उपहार के रूप में दिया है। इस जप को गजर के रूप में अगले गुरूवार को श्रीहरिगुरूग्राम में सब के

The Third World War – ’तिसरे महायुध्द’

मार्च २००६ साली बापूंनी (डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी) लिहिलेल्या ’ तिसरे महायुध्द ’ ह्या पुस्तकाप्रमाणे गेल्या ३-४ वर्षापासून जागतिक पटलावरती कमालीच्या घडामोडी घडताना आपण बघत आहोत. आधी दिवसागणिक बदलणारी परिस्थिती आता तासागणिक बदलू लागली आहे. आता २०१८ मध्ये जगातील अनेक भागांमध्ये सुरू असणारे तंटे दैनंदिन संघर्षाचे रूप घेत आहेत आणि हेच वास्तव आहे. भयानक मानवी क्रौर्याचे पाशवी व निर्दयी तांडव जवळपास ६० राष्ट्रांमध्ये सुरू आहे व तिसर्‍या महायुद्धाचा भडका कुठल्याही

Aniruddha Bapu Sadguru-Paduka

हरि ॐ, वैशाख पौर्णिमा (दिनांक ३०-एप्रिल-२०१८) रोजी सद्‌गुरू पादुकांचे वितरण श्रीगुरूक्षेत्रम्‌, खार (पश्‍चिम) येथून सकाळी १०:०० ते रात्रौ ८:०० या वेळेत करण्यात येईल. श्रद्धावानांनी येताना पादुका बुकींग केल्याची पावती बरोबर घेऊन यावी. ज्या श्रद्धावानांनी पादुकांची आगाऊ नोंदणी केली आहे फक्त त्यांच्यासाठीच ही सोय करण्यात आली आहे. जे श्रद्धावान काही करणामुळे पादुका बुक करु शकले नसतील त्यांच्यासाठी ही काही मोजके सेट उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या श्रद्धावानांना काही करणास्तव

Charakha Shibir

हरि ॐ, ३ ऑक्टोबर २००२ रोजी सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी १३ कलमी कार्यक्रमात चरखा योजना मांडली. ही योजना मांडतेवेळी कष्टकरी समाजाला वस्त्र पुरवणे हा बापूंचा एक प्रमुख उद्देश होता. आजही गावांमधीलच नव्हे, तर लहान शहरातील अनेक कष्टकरी कुटुंबांमध्ये दारिद्र्यामुळे आपले शरीर झाकण्याएवढेही वस्त्र नसते. त्यामुळे त्या कुटुंबातील मुले शाळेत जात नाहीत व शिक्षणापासुन वंचित रहातात. या निरक्षरतेमुळे गरिबी वाढत जाते. बापूंच्या संकल्पनेतून निघालेली चरखा योजना’ गरिबी आणि निरक्षरतेचे चक्र तोडण्यासाठी उपयुक्त ठरते.

स्वयंभगवान त्रिविक्रम

आज गुरुवार दि. २६-०४-२०१८ रोजी प्रकाशित झालेल्या ‘दैनिक प्रत्यक्ष’मधील ‘तुलसीपत्र-१४८६’ ह्या अग्रलेखामध्ये, ‘स्वयंभगवान त्रिविक्रम’ प्रथमच प्रकट झाल्याचे वर्णन केले गेले आहे, तेच हे ‘महासाकेत’ ह्या सर्वोच्च स्थानावर स्थित ‘स्वयंभगवान त्रिविक्रमा’चे स्वरूप. आज गुरुवार दि. २६-०४-२०१८ को ‘दैनिक प्रत्यक्ष’ में प्रकाशित हुए ‘तुलसीपत्र-१४८६’ इस अग्रलेख में, ‘स्वयंभगवान त्रिविक्रम’ के पहली ही बार प्रकट होने का वर्णन किया गया है। यही वह ‘महासाकेत’ इस सर्वोच्च स्थान पर स्थित ‘स्वयंभगवान त्रिविक्रम’ का स्वरूप।

tww

Hari Om, The past 3-4 years have seen conflicts developing worldwide and worsening by the day, rather by the hour. Nations across the globe have more or less been polarized and now in the year 2018, ongoing conflict has come to be an everyday affair in several parts of the world and that indeed is the reality. Horrific human brutality stomps wild and defiant on the lands of Syria, Libya,

tww

हरि ॐ, दिनांक ६ मार्च २०१८ पासून दैनिक प्रत्यक्षमध्ये तिसर्‍या महायुद्धाशी निगडीत विशेष बातम्या देण्यात येत आहेत. या बातम्यांची हेडलाईन किंवा पूर्ण बातमी अनेक वाचक उत्साहाच्या भरात व्हॉट्‍सऍप किंवा तत्सम सोशल मिडियावर शेअर करीत आहेत. ही चूकीची गोष्ट आहे. पूर्ण बातमी किंवा हेडलाईन शेअर करण्याऐवजी वाचक प्रत्यक्षमध्ये आलेल्या बातम्यांवर त्यांच्या प्रतिक्रिया, मत सोशल मिडीयाद्वारे देऊ शकतात. तरी सर्व वाचकांनी कृपया याची नोंद घ्यावी. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥