Home » Marathi

Marathi

कोल्हापूर मेडिकल अँड रिहॅबिलिटेशन कँप २०१७ची तयारी

गेली १३ वर्षे सातत्याने आयोजित केला जात असलेल्या कोल्हापूर मेडिकल अँड रिहॅबिलिटेशन कँपच्या २०१७ च्या सत्राला सुरुवात होत आहे. तब्बल १० एकरची व्याप्ती असणाऱ्या ह्या कँपकरिता मनुष्य़बळही तेवढ्याच मोठ्या संख्येने लागणार. ह्या भक्तिमय निष्काम सेवेकरिता ठिकठिकाणाहून यंदा सेवेकरिता संधी मिळालेले कार्यकर्ते शिबिरासाठी निघाले. मुंबईहून २२ बसेस, तसेच इतर कार्समधून मिळून ७४८ कार्यकर्ते, पुण्याहून ३ बसेसमधून ११३ कार्यकर्ते, तर रायगडमधून १ बसमधून २५ कार्यकर्ते शिबिराकरिता रवाना झाले. ह्या कोल्हापूर मेडिकल अँड रिहॅबिलिटेशन कँपचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे नंदाईंची व सुचितदादांची उपस्थिती. कँपच्या अचूक नियोजनाचा जणू कणाच असलेले हे दोघे म्हणजे कार्यकर्त्यांच्या उत्साहाचे उगमस्थान. आताही कँपकरिता येणाऱ्या सर्च कार्यकर्त्यांच्या आधी पोहोचून कँपशी ... Read More »

Organic Farming and Bio-gas Project by AIGV at Govidyapitham – Part 4

Biogas

गोविद्यापीठम्‌मधील ह्या दुधी भोपळ्यांचा आकार बघता, सेंद्रीय शेतीच्या आधारे काय साध्य होऊ शकते ह्याचा प्रत्यय येतो. ________________________________________________________________________________________________________ परसबाग हे मॉडेल तर शेतकरी त्याच्या अंगणातही करू शकतो, पण मुंबईसारख्या शहरात एका छोटयाश्या जागेत आपण शहरवासी सुद्धा हे मॉडेल उभारू शकतो इतके ते सोपे आहे. ________________________________________________________________________________________________________ गाईंच्या शेणापासून बायो गॅसचा यशस्वी प्रकल्पही गोविद्यापीठम्‌ येथे राबविला जात असून, ह्या बायो गॅसद्वारे संपूर्ण गोविद्यापीठम्‌मध्ये विद्युत पुरवठा करण्याची तरतूदही केली जाऊ शकते. ________________________________________________________________________________________________________ गाईंच्या शेणापासून बायो गॅसचा यशस्वी प्रकल्पही गोविद्यापीठम्‌ येथे राबविला जात असून, ह्या बायो गॅसद्वारे संपूर्ण गोविद्यापीठम्‌मध्ये विद्युत पुरवठा करण्याची तरतूदही केली जाऊ शकते.     Read More »

Livestock Farming by AIGV at Govidyapitham – Part 3

AIGV

गाय ही “कामधेनू” का आहे हे गायीच्या अनेक उपयोगांमधून लक्षात येते. गोमूत्र, गायीचे शेण, गूळ आणि इतर काही गोष्टी एकत्र करून “जीवामृत” हे अनोखे द्रव्य तयार केले जाते जे खरंच जमिनीकरता संजीवनी आहे. ________________________________________________________________________________________________________   A2 प्रकारचे अत्यंत पौष्टिक आणि उपयुक्त दूध देणाऱ्या गीर जातीच्या गाईंचे गोविद्यापीठम्‌ येथे संगोपन केले जाते. ________________________________________________________________________________________________________  कुक्कुटपालनाचा उपक्रम तर त्यांच्या खाद्यावर अक्षरशः नगण्य खर्च करीत राबविण्याची किमया AIGVने केली आहे. ________________________________________________________________________________________________________ ससेपालन, बटेरपालन सारख्या जोडधंद्याचे प्रशिक्षणही AIGV कोर्स मार्फत दिले जाते. ________________________________________________________________________________________________________ शेळीपालन ह्या किफायतशीर जोडधंद्याचे अत्यंत उपयुक्त शिक्षण AIGV तर्फे दिले जाते.   Read More »

AIGV – Azolla Cultivation and Animal Husbandry at Govidyapitham Part -2

AIGV

“अजोला” (Azolla Cultivation) सारख्या अनोख्या आणि अत्यंत कमी खर्चात होणाऱ्या प्रकल्पामधून, आवश्यक आणि पौष्टिक चारा अगदी नगण्य खर्चात कश्या प्रकारे तयार करावा ह्याचे प्रशिक्षण यशस्वी प्रयोगांसहित दिले जाते. ________________________________________________________________________________________________________  “अजोला” (Azolla Cultivation) सारख्या अनोख्या आणि अत्यंत कमी खर्चात होणाऱ्या प्रकल्पामधून, आवश्यक आणि पौष्टिक चारा अगदी नगण्य खर्चात कश्या प्रकारे तयार करावा ह्याचे प्रशिक्षण यशस्वी प्रयोगांसहित दिले जाते.   ________________________________________________________________________________________________________ काहीही खर्च न करता एन-पी-के (N-P-K) पुरविणारे उपयुक्त खत कसे बनवावे, ह्याचे प्रशिक्षण देणे हा AIGV कोर्सचा एक महत्त्वाचा भाग आहे. ________________________________________________________________________________________________________ २०११ मध्ये आणलेलं हे रेडकू अगदी मरणासन्न असताना, त्यावेळी बापूंनी फक्त त्याला बघून सांगितलेल्या उपायांनी ते रेडकू आज कसे ... Read More »

AIGV’s Work in Govidyapitham Part -1

बापूंच्या संकल्पनेतून साकार झालेले गोविद्यापीठम्‌ व त्याच गोविद्यापीठम्‌ मध्ये चालणारे AIGVचे अफाट कार्य आज समस्त शेतकर्‍यांसाठी तसेच इतर श्रद्धावानांसाठीही प्रेरणादायी व कौतुकास्पद ठरत आहे. ____________________________________________________________________________________________________ वर्षानुवर्षे रासायनिक खतांचा मारा करून सोन्यासारख्या जमिनीची खर्‍या अर्थाने माती झालेली असताना, येत्या काळात सेंद्रिय शेतीच शेतकऱ्याला वरदान ठरणार आहे हे निर्विवाद सत्य आहे. ____________________________________________________________________________________________________ हायड्रोपोनिक्स तंत्रातून १ कि. मक्याच्या बियांपासून 8 ते 9 कि. चारा अवघ्या सात दिवसांत तयार करता येतो आणि तयार केलेला चारा हा गुरांना अत्यंत आवश्यक खुराक पुरवतो. ____________________________________________________________________________________________________ हायड्रोपोनिक्स ह्या प्रगत तंत्राचा वापर करण्यासाठी इतरत्र लाखो रूपयांचे सेटअप लावले जात असताना, आपण गोविद्यापीठम्‌मध्ये काही हजारांमध्ये तेच तंत्रज्ञान यशस्वीपणे राबविले आहे. ... Read More »

दिवाळी किल्ला

बापूंच्या घरी हॅपी होमच्या गच्चीवर स्वप्नीलसिंहनी मुलांनाबरोबर घेऊन केलेला किल्ला. Read More »

अन्तरीचे धन्वन्तरि – डॉ. योगीन्द्र जोशी आणि डॉ. विशाखा जोशी

bapu

आयुर्वेदाच्या मुख्य संहितांपैकी एक असणार्‍या चरकसंहितेत आयुर्वेदाचे सर्वप्रथम विशेषण येते – ‘अनंतपार’! ‘अनंतपार’ या शब्दाचे वेगवेगळे भावार्थ जाणता येऊ शकतात. पण अनंतपार या शब्दाचा सरलार्थ आहे- ‘ज्याला अंत आणि पार नाही असा.’ जर चरकाचार्यांसारखा थोर ऋषि आयुर्वेदाला ‘अनंतपार’ असे म्हणतो, तर कुणी सामान्य मानव ‘मला आयुर्वेदाचे पूर्ण ज्ञान झाले’ असे कसे बरे म्हणू शकेल? खरोखरच आयुर्वेद अनंतपारच आहे आणि डॉ. श्री. अनिरुद्ध धैर्यधर जोशी यांनी अर्थात् सद्गुरु श्री अनिरुद्धांनी म्हणजेच बापुंनी आम्हाला याची जाणीव करून दिली. माणसाला वाटते की त्याच्या विषयाचे म्हणजे त्याने ज्या विषयात अनेक वर्षे अभ्यास, संशोधन वगैरे केले आहे, त्या विषयाचे अगाध ज्ञान त्याला झाले आहे. पण ... Read More »

सुंदरकांड पठण उत्सव – १७ मे ते २१ मे २०१६

संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजी विरचित ‘श्रीरामचरितमानस’ हा ग्रंथ सर्व भारतभर श्रद्धावानजगतात अत्यंत जिव्हाळ्याचा आहे आणि त्यातील ‘सुंदरकांड’ ह्या भागाला श्रद्धावानांच्या जीवनात आगळंवेगळं स्थान आहे. सद्गुरु बापूंसाठीही ‘सुंदरकांड’ ही अतिशय प्रिय गोष्ट आहे. सीतामाईच्या शोधाकरिता हनुमंताबरोबर निघालेल्या वानरांचा समूह समुद्रकाठी पोहोचतो इथपासून सुंदरकांडाची सुरुवात होते. त्यानंतर हनुमंत समुद्रावरून उड्डाण करून लंकेत प्रवेश करून सीतेचा शोध घेतो?व लंका जाळून पुन्हा श्रीरामांच्या चरणांशी येऊन त्यांना वृत्तांत निवेदन करतो. मग बिभीषणही श्रीरामांकडे येतो व श्रीराम वानरसैनिकांसह सेतू बांधण्यास सुरुवात करतात. असा हा घटनाक्रम सुंदरकांडात वर्णिला आहे. ‘सुंदरकांड’ हे आमचं जीवन सर्वाथाने सुंदर करणारं आहे, असं सद्गुरु श्रीअनिरुद्धबापू वारंवार सांगतात. सुंदरकांडावर आधारित ‘तुलसीपत्र’ ही अग्रलेखमाला दै. प्रत्यक्षमध्ये ... Read More »

आमचे ‘मोठे डॉक्टर’ – रामचंद्र खांबे

 “रामचंद्रा!, बाबांची तब्येत सुधारण्यापलिकडील आहे. उपचारांना प्रतिसाद मिळत नाही. तेव्हा, आता त्यांना के.ई.एम् रुग्णालयात दाखल करा. मी तशी तेथील डॉक्टरांना चिठ्ठी देत आहे. विलंब न लावता, त्यांना के.ई.एम्. मध्ये दाखल करावे”. वडीलांच्या जीवनाची अखेर होती. आम्ही सर्व चिंताग्रस्त, तरी देखील वास्तवाची जाणीव करून देताना ‘डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी’, म्हणजेच, आमच्या परिवाराच्या मोठ्या डॉक्टरांनी आपले ‘मत’ तितक्याच गांभीर्याने आम्हापुढे स्पष्ट केले. आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून, मला व माझ्या पत्नीला, आतील रुममध्ये नेऊन त्यांनी गांभिर्याचे भान बाळगून तेवढ्याच दिलासापुर्वक भाषेत सांगितलं की, ‘रामचंद्रा! मला पूर्ण कल्पना आहे की, तू एखाद्या खाजगी नर्सिंग होममध्ये त्यांना पुढील उपचाराकरिता दाखल करू शकतोस, परंतु सद्यस्थिती ... Read More »

श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ मध्ये श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र पाठ

श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ मध्ये श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र पाठ

गुरुवार, दि. ०४ फेब्रुवारी २०१६ ते शनिवार, दि. ०६ फेब्रुवारी २०१६ ह्या दरम्यान श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ मध्ये श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र पाठ संपन्न झाला. ह्या उत्सवामध्ये २३ पुरोहितांच्या उपस्थितीत श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र पाठ होत असताना, पूजन स्थळी शाळीग्रामावर अनुक्रमे पहिल्या दिवशी ऊसाच्या रसाने, दुसर्‍या दिवशी मधाने व तिसर्‍या दिवशी नारळ पाण्याने अखंड अभिषेक करण्यात आला. त्याचप्रमाणे ह्या प्रत्येक दिवसाच्या पाठाची सांगताना होताना, शेवटच्या आवर्तनाच्या वेळेस, पहिल्या दिवशी तुळशीपत्राने, दुसर्‍या दिवशी गुलाब पुष्पांनी व तिसर्‍या दिवशी कमळ व चाफ्याच्या फुलांनी शाळीग्रामावर अर्चन करण्यात आले. पूजा मांडणीमध्ये सजावटीचा भाग म्हणून श्रीव्यंकटेशाचा मुखवटा सुंदररित्या सजविण्यात आला होता. तसेच विविध रंगी फुलांच्या माळांनी केलेली प्रासादिक सजावट पूजा मांडणीची ... Read More »

सप्तचक्र उपासना – अधिक सुलभतेने कशी करावी?

गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०१५ रोजी परमपूज्य सद्‌गुरु बापूंनी “श्रीशब्दध्यानयोग” ही, श्रद्धावानांचा अभ्युदय (सर्वांगीण विकास) घडवून आणणारी सप्तचक्रांची उपासना श्रीहरिगुरुग्राम येथे सुरु केली. त्यानंतर संस्थेतर्फे ह्या उपासनेची माहिती देणारी पुस्तिकाही श्रद्धावानांकरिता उपलब्ध करण्यात आली. पुस्तिकेत दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धावान पुस्तिकेतील चक्रांच्या प्रतिमेकडे पाहता पाहता त्या संबंधित चक्राचा गायत्री मंत्र आणि स्वस्तिवाक्य म्हणत घरी उपासना करू शकतात. गुरुवार, दि. २१ जानेवारी २०१६ रोजी आपल्या पितृवचनामध्ये सद्‌गुरु बापूंनी अकारण कारुण्याची पुन्हा एकदा प्रचिती देत, श्रद्धावानांकरिता ही उपासना अधिक सुलभ केली. श्रीहरिगुरुग्राम येथे ही उपासना करतेवेळी तसेच घरीसुद्धा सप्तचक्रांच्या प्रतिमांकडे पाहत उपासना करत असताना, त्या त्या चक्राचा फक्त बीजमंत्र ॐ सहित उच्चारल्यासही ते फलदायी ... Read More »

विलक्षण रसायन – प्रदिप वर्मा

  लोकप्रभा साप्ताहिकाचे माजी संपादक, संस्कृती संवर्धन अभियानातर्फे निघणार्‍या महितीपटांचे निर्माते आणि सखोल सामाजिक दृष्टी असलेले, पत्रकारितेच्या सामाजिक बांधिलकीवर विश्‍वास ठेवणारे वर्माजी पत्रकारितेमुळेच बापूंच्या संपर्कात आले आणि…   तीस-पस्तीस वर्षे पत्रकारिता करीत असताना, अनेक ठिकाणी वावरण्याची संधी मिळाली. सामाजिक, अध्यात्मिक चळवळी जवळून पाहता आल्या. ह्या सगळ्या चळवळींच्या पार्श्‍वभूमीवर जेव्हा बापू नामक व्यक्तीला भेटायची संधी मिळाली, तो म्हणजे किस्सा विलक्षणच आहे. एक दिवशी ऑफिसमध्ये सगळेजण उशीरा आले. प्रत्येकाला विचारलं तर सायनमध्ये ट्रॅफिक जॅम झालं होतं, त्यामुळे उशीर झाल्याचं सांगत होता. हे कशामुळे, ते जाणून  घेण्यासाठी मी चौकशी केली. तेव्हा कळलं हरि ॐ नावाचा संप्रदाय आहे, त्याचा कार्यक्रम होता. त्याला अलोट गर्दी झाली ... Read More »

श्री दुर्गा भगवती आराधना (श्रीयंत्र महाभिषेक पूजन)

श्री दुर्गा भगवती आराधना

काल मंगळवार, दिनांक २२ डिसेंबर २०१५ रोजी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मध्ये “श्री दुर्गा भगवती आराधना (श्रीयंत्र महाभिषेक पूजन)” हा सोहळा अत्यंत मंगलमय व भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पूर्ण वेदोक्त पद्धतीने व नंदाईंच्या उपस्थितीत होणार्‍या ह्या पूजन व अभिषेक सोहळ्याची सुरुवात सकाळी ९.०० वाजता शांतीपाठाने झाली.  ह्या सोहळ्याचे प्रमुख वैशिषट्य होते ते पूजनस्थळी विराजमान झालेले, एरव्ही परमपूज्य बापूंच्या निवासस्थानी देवघरामध्ये असलेले व विशेष पद्धतीने घडवून घेतलेले पंचधातूचे त्रिमितीय श्रीयंत्र. सकाळी ११.०० ते दुपारी १.०० तसेच दुपारी २.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत, बापूंनी वारंवार ज्याचे महत्त्व विषद केलेले आहे अशा परमपवित्र श्रीसूक्ताची १६०० आवर्तनं होताना, त्रिमितीय श्रीयंत्रावर सुगंधित जलाने अखंड अभिषेक करण्यात आला. ह्या ... Read More »

बापूंचं संगीत – डॉ. हेमंत टोणगावकर व विनय बलसे

बापूंना संगीत अतिशय आवडतं, याची सर्वांना माहिती आहे. गजरांमध्ये  तल्लीन झालेले बापू, सारेजण पाहतातच.  या पुढे जाऊन काहीजणांनी बापूंचं संगीताचं सूक्ष्म ज्ञान आहे, याचा अनुभव घेतला आहे. तर काही मोजक्या मंडळींना, संगीताबद्दलच्या बापूंचे विचार व संकल्पनाही ठाऊक आहेत. डॉ. हेमंत टोणगावकर आणि विनय बलसे, यांचा समावेश या मोजक्या मंडळींमध्ये करता येईल. संगीत हा या दोन्ही मित्रांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यावर या दोघांनाही बापूंशी बोलण्याची संधी मिळालेली आहे. या दोघांच्याही शब्दात सांगायचं तर, ‘बापूंनी संगीताकडे पाहण्याचा पर्स्पेक्टिव्ह दिला’. त्यामुळे डॉ. हेमंत टोणगावकार आणि विनय बलसे यांच्यातलं संगीतावरच्या बोलण्यात केंद्र स्थानी विषय असतो, तो म्हणजे ‘बापूंना भावणारं संगीत’. म्हणूनच या दोन मित्रांमधला संगीतावरचा ... Read More »

Happy Diwali to All Shraddhavan Friends

  My dear Shraddhavan friends, On the auspicious occasion of Deepavali I send you my best wishes for a happy & prosperous New Year and pray at the Lotus Feet of Bapu to shower His grace & blessings on each one of you and your families at all times. मेरे प्रिय श्रद्धावान मित्रों, दीपावलि के इस शुभ पर्व पर मैं तुम सब को शुभेच्छाएँ दे रहा हूँ कि नया वर्ष आप सब को आनन्द एवं समृद्धि प्रदान करें और सद्गुरु बापु के चरणों में यह प्रार्थना करता हूँ कि उनकी कृपा एवं आशीर्वाद आप सब को तथा आपके परिवार को ... Read More »

Real Time Analytics