Home / Marathi / रक्तदान शिबिर – २०१५

रक्तदान शिबिर – २०१५

येत्या रविवारी म्हणजेच दिनांक १२ एप्रिल २०१५ रोजी दिलासा मेडिकल ट्रस्ट अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर, अनिरुद्धाज्‌ अकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट आणि श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन या संस्थांतर्फे श्रीहरिगुरूग्राम येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दरवर्षी होणार्‍या या भव्य रक्तदान शिबीरात साधारत: ५००० ते ५५०० रक्ताच्या बाटल्या गोळा होतात; व हे सर्व रक्त गोळा करण्याचे काम ३०/३२ रक्तपेढ्यांमार्फत करण्यात येते.

Aniruddha Bapu, अनिरुद्ध बापू, Bapu, बापू, Anirudhasinh, अनिरुद्धसिंह, अनिरुद्ध जोशी, Aniruddha Joshi, Dr. aniruddha Joshi , डॉ. आनिरुद्ध जोशी, सद्‍गुरु अनिरुद्ध, सद्‍गुरु अनिरुद्ध बापू, Blood Donation camp, Blood Donation, रक्तदान शिबिर, रक्तदान,

परम पूज्य अनिरुद्धांच्या मार्गदर्शनाखाली दिलासा मेडिकल ट्रस्ट व संलग्न संस्थांतर्फे १९९९ पासून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षीच्या, म्हणजेच २०१५ सालात होणार्‍या शिबिराचे वैशिष्ट म्हणजे, या संस्थांच्या माध्यमातून होणार्‍या रक्तदानाची संख्या “एक लाख रक्त बाटल्या” हा मैलाचा दगड पार करणार आहे.

परम पूज्य सद्‌गुरू अनिरुद्धांनी श्रीमद्‍पुरुषार्थ तृतिय खंड ‘आनंदसाधना’ या ग्रंथामधील आचमन १२२ मध्ये रक्तदानाचे महत्व विषद केले आहे.

“रक्तदानाचे महत्व”

‘परमात्म्यास ९ प्रकारचे थेंब अत्यंत आवडतात.’
आणि त्यातील ९ व्या क्रमांकावर बापूंनी नमूद केले आहे….
९) ‘एका श्रद्धावंताने दुसर्‍या श्रद्धावंतासाठी निरपेक्ष भावाने केलेल्या रक्तदानाचे थेंब.’

शिवाय सद्‌गुरू श्री आनिरुद्ध बापूंनी त्यांच्या प्रवचनातून वारंवार रक्तदानाचे महत्व आपल्या श्रद्धावान मित्रांना सांगितले आहेच.

मला खात्री आहे की, परम पूज्य अनिरुद्ध बापूंचे सर्व श्रद्धावान मित्र या वर्षीच्या, म्हणजेच दिनांक १२ एप्रिल २०१५ रोजी होणार्‍या  रक्तदान शिबिरात उत्साहाने सहभागी होऊन हा “एक लाख रक्त बाटल्यांचा” मैलाचा दगड पार करण्यात मोलाचा हातभार लावतील. आपण सर्व श्रद्धावान या आपल्या उपक्रमात यशस्वी होण्यासाठी सद्‌गुरू व मोठ्या आईच्या चरणी प्रार्थना करूयात.

ll हरि ॐ ll    ll  श्रीराम ll   ll अंबज्ञ ll

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*