Home / Current Affairs / दैनिक ‘प्रत्यक्ष’चा ’बिटकॉईन स्पेशल’ अंक

दैनिक ‘प्रत्यक्ष’चा ’बिटकॉईन स्पेशल’ अंक

२०१२ साली ’बिटकॉईन्स्‌’ (Bitcoins) हा शब्द मी पहिल्यांदा ऎकला, तो बापूंच्या तोंडून. बापूंनी जुलै २०१२ मध्ये स्वत: २ दिवसांचा, तब्बल ३० तासांचा एक सेमिनार घेतला, ज्यात त्यांनी साधारण २५ हून अधिक विषयांचे, १७ विविध क्षेत्रांतील उपस्थितांसमोर सखोल विवरण केले. अटेंशन इकॉनॉमी (Attention Economy), जुगाड (Jugaad), क्लाऊड कॉम्प्युटिंग (Cloud Computing) सारख्या विषयांबरोबरच ’बिटकॉईन्स्‌’ हा विषय बापूंनी तेव्हा मांडला होता.

त्यावेळेस अधिकांश सामान्यजनांना माहिती नसलेल्या किंवा जुजबी ऎकीव माहितीच असलेल्या ह्या विषयांच्या सेमिनारला बापूंनी ’नवीन सहस्‍त्रकाच्या योजना व धोरणे’ (Strategies of the New Millennium) हे नामाभिधान दिले. हे नावच या विषयांचे महत्त्व अधोरेखित करते.

दैनिक ’प्रत्यक्ष’मध्ये आज म्हटल्याप्रमाणे “जगाचा प्रवास ’करन्सी’कडून क्रिप्टोकरन्सीच्या दिशेने सुरू झाला आहे”. ह्या प्रवासात, बापूंनी सेमिनार घेतलेल्या सालात म्हणजे २०१२मध्ये जर आपण डोकावले तर त्यावेळेस ‘एका बिटकॉईनला १३ अमेरिकी डॉलर’ हा भाव होता, जो आज ‘एका बिटकॉईनला तब्बल ६१८० अमेरिकी डॉलर’वर जाऊन धडकला आहे. ह्या एका आकडेवारीतून बापूंच्या दूरदृष्टीची आपल्याला ओळख होते.

बापूंनी दिलेल्या ह्या मार्गदर्शनातून दैनिक ’प्रत्यक्ष’ वेळोवेळी अशा महत्त्वाच्या जागतिक घडामोडींसंबंधीच्या बातम्या देत आला आहे व आज ह्याच बिटकॉईन्स्‌चा खास वेध आपल्याला दैनिक ‘प्रत्यक्ष’च्या माध्यमातूनच घ्यायचा आहे; कारण आपण जरी आपल्या आसपासच्या परिस्थितीबद्दल सजग नसलो, तरी बापू त्यांच्या श्रद्धावान मित्रांना कायमच वास्तवाचे भान राखून सजग करत असतात.

 

हिंदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*