Home / Current Affairs / बंध नायलॉनचे – एक सुंदर कलाकृती

बंध नायलॉनचे – एक सुंदर कलाकृती

पूर्वी एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये माणसांमधील नात्यांची वीण घट्ट होती. पण आताच्या या वेगवान आयुष्यात कुठेतरी ही वीण विरत चालली आहे आणि ती घट्ट ठेवण्यासाठी माणसाला कधी कधी कुत्रिम गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. ह्याच पार्श्‍वभूमीवर आम्ही सर्वांनी एक उत्कृष्ट चित्रपट बघितला तो म्हणजे ’बंध नायलॉनचे’. जतीन वागळे यांचे सुंदर दिग्दर्शन, महेश आणि मेघा मांजरेकर यांचा दूहेरी भूमीकेमधील जबरदस्त अभिनय व त्यांना सुबोध भावे, श्रृती मराठे, सुनील बर्वे, संजय नार्वेकर तसेच बालकलाकार प्रांजल परब यांची मिळालेली सुंदर साथ तसेच अमितराज याचे नेहमी प्रमाणेच कथानकाला पूरक असणारे उत्कृष्ट संगीत ही या चित्रपटाची वैशिष्टे.

Source - filmibeat

Source – filmibeat

दोन पिढ्यांमधील संघर्षामुळे उद्भवलेली समस्या व त्यावर तंत्रज्ञानाचा वापर करून एका अनोख्या पध्दतीने शोधलेले उत्तर हे ह्या चित्रपटाच्या कथेचा मूळ गाभा आहे. पण त्या उत्तरामुळे ती समस्या सुटते की अधिक वाढते हेच चित्रपटात सुंदर पद्धतीने दाखवले आहे.

परमेश्वराने मानवाला निर्माण केले आहे व मानवाने यंत्राला निर्माण केले आहे. येणार्‍या गतिमान यंत्रयुगात मानवाने तंत्रज्ञानाचा वापर जरूर करावा. पण तो किती व कुठल्या स्वरूपात यालाही एक मर्यादा आहे. यंत्रांचा उपयोग जरी मानवाचे कष्ट कमी करण्यासाठी किंवा मानवाच्या समस्या सोडवण्यासाठी होत असला तरीही ते मानवाची जागा घेऊ शकत नाहीत. Sometimes to get connected with your near & dear ones, you have to get disconnected with gadgets like mobile, tabs. computers. समजा यंत्राने मानवाची जागा घेतली तर काय होईल ह्याच प्रश्नाचे उत्तर आपल्याला ह्या चित्रपटातून मिळते. हा चित्रपट प्रत्येकाने जरूर बघावा.

॥ हरि ॐ॥ श्रीराम॥ अंबज्ञ॥

 

My Twitter Handle

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*