अमीबामध्ये असणारी जाणीव (Awareness of an amoeba)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘अमीबामध्ये असणारी जाणीव’ याबाबत सांगितले. 

प्रत्येक मनुष्यामध्ये ही जाणीव आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक प्राण्यामध्येपण ही जाणीव आहे. बरोबर. कुठलाही प्राणी घ्या? साधा अमिबा घेतला आपण. बरोबर. अमिबा प्राणी. आपण पुस्तकामध्ये बघितलेला आहे. बरोबर. अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे ओ.के ओनली वन सेल, एकच पेशीय. बरोबर. हा त्याचं केंद्र किंवा आपण न्युकलिअस म्हणतो, न्युकलिअस आहे, हे त्याचे भाग आहेत, हा त्याचा शरीर आहे आणि हे ते भाग आहेत, हे काय, त्याचा हाच शेप असतो असं नाही. त्याचा कुठलाही शेप नसतो.

समजा त्याला जी गोष्ट खायची आहे म्हणजे त्याची जी पदार्थ त्याचं खाद्य आहे, ते त्याच्या विशिष्ट अंतरावर आल्याची त्याला जाणीव झाली. ती जाणीव झाली की काय होतं? ताबडतोब त्याच्या शरीरापासून त्याला आपण pseudopods म्हणतो असे त्याचे पाय, खोटे पाय pseudopods म्हणजे खोटे पाय, हे वाढायला लागतात, ते असे एकत्र होतात, मग हा भाग त्याचा आतमध्ये येतो. आलं लक्षामध्ये आणि मग परत अलग होतो तो अन्नकण आत आल्यापासून, बरोबर. म्हणजे त्या एकपेशीय प्राण्यालासुद्धा काय आहे? जाणीव आहे. त्याचबरोबर तो अमिबा ज्या पाण्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये जास्त अ‍ॅसिड लेव्हल म्हणजे तो जास्त आम्लता आली कि तो अमिबा त्या भागापासून दूर पळतो. म्हणजे त्याला हे वाईट आहे हा खाद्यपदार्थ ही जाणीव त्या अमिबाला आहे.

म्हणजे एकपेशीय प्राण्यामध्येसुद्धा आणि ह्या एवढ्या पेशींचा महासागर असलेल्या मनुष्यामध्येसुद्धा काय समान आहे? तर जाणीव समान आहे. त्या अमिबाला कान आहेत का? नाही, त्याला वास घेता येतो का? नाही, त्याला बोलता येतं का? नाही, त्याला ऐकू येतं का? नाही. पण बेसिक गोष्ट काय कॉमन आहे? तर जाणीव. माझ्यासाठी चांगलं काय आणि माझ्यासाठी वाईट काय, ह्याची निवड कोण करून देऊ शकते? जाणीव. ही जाणीव त्या अमिबामध्येपण आहे तर माणसामध्ये का नाही, चांगलं काय आणि वाईट काय. बरोबर आणि तरी आपण बघतो कि अमिबा मात्र कधीच वाईट पदार्थ आत घेत नाही. तो वाईट पदार्थापासून दूर पळतो. मनुष्य मात्र शरीरारासाठी हानिकारक असणारा पदार्थ डॉक्टरांनी किती आरडाओरडी केली असूनसुद्धा घेत राहतो, बरोबर.

‘अमीबामध्ये असणारी जाणीव’ याबाबत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥