Home » Marathi » आध्यात्मिक वातावरणाने भारलेले बापूंचे घर (Atul Mahajan)

आध्यात्मिक वातावरणाने भारलेले बापूंचे घर (Atul Mahajan)

 English हिन्दी தாமிள்   

– अतुल महाजन (Atul Mahajan)

Atul Mahajan Profile pic२००३ सालापासून मी बापूंकडे जे कार्यक्रम होतात त्यामध्ये मी पौराहित्य करत आहे. पाठक गुरूजी आणि मला २००३ च्या डिसेंबरपासून बापूंच्या घरी दत्तयागाची पूजा करण्याची संधी मिळाली. जुईनगरला एका कार्यक्रमाच्या वेळी बांपूबद्दल आम्हाला माहिती मिळाली होती. त्यावेळी मी आणि पाठक गुरूजी यांनी जुईनगरला बापूंनी स्थापन केलेल्या धर्मचक्राचे दर्शन घेतले. बापूंवर विशेष अशी श्रद्धा नव्हती. परंतु एक आध्यात्मिक वातावरण होतं म्हणून त्याठिकाणी जाणवत होतं. आपण अनेक ठिकाणी पौराहित्य करतो. पण या ठिकाणी विशेष आणि वेगळं काहीतरी आहे. त्यानंतर ‘साई सत्संग रत्न’ या मासिकाचे बापूंवरती विशेष लेख, पुस्तक काढावे यासाठी मी आणि पाठक गुरूजी नवनीतमध्ये सुचितदादांना भेटायला  गेलो होते. संध्याकाळची वेळ होती आणि त्या ठिकाणी बाहेर बसलो होतो. अचानक आजूबाजूला असणारी मंडळी एका बाजूला झालो. कुणीतरी कुजबुज केली की बापू येत आहेत. आम्हाला तशी थोडीपण कल्पना नव्हती. बापूंचे थोडे फोटो पाहिले होते.पँटशर्टमध्ये एक डॉक्टर व्यक्ती आहे जी आध्यात्मिक मार्गाबद्दल बोलतात. एवढीच त्यांची माहिती होती.

नवनीतच्या बाहेर एका बाजूला आम्ही उभे राहिलो. अनेक लोकांना बापू हात दाखवत दर्शन देत आतमध्ये जात होते. बापू नवनीतची पहिली पायर चढले आणि मागे वळून त्यांनी पाहिले. त्याचक्षणी बापूंची एक नजर आम्हा दोघांकडे गेली. बापूंनी पाहिल्यानंतर थोडंसं वेगळं जाणवलं. तोपर्यंत अध्यात्म काय असतं याची माहिती आपल्याला होती. मंदिरात जाऊन काय करावे काही करू नये याबद्दलची थोडीबहुत जाणीव होती. मंत्र वगैरे येत असल्यामुळे मंत्राच्या मागचा भाव जाणून घेण्यामध्ये जास्त रस नव्हता. यापूर्वी अनेक महाराज, ऋषी संपर्कात आले होते. अनेक मंदिराच्या प्रतिष्ठापना, सण उत्सवांमध्ये भाग घेतला होता. तो एक सोहळा असायचा. पण बापूंची ती एक नजर पडली त्यामधून खूप काही परिवर्तन घडले.

 bapu homeत्या दिवसानंतर सुचितदादांची भेट होत राहिली. प्रत्यक्ष बापूंना भेटण्याचा योग तसा थोडा उशीरा आला. साधारणत: २००१ साली गुरूपौर्णिमेचा बापूंवरचा एक अंक आम्ही प्रकाशित केला. तोच अंक देण्यासाठी मी आणि पाठक गुरूजी बापूंच्या केबिनमध्ये आलो होतो. बापूंनी तो अंक अत्यंत प्रेमाने पाहिला आणि अशाच गोष्टी करत जा या गोष्टींची आवश्यकता आहे असा संदेश आम्हाला दिला. ‘साई सत्संग रत्न’ यापूर्वी दीड वर्ष आम्ही चालवत होतो. एक आध्यात्मिक मासिक चालविणं, ती चालवत असताना सर्व गोष्टी सांभाळणं तसं अवघड होतं. परंतु बापूंनी जी उभारी दिली. आणि त्यानंतर संस्थेकडून जी परवानगी मिळाली. मग प्रत्येक महिन्याला पंचशील परीक्षेचे पेपर. बापूंचे भक्तांना आलेले अनुभव. अशा गोष्टी मासिकांमध्ये घेऊ लागलो. आणि अशाच एका अंकामध्ये यज्ञाचे आयोजन कसे करावे व त्याबद्दलची माहिती ‘साई सत्संग रत्न’ अंकामध्ये देण्यातआली होती. ती माहिती बापू  आणि सुचितदादांच्या पाहण्यात आली. त्यानंतर सुचित दादांनी विचारले की तुम्ही पौराहित्य करता का? आम्ही दोघांनी होकारार्थी मान डोलविल्यानंतर १६ डिसेंबर २००३ रोजी बापूंच्या घरी दत्त याग करण्याचे आमंत्रण आम्हाला मिळाले. पौरससिंह त्या यज्ञाला बसले होते आणि त्या यज्ञामध्ये मनापासूनच खूप चलबिचल होती. आपण एवढ्या पूजा करतो त्यातलं सत्य-असत्य, तात्विकता पूजा अर्चा करताना सुरू असलेले अवडंबर हे आता बापूकडे कसं चालणार? कारण बापूंना जी लौकिकदृष्ट्या माहिती होती बापू अत्यंत विज्ञाननिष्ठ आहे. आपल्या ज्या पूजा पाठ आहेत यांना चालतील का? असा विचार करत करत आम्ही दत्त याग दत्त यागाची सुरुवात केली.

पहिल्याच दिवशी आचार्यपद स्वीकारल्यानंतर, आचार्याने जे काय सांगेन ते यजमानांनी ऐकायचे असते असा एक लौकिक आहे. पण बापूंच्या घरी यागाला बसलेल्या यजमानांना याची पूर्ण कल्पनाच देऊन ठेवलेली होती. गुरूजी जे सांगतील ते आणि तसंच करायचं. यज्ञाची सुरुवात होत असताना, बापू आणि संपूर्ण कुंटुंब त्या यज्ञाच्या येथे जमले होते. कोणत्या आणि कुठल्या पद्धतीची पूजा चालली आहे याचे ते निरीक्षण करत होते. पूजेसंदर्भात असलेल्या कुतूहलापोटी प्रत्येक प्रश्‍न विचारला जात होता. यज्ञाच्या तीन स्टेप्स काय आहेत यासारखे अनेक प्रश्‍न मनापासून विचारले जात होते आणि प्रत्यक्ष यज्ञ सुरू झाल्यानंतर पूजेला लागणारे साहित्य सगळंच्या सगळं जागेवर होतं. पूजेला लागणारे ताम्हणापासून ते फुलांपर्यंत सर्वच्या सर्व साहित्य त्या ठिकाणी होतं. हे पाहूनच थोडं रिलॅक्स वाटलं. याग सुरू झाल्यानंतर आई स्वत: पूजा करताना प्रत्येक गोष्ट ऐकत होत्या. मध्ये मध्ये त्यांना पडणारे प्रश्‍न त्या विचारत होत्या. त्यानंतर औक्षणाच्या वेळी आई त्याठिकाणी आल्या औक्षण वगैरे केलं. पुण्यवाचन केलं. या सर्व गोष्टी होत असताना, दुपारच्या सत्रांमध्ये बापूंनी दत्तमालामंत्राचे विशेष हवन, विशेष अधिष्ठान करायला सांगितलं होतं. ते पण झालं. त्या यज्ञानंतर जी एनर्जी मिळायची असते ती खर्‍या अर्थाने आम्हाला त्या ठिकाणी मिळाली.

Atul mahajan article 3पौराहित्य करण्याच्या अनुभवामध्ये बापूंकडे यज्ञ करण्याचा अनुभव खूप काही सांगून जात होता. इतर ठिकाणी पौराहित्य करत असताना, यजमान बसलेले असतात आजूबाजूला गोंगाट चाललेला असतो. मात्र बापूंच्या घरी आलेला अनुभव लक्षात घेतला तर ह्याठिकाणची एनर्जी वेगळीच मिळत होती. बाहेरून त्या यागाला काही पुरोहित आले होते ते सुद्धा अशा प्रकारचा याग बघून आश्यर्यचकित झाले होते. येथे उपस्थित असलेला प्रत्येकजण परमेश्‍वराचे नामस्मरण करत होता. अशा सर्व गोष्टी भक्तांकडून चालू होत्या. पहिल्याच दत्तयागाच्या दुसर्‍या दिवशी दुपारच्या सत्रामध्ये सद्गुरूच्या चरणांची भेट झाली आणि तो क्षण खरोखरच अनुभवण्यासारखा होता. तेथे उपस्थित असलेले पुरोहित बापूंच्या चरणांना नमस्कार करीत होते. आई-बापू-दादांचा चरणस्पर्श घेत होते. म्हणजे एखादं वैदिक वातावरण काय असतं त्याचा आम्ही अनुभव घेत होतो. मुंबईतील सातव्या मजल्यावर याग करत असूनही आम्ही एखाद्या जंगलामधल्या आश्रमात हा याग करीत आहोत अशी अनुभूती आम्ही त्यावेळी घेत होतो.
त्या आश्रमांमध्ये पुरोहितांचे आदरातिथ्य एखाद्या श्रेष्ठ ऋषीकडून होत आहे अशा स्वरूपाची भावना आमची होती. प्रसंगी अनेक यज्ञामध्ये बापूंनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे, काही बदल करायचे ते पण सुचविले. काही पूजा करत होतो त्या पूजेमागचा भाव काय आहे याचा अर्थही बापूंनी आम्हाला समजावून सांगितला. ६४ योगींची स्थापना म्हणजे कशी असते, मुख्य पीठ काय असतं? मुख्यत्वे यज्ञपुरुष ही काय संकल्पना आहे ती बापूंनी आम्हाला समजावून सांगितली.

कारण यापूर्वी अनेक दिवसांचे यज्ञ झाले होते. पौराहित्य केलं होतं. आचार्यपद भूषविलं होतं. परंतु बापूंच्या येथे जो यज्ञ होता त्या यज्ञामध्ये खर्‍या अर्थांनी  यज्ञपुरूष समजला. यज्ञसंस्था जी असते त्या यज्ञामध्ये अर्पण केलेले हरिद्रव्य, हवनसामुग्री जी असते ती यज्ञामध्ये पोहोचते म्हणजे काय होतं. हे खर्‍या अर्थाने तिथे पाहण्यात आलं. वेगवेगळ्या प्रकारच्या स्तुतींमध्ये स्तोत्रांमध्ये पूर्ण कुंटुंब एकत्र राहायचं, वाद्य, शंखनाद सगळ्या गोष्टी आनंदाने व्हायच्या. मुख्य करून आईची पूजा चालू असताना, नंदाई स्वत: देवीला साडी वगैरे अर्पण करायच्या. म्हणजे आम्ही बघत होतो की नंदाईला भक्तीपूर्ण अंत:करणाने बघत असतात आणि त्याचवेळेला नंदाई सुद्धा एक भक्त म्हणून त्या मोठ्या आईशी पूजा कशी करते ते बघायला मिळत होतं. बाहेर ज्या पद्धतीने पूजा करताना उरकण्याची भावना होती तिथे या ठिकाणी मात्र प्रत्येक पूजेचा आनंद घेत होता. आज नऊ वर्ष झाली. प्रत्येक वर्षी बापूंच्या घरातील दोन दत्तयागांमध्ये पाठक गुरूजी आणि मी आचार्यपद भूषवित आहोत.  

दरम्यान, अवधूत चिंतनमध्ये आम्हा दोघांकडूनही तीन दिवसांचा सार्वजनिक दत्तयाग करून घेतला. गायत्री यंत्र त्यांनी स्वत: स्वत:च्या घरामध्ये सिद्ध करून घेतलं. ते यंत्र सिद्ध करण्यासाठी विशिष्ट पद्धतीने पुरोहित कसे लागतील त्यांचा वयोगट काय असावा त्यांचे आचरण काय असावे त्यांनी कुठल्या गोष्टी खाव्यात अत्यंत बारकाईने यंत्राची सिद्धता करून घेतली. यंत्रामध्ये पंचधातूचे यंत्र असावे की सोन्याचे असावे की तांब्याचे असावे  याप्रसंगी बापूनी हा विषय चर्चा करून  मिटींग घेऊन बापूंनी व्यवस्थित समजावून सांगितल्या. आणि त्या पूर्ण झाल्यानंतर अंतिमत: ते गायत्री मंत्र सिद्ध झाले. आणि ते सिद्ध करीत असताना, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रातील जल त्याठिकाणी मागवले गेले. त्या तीर्थाचे विशिष्ट ब्राह्मण त्याठिकाणी बोलावण्यात आले. त्यानंतर त्या यंत्रांची सिद्धता करून ते बापूंकडे सूपूर्द करण्यात आलं.

ठरावीक काळाने त्रिमिती डायमेन्शनच्या श्रीयंत्रांची स्थापना करून घेतली. जवळजवळ ६५ किलो वजनाचे श्रीयंत्र भरीव असे आहे. त्या श्रीयंत्राच्या स्थापनेपूर्वी किमान १६ ते १७ मिटींग बापूंबरोबर झाल्या. त्या मिटींगमध्ये छोट्यातल्या छोटी गोष्ट कशा पद्धतीने ते श्रीयंत्र परफेक्ट होईल हे बघण्याचं कार्य झालं आणि त्यावेळी बापूंनी सगळं आमच्याकडून करून घेतलं. त्याचवेळी पूर्णपणे स्वातंत्र्य देऊन बापूंनी ते पूर्णपणे शोधण्यास सांगितलं. ते पूर्ण शोधल्यानंतर यंत्र ज्यावेळेस बनत होतं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अशा स्वरूपाचे यंत्र आद्यआचार्य गुरू शंकराचार्य त्यांनी जे चार आश्रम स्थापन केले होते. त्यातील द्वारकेच्या आश्रमामध्ये हे श्रीयंत्र आहे. ही माहिती आम्हाला त्यांनी श्रीयंत्राची प्रतिष्ठापना झाल्यानंतरच सांगितली.

ह्या श्रीयंत्राची बापूंना अगोदरच माहिती होती. ते काय आहे? कशा पद्धतीने आहे. त्यानंतर द्वारकेला जाण्याचा आमचा योग आला. तिथे श्रीयंत्र पाहण्याचाही योग आला. द्वारकेमध्ये असलेले श्रीयंत्र आणि बनविण्यात आलेले श्रीयंत्र यांच्यामध्ये तसूरभरही फरक नव्हता. हे यंत्र  न पाहताही बापूंनी ते व्यवस्थित करून घेतलं. त्याची सिद्धता सोळा ब्राह्मणांकडून व्यवस्थित करून घेतली.

FI - moolark ganeshमांदार गणेशाची पूजा व स्थापना करून घेतली.  त्यावेळी बापूंनी त्या दोन महत्त्वाच्या जबाबदार्‍या सोपविल्या होत्या. गुरूक्षेत्रममध्ये मांदार गणेशाची जी स्थापना झाली आहे, त्या गणपतीच्या प्रतिष्ठापनेची पूर्ण जबाबदारी बापूंनी मी आणि पाठक गुरूंजीवर दिली होती. कशा पद्धतीचा मांदार गणेश असतो. काय असतो? कसा असतो ही सगळी ऐकीव गोष्ट होती. रूईचे जे झाड असते ते २१ वर्ष पूर्ण झालं की त्याच्या मूळामधून उत्पन्न होणारा गणपती म्हणजे मांदार गणेश. हा गणपती स्वयंसिद्ध असतो. ती मूर्ती जमिनीतून बाहेर कशी काढायची? याबाबतीत काहीच माहिती नव्हतं. बापूंशी चर्चा करून व्यवस्थित ते शोधण्यात आलं. २०१२ च्या पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाच्या नंतर गुरूवारच्या दिवशी ती मूर्ती जमिनीतून काढण्यात आली. त्यानंतर सतत अकरा महिने वेगवेगळ्या प्रकारचे अधिष्ठान करून चंदनाच्या अष्टगंधामध्ये ठेवून, तेलामध्ये, तुपामध्ये ठेवून ती मूर्ती सिद्ध करण्यात आली. आणि ही मूर्ती सिद्ध करताना कुठल्या प्रकारचे मंत्र बोलायचे. कुठल्या प्रकारचे अनुष्ठान असावे हे बापूंनी प्रत्येकवेळी एक पुरोहित म्हणून आम्हाला विचारलं. बापू कुठलीही गोष्ट ती अगदी मनमोकळेपणाने करतात. एखादी गोष्ट तुमच्याकडून त्यांना काढून घ्यायची असेल तर ती समोरच्याला मनमोकळेपणाने विचारून घेतात आणि माहिती समोरचा देत असताना, त्या माहितीची सत्यता काय आहे हे पूर्णपणे त्यांनी जाणून घेतात.

दरवर्षी रामनवमीला मोठ्या आईंचे दर्शन आपल्याला होत असतं. ही रेणूकामाता आमच्या महाजनांच्या घरामध्ये पूर्वापार आहे. तीनचार पिढ्यांपासून ती असावी असा आमचा अंदाज होता. मूर्तीचा फोटो बघून  बापूंनी छोट्यामोठ्या गोष्टी  समजावून सांगितल्या. मूर्तीचे जे मुख आहे त्या मुखाचा वरचा भाग झाकलेला असावा, त्याचे परिणाम काय असतात. झाकलेलं नसेल तर काय परिणाम होतात याची सर्व माहिती दिली आणि प्रत्यक्ष रामनवमीला बापूंनी तीच मूर्ती आणली. तिची सिद्धता केली. अभिषेक केला. सर्वप्रथम सहस्त्राधार अभिषेकामध्ये २७ प्रकारची धारापत्रे नवीनच बनविण्यात आली होती. ही एक अल्टीमेट गोष्ट आहे. अशा प्रकारचं धारापात्रं महाकालेश्‍वर मंदिर जे उज्जैनला आहे तिथे ते  आहे. त्यानंतर ते आपल्या ठिकाणी आहे. दोन वर्षापासून ह्या मातेवर अभिषेक केला जातो.  नंदाईने या मूर्तीच्या अभिषेकासाठी खास निरोप दिला होता. आई आहे फार लांबून आली आहे हिचे स्वागत मनापासून केले पाहिजे.  ही मूर्ती किमान तीन दिवस तरी आपल्या घरामध्ये असावी अशी इच्छा आईने ठेवली. त्यानंतर, बापूंच्या घरी ही मूर्ती ठेवली जाते. अन् त्या देवघरातून त्या आईला परत आमच्या गावी नेलं जातं. त्यावेळी बापूंनी आम्हाला स्वत: सांगितलं की ही जी मूर्ती आहे ती आमच्या घरामध्ये गेल्या १५ पिढ्यांपासून आहे म्हणजे महाजन कुटुंबामध्ये,  माझी ही १६ वी पिढी  आहे. आणि आमच्या घरातील एक वैशिष्ट्य आहे की घरामध्ये जो मूळ पुरूष आहे त्याच्या घरामध्ये क्रमाक्रमाने ही मूर्ती दिली जाते. असं करत करत ही मूर्ती माझ्यापर्यंत आली.

FI - mahadurgeshwarअशीच एक स्थापना मला आठवते ती श्री महादुर्गेश्‍वरीची. महादुर्गेश्‍वर लिंग  सर्वप्रथम बापूंनी  आमच्याकडे दिलं. हे महादुर्गेश्‍वर लिंग जे आहे तेे अत्यंत श्रेष्ठ आणि पवित्र असं लिंग आहे. हे कलियुगातलं आद्य ज्योर्तिलिंग आहे. हा स्त्रीअंबिकेश्‍वर आहे. ह्याची पूजा योग्य पद्धतीने झाली पाहिजे. आणि एकदा प्रवचनामध्ये कार्याची सिद्धता आणि शुद्धता या दोन गोष्टींचा विचार बापूंच्या मुखातून नेहमी येत असतो. परंतु ते ज्योर्तिलिंग ठेवताना ते किमान एक महिना तरी कुठल्यातरी पुरोहिताकडे असावं या उद्देशाने ते आमच्याकडे दिलं होतं. या लिंगाची पूजा कशी करावी हे सांगण्यात आलं. त्यापद्धतीने पूजा सिद्ध झाली आणि ज्या दिवशी त्याची स्थापना करायची होती पहाटे साडेतीन वाजता ज्योर्तिलिंग आमच्या घरातून बापूंच्या घरी आणलं. बापू आणि आईने ज्योर्तिलिंगांचे औक्षण केलं. आणि ज्या ठिकाणी याची स्थापना करायची होती त्या स्थापनेपासून मुख्य दरवाजापर्यंत गुरूक्षेत्रम्च्या मुख्य दरवाजापर्यंत समीरदादा, पौरससिंह आणि स्वप्नीलसिंह या तिघांनीही सात वेळेस दडंवत घालून  यायचं आणि त्यानंतर त्याचं दर्शन घ्यायचं  असं सांगण्यात आलं होतं.

ते ज्योर्तिलिंग घेऊन यायचं अन् त्याला हळदकुंकू लावायचं असं न करता त्याचा जो विधी होता तो विधी योग्य पद्धतीने करून सातवेळेस दंडवत घालून ते तिघेही प्रत्यक्षपणे आले. त्यानंतर पायघड्या त्यांनी धोतराच्या आणि साडीच्या घालून ते ज्योर्तिलिंग आपल्या स्थानावरती स्थापन केलं. ज्यावेळेस त्या ज्योर्तिलिंगाला  परिक्रमा घालायची होती त्यावेळेस बापू स्वत: अनवाणी बापू आमच्या समक्ष  होते. आणि ते ज्योर्तिलिंग स्थापन करण्यापूर्वी सर्वत्र वाद्यांच्या गजरामध्ये त्याला पूर्ण हॅप्पी होमच्या परिसरामध्ये परिक्रमा घालण्यात आली.

ज्योर्तिलिंगाची स्थापना झाली. बापूंच्या घरांमध्ये पौरससिंह आणि निष्ठाविरा या दोघांनी नवचण्डी यागाचे अनुष्ठान  केलं. त्या यागामध्ये आवश्यक असणार्‍या गोष्टी त्या बापूंना विचारून घेतल्या जात होत्या. हा याग कशापद्धतीने कोणत्या पद्धतीने करावा याची माहिती घेतली जात होती. कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये म्हणून तीन-तीन चार-चार दिवस आधी या सर्व गोष्टींच्या मिटींग्ज घेतल्या जात होत्या. त्या मिटींग्समध्ये लिस्टींग केलं जायचं. साहित्य कुठल्या प्रकारे जमवायचं कुठल्या पद्धतीने साहित्य एकत्र करायचं. त्यांचा उद्देश हाच असायचा. नंदाईने एकदा बोलून पण दाखविला आमचा उद्देश हाच आहे. पूजा होत असताना सगळ्यांनी त्या पूजेचा आनंद घेतला पाहिजे. कुठलीतरी गोष्ट राहिली आणि त्या गोष्टीकडे सगळ्यांचे लक्ष लागते. त्यामुळे सगळ्यांनी त्या पूजेकडे लक्ष द्यावं असं न होता सगळ्या गोष्टीचं लिस्टींग करून त्याचं डिव्हायडेशन करून प्रत्येकाने ती व्यवस्थित सामुग्री एकत्र करावी आणि ऐन पूजेच्या वेळी ती सामुग्री शोधण्यात वेळ न दवडता  मूळ पुजेकडे किंवा मूळ गाभा आहे  त्याकडे लक्ष द्यावे. या हेतूमुळे सगळेजण त्या पूजेचा आनंद घेताना दिसत होता.   

Atul mahajan article 1देवीचे पूजन काय असते, सप्तशतीचा पाठ काय असतो. ‘तो पाठ करत असताना आई स्वत: पोथी घेऊन बसल्या होत्या. बापू सुद्धा ज्या वेळी सप्तशतीचे हवन चालू होतं त्यावेळी ते स्वत: येऊन बसले होते. पुरोहित जसं पठण करत होते त्याचं ते निरीक्षण करत होते. पूजा चालू असताना, पूजेमधील प्रत्येक विधी प्रत्येकजण बघत होता. पंचोपचार पूजन, षोडषोपचार पूजन काय असतं? त्याप्रकारचे उपचार काय असतात देवीवरती ६१ प्रकारचे उपचार काय असतात. एकूणच पूजनामधले बारकावे असतात किंवा पूजनामध्ये अग्नी जो निर्माण केला जायचा त्याला आर्णि असे म्हणतात. कोणत्याही पूजेमध्ये जे तीन किंवा चार दिवसांचे पूजन करतात त्या ठिकाणी आर्णी मंथन केले जाते. लाकडावरती लाकूड घासून  अग्नी निर्माण केला जातो. असा हा अग्नी निर्माण करत असताना, कशा पद्धतीने वैदिक मंत्र उत्पन्न होतो हे ते बारकाईने पाहत होते. नंदाई प्रत्यक्षपणे खालचं लाकूड कुठलं असावं वरचं लाकूड कुठलं असावं हा कुठल्या पद्धतीने अग्नी निर्माण केला जातो, ह्या अग्नीचे महत्त्व काय आहे, तो अग्नी कसा सौभाग्यवतीकडून हातानी स्थापन केला जातो. हे सर्व प्रकार जाणून तिथे उभ्या असणार्‍या सख्यांना आई समजावून सांगायची. या यज्ञाची कशी सिद्धता होत असते. हा यज्ञ काय आहे याची सर्व माहिती आई उपस्थित असलेल्या महिलांना ती सांगायची. इतर ठिकाणी आमच्या पाहण्यात आलं आहे की यजमान आणि तेथे उपस्थित इतरांना या पूजा व यज्ञाचे काही पडलेले नसते. त्याठिकाणी कुठलीतरी पूजा करायची सांगितली आहे किंवा पंचांगामध्ये आहे पत्रिकेमध्ये आहे म्हणून करून घ्या यासाठी तो विधी केला जातो. मात्र, बापूंकडे खरोखरच या विधीमागचे शास्त्रीय कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. तो विधी कशा पद्धतीने श्रेष्ठतम होईल म्हणजे यामध्ये आणखीन माहीत असलेल्या मंत्राचे अनुष्ठान विधीला संलग्न असतील ते कशा पद्धतीने केले जाईल याची काळजी घेतली जात असते. यापूर्वीचे जे दत्त याग  केले जायचे त्या दत्त यागामध्ये पुरूषसुक्ताचे एक हजार आवर्तन केलं जायचं. बापूंनी साक्षात दत्तमालाचे मंत्र  शिकविला. आणि हा दत्तमाला मंत्र कसा वेगळा आहे याचा धडा उपस्थित असलेल्या पुरोहितांना बापूंनी दिला. एवढंच नाही त्या पुरोहितांच्या मुखातून दत्तमाला मंत्र पाठ करून सिद्ध करून घेतला.

तो मंत्र म्हणत असताना, बापू आई दादा पासून घरातली सगळी मंडळी एकत्र अनुष्ठानाला बसतात. पुरोहित जरी यज्ञाला बसले असले तरी बाजूला बसणारी मंडळी मनाने या यज्ञाशी जोडली गेलेली असतात. या मंडळीचा सात्विक भाव जो असतो तो त्यांचा भाव या कार्यक्रमामध्ये दिसून येतो. हा यज्ञ सुरू असताना कोणत्याही प्रकारचा मोबाईल वाजला जाणार नाही याची काळजी उपस्थित मंडळी घेताना दिसतात. यावेळेला कोणतीही व्यक्ती बाहेर फिरताना तुम्हाला दिसणार नाही. अत्यंत शुद्ध भावनेने अनुष्ठान केलं जातं. अन् ते अनुष्ठान करून योग्य वेळी बापू उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना समजावून सागंतात. हा वैदिक मंत्र काय आहे  मंत्राचे अनुष्ठान कशा पद्धतीने केलं जातं. मंत्राचे  विधान काय आहे ते उपस्थित असलेल्या भक्तांना समजावून सागंतात. अशाच तर्‍हेचे चण्डिकेचे अनुष्ठान त्यांनी करून घेतलं होतं. त्यामुळे हे अनुष्ठान करताना कुठल्या प्रकारचे पुरोहित असावे वस्त्र कुठली असावीत, त्या पुरोहितांनी काय नियम पाळावे काय पाळू नये शिवाय त्यांचे भोजन कुठले असावे ही सर्व व्यवस्था योग्य पद्धतीने केली जाते.

खाण्यात कांदा लसूण वर्ज्य असावा याचे नियम त्यांनी पुरोहित व सेवेकर्‍यांना पाळायला सांगितलं होतं. उत्सवाच्या वेळी यज्ञ कसा असावा, कोणत्या प्रकारची साधनं तिकडे असावीत एकूणच सर्व बाबतीत बापू आग्रही?असत. यज्ञाच्या ठिकाणी कशा पद्धतीने कोणत्या स्थानावर कोणत्या वस्तू ठेवाव्यात अशा एकूणच बाबतीत बापूंचे लक्ष असायचे ह्यामुळे बापूंकडून अनेक गोष्टी शिकण्यात?आल्या. ह्या गोष्टी शिकत असताना, ह्या क्षेत्रातील त्यांचे जे ज्ञान आहे ते अगाध आहे. कारण कुठलीही गोष्ट अशी नाही की बापूंना माहीत नाही. अनुष्ठान करत असताना जो मंत्र उच्चारला जातो. आता पाच पाच वर्ष पुरोहित एका मंत्राचं अनुष्ठान करतात त्यावेळी त्यांना एक वेदाचे  जे चाळीस अध्याय असतात तेच फक्त त्यांना माहिती होतात. परंतु बापूंना सर्व वेदांमधील मंत्र माहिती आहेत.  वेगवेगळ्या वेदंामध्ये पारंगत असलेले पुरोहित जेव्हा मंत्र म्हणत असतात त्यावेळी तो मंत्र बापू सुद्धा म्हणत असतात. काही वेळा ते उच्च स्वराने बोलताना दिसतात. काही वेळा एखादा मंत्र, किंवा मंत्राचा उच्चार, स्वर, अनुरोध, आगाध पुरोहिताकडून चुकीचा उच्चारला तर त्याला बाजूला घेऊन तो कसा म्हणावा याचे मार्गदर्शन बापू करताना दिसतात. कारण वैदिक मंत्र हे मुक्त मंत्र आहेत वैदिक मंत्राला कुठल्याही प्रकारे बंदिस्त केले नाही त्यामुळे तो मंत्र उच्चारत असताना त्याचा उच्चार व्यवस्थित झाला पाहिजे त्याचे पालन व्यवस्थित केले गेले पाहिजे यासाठी बापू लक्ष देत असतात. मंत्र उच्चारत असताना कुठल्या प्रकारची वस्त्रे असावीत,  काही गणपतीच्या मंत्रांमध्ये विशिष्ट पद्धतीने लाल रंगांचा अंतर्भाव असावा यासाठी पुरोहितांनी कोणती वस्त्रे नेसावी याची सूचना केली जाते किंवा दत्तयागामध्ये पिवळ्या वस्त्रांचा आंतर्भाव असावा अशा सर्वच गोष्टी आध्यात्मिक आणि विज्ञानाच्या आधारे त्याचे महत्त्व पुरोहितांना बापू समजावून सांगत. तुम्ही जे काही करत आहात त्यामागची भावना ही आहे व त्याला विज्ञानाचा आधार आहे. म्हणजे बापूंच्या यज्ञातून जे पुरोहित बाहेर पडतात ते सर्व पुरोहित वर्षभर त्या यज्ञाची वाट पाहत असतात. की पुढच्या वर्षी बापूंच्या घरी गणपती असले त्यावेळी यज्ञ कसा होईल अन् त्याठिकाणी आपल्याला पौराहित्य करण्यासाठी संधी मिळेल का? यासाठी पुरोहित आसुसलेले असतात.

आम्ही गेल्या दहा-बारा वर्षापासून पौराहित्य करीत जरी असलो तरी यामध्ये काही पुरोहित बाहेरगावचे पण असतात. काही नाशिकचे असतात काही पुण्यातले असतात, काही काशीवरून आलेले असतात. त्यांना बापूंबद्दलची फारशी माहिती नसते. परंतु यज्ञ संपन्न झाल्यावर एकूणच जो माहोल असतो ना तो आनंद या पुरोहितांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहताना दिसतो. बापूजींके पास आके इतना अच्छा यज्ञ करने को मिला इतना फायदा हुआ आजतक वो किसीभी यज्ञ में प्राप्त नही हुआ अशा प्रकारची भावना वैदिक पुरोहीत बोलून दाखवत असतात. त्याचवेळी सद्गुरू बापूंच्या चरणांवरती डोकं ठेवून जी शांतता मिळते ती त्यांना अनुभवायला मिळाली आहे.

इतर ठिकाणी पौराहित्य करताना मिळणारं फळ व बापूंच्या ठिकाणी पौराहित्य करीत असताना मिळणार फळ हे अनेकपटीने मोठं असतं. आपल्या घरी चालणारा नवचण्डिकेचा याग तसाच्या तसा गुरूक्षेत्रम्मध्ये बापूंनी करून घेतला. बापूंच्या यज्ञात केली जाणारी प्रार्थना, साधना ही स्वत:पुरती मर्यादित न राहता समस्त भारतासाठी फायदेशीर असते. बापूंनी स्पष्टपणे सांगितलं आहे. पौराहित्य करत असताना पुरोहित जे काही संकल्प करतात त्या संकल्पांमध्ये भारत देशाची चतु:सीमा यांचे संरक्षण व्हावे, वर्धन व्हावे. धर्म, अर्थ काम मोक्ष यांचे रक्षण व्हावे अशा पद्धतीने बापूंनी सूचना केली आहे.

आम्ही इतर ठिकाणी जेव्हा पौराहित्य करतो त्यावेळी आम्ही बापूंनी जो मंत्र सांगितला आहे त्याचे अनुष्ठान करायला सांगतो आणि तो मंत्र का घ्यावा याचे उदाहरणही सांगून टाकतो. यज्ञ हे बापूंचे बीज आहे त्यामुळे जो कोणी पुरोहित बापूंकडे येतो तो ज्याकाही गोष्टी शिकतो त्या बाहेर जाऊन सांगण्याचा प्रयत्न करतो अशा रीतीने बापूंचा हा वृक्ष खर्‍या अर्थाने पसरत चालला आहे.

 ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

 English हिन्दी தாமிள்

One comment

  1. Rajeshsinh Kalvinkar

    Hari Om, I am feeling like I have participated in all पौराहित्य poojan mentioned above while going through this article.
    I am Ambadnya.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

Real Time Analytics